[23 ते 24 ] शोषणाविरुद्ध हक्क

शोषणाविरुद्ध हक्क कलम २३ ते २४ (विशेष ,कायदे,अपवाद),कलम २४ या बद्दल सविस्तर

कलम 23 आणि 24 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क देण्यात आला आहे. भारतामध्ये पूर्वीपासून वेठबिगारी, देवदासी या पद्धती अस्तित्वात होत्या. मजुरांवर जमीदारांचं नियंत्रण होतं. मागासवर्गीय स्त्रियांचं शोषण होत होतं.

कलम 23

कलन २३ माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई (वेठबिगार या शब्दाचा अर्थ=’मोबदल्याविना अनिवार्य काम होय.)

विशेष =हा हक्क नागरिकान व गैर नागरिकांनाही उपलब्ध आहे आणि हा हक्क व्यक्तींना राज्यसंस्था तसेच खाजगी व्यक्तींविरुद्ध संरक्षण उपलब्ध करून देतो. (15(2) ही अशीच तरतूद आहे.

या कलमात कोणत्या बाबीचा समावेश होतो

पुरुष महिला व बालकांची खरेदी-विक्री वस्तू म्हणून करणे. ,महिला व बालकांचा अनैतिक व्यापार वैश्याव्यवसाय ,देवदासी ,गुलामगिरी

वरील कृती केल्यास शिक्षा होते त्य साठी कायदा केला आहे
कायदा = अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) कायदा=१९५६ ला केला
या हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे

१)किमान मजूरी कायदा =१९४८

२)करार कामगार कायदा =१९७०

३) बंधक कामगार व्यवस्था (रद्दबातल) कायदा =१९७६

४)समान पगार कायदा =१९७६

अपवाद
राज्यसंस्था ‘सार्वजनिक प्रयोजनार्थ अनिवार्य सेवा’ लादू शकते व असे करतांना कारणावरून भेदभाव करणार नाही.उदा.=अनिवार्य लष्करी सेवा/समाज सेवा.

कलम 24

कलम 24 = कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई

१४ वर्ष वयाखालील कोणत्याही बालकास, कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरीत ठेवले
जाणार नाही किवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर त्यास लावले जाणार नाही.(म्हणजेच धोक्याच्या नसलेल्या कामावर बालकास लावण्यास प्रतिबंध करत नाही.)

बाल कामगार किवा प्रतिबंध व नियमन कायदा १९८६

FAQ

  • कलम २३ काय आहे

    उत्तर =माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई

  • भारतीय संविधानाच्या किती व्या कलमात शोषणाविरुद्धचा हक्क समावेश केला आहे

    उत्तर = कलम २३ ते २४ यामध्ये शोषणाविरुद्धचा हक्क समावेश केला आहे

  • शोषणाविरुद्ध हक्क म्हणजे काय

    उत्तर = कलम 23 आणि 24 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क देण्यात आला आहे.


Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch