मानवी हृदय : रचना , कार्य, रक्तदाब

मानवी हृदय ठोके(आकर ,क्षमता ,१मिनिटात१०० % विभाजन ),हृदयाची रचना(बंडल ऑफ हिज) ,हृदयचे कार्य,रक्तदाब,Heart Surgery

हृदय सामान्य

हृदय यास इंग्रजीत Heart म्हणतात . Cardiology म्हणजे हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणतात Cardiologist म्हणजे हृदयाचा डॉक्टरला म्हणतात.

Credit : google

हृदय कोणत्या बाजूला असते मानवी हृदय हे दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित आहे . ते मध्यभागी नसून थोड्या प्रमाणात तिरकस आणि डावीकडे असते. हृदयाचे वजन पुरुषांमध्ये हृदयाचे वजन ३४० gram असते आणि स्त्रीच्या २५५ gram असते

हृदय विकाराचा झटका म्हणजे काय? हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होणे व त्यामुळे हृदयाचा स्नायू निकामी होणे याला हृदयविकाराचा झटका असे म्हणतात.

हृदय रोगाची लक्षणे अनेकदा आपल्याला याची वेगवेगळी लक्षणे पाहायला मिळतात. यामध्ये छातीत डाव्या बाजूला दुखणे, मळमळणे, हायपर ॲसिडीटी, अधिक प्रमाणात घाम येणे, दम लागणे ही अशी हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात.

हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ऍस्पिरिन औषध वापरतात

हृदयाचे ठोके किती असावे

ठोके मोजण्याचे उपकरण स्टेस्थेस्कोपच्या साह्याने मोजतात .स्टेथेस्कोपचा शोध रेने लैनक याने लावला हृदयाचे आकार प्रत्येक व्यक्तीचे हृदय हे त्याच्या मिटलेल्या मुठीएवढे साधारणपणे त्रिकोणाकृती असते

एक ठोके म्हणजे एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र होय (म्हणजे एक Systol व एक Diastol मिळून हृदयाचा एक ठोका बनतो.)हृदयाचे पंपाची क्षमता मानवी हृदयरूपी पंपाची कार्यत्वरा 0.25HP एवढी असते( HP म्हणजे हे शक्तीचे एकक आहे. 1 HP ७४६ वॅट ) एका ठोक्यासाठी ०.८ सेकंद लागतात आणि १ मिनिटात ५ लिटर रक्त pumping करतात

Credit : google

ठोक्याची आवाजातील तीर्वता १५ Decible होय

१ मिनिटात किती वृद्धांमध्ये ६० ठोके , प्रोढ व्यक्तींमध्ये ७२ ठोके आणि स्रियामध्ये ७८ ते ८२ ठोके , लहान मुलांमध्ये १२०ते १६० ठोके, झोपेत असताना ५५ ठोके आणि कोणत्याही निरोगी व्यक्तीमध्ये हृदयाचे ठोके पडण्याचे प्रमाण दर मिनिटास ६0 ते 100 इतके असते.

गर्भातील बाळाचे ठोके अर्भकाच्या हृदयाचे ठोके गर्भवती महिलेच्या पोटावर कंपन स्वरुपात ऐकायला येतात. त्या ठोक्यांना सॉफ्टवेअरच्या मदतीने एकत्र करून शिशू किती सुरक्षित आहे याची माहिती जाणून घेणे सहज शक्य होते.

हृदयाचे ठोके कमी होण्याची कारणे जर शरीरात असा कोणता गंभीर आजार असेल ज्यामुळे हृदयाला आपल्या क्षमतेपेक्षा अधिक काम करावे लागते तर ती स्थिती हार्ट फेल्यॉरला कारणीभूत ठरु शकते. म्हणजे की लिवरचा आजार, किडणी खराब होणं, थायरॉईडची समस्या, एचआयव्ही, शरीरात प्रोटीनचा थर जमा होणे ही कारणं हार्ट फेल्यॉरची इतर कारणं असू शकतात

हृदयाचे ठोके वाढण्याची कारणे हृदयाचे ठोके वाढणे किंवा धडधडणे वाढले तर ते काहीवेळा तणाव, व्यायाम, विशिष्ट औषधाचे सेवन यामुळे होते.

ठोक्यांच्या स्पंदनांचा आलेख काढण्यासाठी ECG चा वापर केला जातो आणि अनियमित ठोक्यांच्या निदानासाठी

  • ECG =Electro Cardio Gram
  • CT Scan = Computerised Tomography
  • MRI = Magnetic Resonance Imaging

स्पंदनाचे नियंत्रित करणारे संप्रेरके Thyosxine आणि Adrenaline

१०० % रक्तपुरवठाचे विभाजन
हृदयाकडून शरीराला होणाऱ्या 100% रक्तपुरवठ्याचे वर्गीकरण

  • २८% यकृत
  • २४% वृक्क किवा किडनीमेंदू
  • १५% स्नायू
  • १४ %मेंदू
  • १९ % इतर भागांना

हृदयाची रचना

मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो (वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे चार कप्पे असतात.)

उजवी कर्णिका किवा उजवे अलिंद (Right Auricles )

आपल्या शरीरातील अशुद्ध रक्त सर्वप्रथम हृदयाच्या या कप्प्यामध्ये गोळा होते. ऊर्ध्वमहाशीर व अधोमहाशीर अनुक्रमे शरीराच्या वरच्या व खालच्या भागातील अशुद्ध रक्त या कप्यामध्ये गोळा करतात.
वरचा कप्पा असतो याची भितिका पातळ स्नायुमय असते हा कप्पा रक्तावर कमी दाब निर्माण करतो

उजवी जवनिका किवा उजवे निलय (Right Ventricte )

उजवी कर्णिका आणि उजवी जवनिका यांच्यामध्ये त्रिदल झडप असते. उजव्या कर्णिकेतील अशुद्ध रक्त त्रिदल झडपेद्वारे उजव्या जवानिकेत येते. उजव्या जवनिकेचा भाग आंकुचन पावला की त्रिदल झडप बंद होते व या कप्प्यातील अशुद्ध रक्त फुफ्फुस धमणीद्वारे फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी पाठवले जाते.
खालचा कप्पा असतो याची भितिका उजवी कर्णिका पेक्षा जाड स्नायुमय असते हा कप्पा रक्तावर कमी दाब निर्माण करतो

डावी कर्णिका किवा दावे अलिंद(Left Auricles )

फुफ्फुसात शुद्ध झालेले रक्त चार फुफ्फुसशीरांद्वारे डाव्या कर्णिकेमध्ये येते अशा प्रकारे डाव्या कर्णिकेतील रक्त शुद्ध रक्त असते.
वरचा कप्पा असतो याची भितिका पातळ स्नायुमय असते

डावी जवनिका किवा दावे निलय(Left Ventricles )

डावी कर्णिका आणि डावी जवनिका यांच्यामध्ये द्विदल झडप असते. डाव्या कर्णिकेमधून द्विदल झडपेद्वारे शुद्ध रक्त डाव्या जवनिकेमध्ये येते. डाव्या जवनिकेचा भाग आकुंचन पावला की द्विदल झडप बंद होते आणि या कप्प्यातील शुद्ध रक्त महाधमणीद्वारे संपूर्ण शरिराला पुरवले जाते.

बंडल ऑफ हिज काय ?

बंडल ऑफ हिज म्हणजे उजव्या अलींदात निर्माण होणाऱ्या विद्युत आवेगाचे वहन निल्याकडे करणारे स्नायुमय फायबर होय
हे एक जाले आहे ते पूर्ण शरीर भर पसरले असते

हृदय कार्य

हृदय हे रक्ताभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे. आकुंचन व प्रसरणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.

  • संपूर्ण शरीरभर ऑक्सिजनचा पुरवठा करणे
  • संप्रेरके ,पचलेले पोषण द्रवे हे पेशीपर्यंत वाहून नेणे
  • टाकाऊ पदार्थ उस्तर्जक इंडियाकडे वाहून नेणे
  • शरीराचे तापमान कायम स्थिर ठेवणे
  • रोग प्रतिकार शक्ती निर्माण करणे

रक्तदाब

रक्तदाब मोजण्याचे उपकरण स्फिग्मोमॅनोमिटर (Sphyghmomanometer) या उपकरणाच्या सह्यायाने मोजतात.

निरोगी माणसाचा रक्तदाब 120किवा 80mm of Hg एवढा असतो.पण झोपेमध्ये निरोगी माणसाच्या रक्तदाबात कुठलाही बदल होत नाही.

उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब म्हणजे Systol अवस्थेमध्ये माणसाचा रक्तदाब 120 पेक्षा जास्त असेल तर त्याला उच्च रक्तदाब किंवा Hypertension असे म्हणतात आणि Diastol अवस्थेमध्ये रक्ततदाब 80पेक्षा कमी असेल तर त्याला कमी रक्तदाब किंवा Hypotension असे म्हणतात.

  • साधारण रक्तदाब =१२० किवा ८० mm of Hp असतो
  • उच्च रक्तदाब =१६० किवा ९५ mm of Hp असतो
  • कमी रक्तदाब =१०० किवा ६० mm of Hp असतो

घरगुती उपयुक्त औषद

तुळस, लसूण, अर्जून या वनस्पती रक्तदाबावर उपयुक्त आहेत. सर्पगंधा या वनस्पती पासून तयार केलेले सर्पशिला (Reserpine) हे उच्च रक्तदाबावरील उपयुक्त औषध आहे.

Heart Surgery

Heart Surgery म्हणजे मराठीत पहिले हृदय प्रत्यारोपण होय

जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण ३ डिसेंबर १९६७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत ख्रिश्चन बर्नार्ड यांनी Groote Schuur Hospital येथे घडवून आणले.

भारतातील पहिले हृदयाचे सफल प्रत्यारोपण डॉ. पी. वेणुगोपाल यांनी घडवून आणले.
भारतातील पहिली Open Heart Surgery-Christian Medical Collage, Vellore १९५९ येथे घडवून आणण्यात आली.

हृदयरोग (Heart Diseases)

जन्मत:च हृदयात दोष असणाऱ्या मुलांना Blue Baby असे म्हणतात. (कारण त्यांचे ओठ, नखे तसेच, त्वचा निळसर रंगाच बनते.)

ह्रदय topic समजण्यासाठी Related link खालील भाग वाचा

FAQ

  • हृदय कुठे असते?

    उत्तर =हृदय कोठे मानवी हृदय हे दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित आहे .

  • 1 एका मिनिटात किती ठोके पडतात?

    उत्तर = प्रोढ व्यक्तींमध्ये ७२ ठोके आणि स्रियामध्ये ७८ ते ८२ , वृद्धांमध्ये ६० ठोके

  • हृदय विकाराचा झटका म्हणजे काय?

    उत्तर =हृदयाचा स्नायू निकामी होणे याला हृदयविकाराचा झटका असे म्हणतात.

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch