रक्तसंबधी माहिती-मानवी शरीरात किती लिटर रक्त असते

मानवी शरीरात किती लिटर रक्त असते, रक्ताचा सामू ,चपट्यापेशी ,रक्तद्रव्य , कोलेस्टेरॉलचे प्रमाण ,हिमोग्लोबीनचे प्रमाण ,हिपॅरिन काय इत्यादी

मानवी शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. हे वजन त्याच्या एकूण वजनाच्या ९% एवढे असते. रक्ताचे विशिष्ट गुरुत्व १.०३५ ते १.०७५ , रक्ताचा सामू काय?(PH)७.४ , रक्त अल्कधर्मिय आहे.

रक्त सामन्य माहिती

source : google

Haematology म्हणजे रक्ताचा जो अभ्यासकरतो त्यास म्हणतात. रक्तातील साखरेचे साधारण प्रमाण जेवनानंतर १२ तासांनी ८० ते १००mg किवा १००ml रक्त ,रक्तातील कोलेस्टेरॉलचे साधारण प्रमाण ५० ते १८० mg किवा १०० ml

रक्तदान करताना किती रक्त घेतले जाते? रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते.

रक्तातील हिमोग्लोबीनचे साधारण प्रमाण 15.9gm किवा 100ml किंवा १३ ते १४ % ,हिमोग्लोबीनचे प्रमाण १४.५१% असल्यास रक्त १००% आहे असे म्हणतात. हिमोग्लोबीन पुरूषांच्या रक्तात १४.५ % आणि स्त्रियांमध्ये १३ ते १३.५ % एवढे हिमोग्लोबीन असावे लागते. मानवी रक्त लाल का असते? कारण रक्ताला लाल रंग हिमोग्लोबीन मुळे प्राप्त होतो.हिमोग्लोबीनची सर्वात जास्त जवळीक कार्बन मोनॉक्साईड सोबत (Co) असते व त्यानंतर ती ऑक्सिजन सोबत असते.

रक्तामध्ये सोडियमचे धन तर क्लोरिचे (cl) ऋण आयन असतात. रक्त गोठण्याची क्रिया अॅनिमिया ,रक्त हा लाल रंगाचा चिकट द्रव पदार्थ , मानवी रक्ताची चव खारट असते.

कुठल्याही इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईडची निर्मिती होते.

रक्त कशामुळे वाढते

मोड आलेले धान्य,दूध आणि खजूर एकत्रित,गूळ-शेंगदाने एकत्रित,डाळिंब,टोमॅटो,बीट,सफरचंद,आवळा,सुकामेवा,अंजीर,तीळ आणि मक्याचे कणीस यांसारखे पदार्थ खाल्याने रक्त वाढते.

रक्त कमी होण्याची कारणे

शरीरात लोहाची (Iron) कमतरता निर्माण झाल्याने रक्त कमी होतं. परिणाम शरीरात रक्त कमी झाल्यास चक्कर येणं, अशक्तपणा, बेशुद्ध पडणं यासारख्या समस्या निर्माण होतात पण WHO (जागतिक आरोग्य संघटनेच्या) म्हणण्यानुसार जगातले जवळजवळ 80 टक्के लोकांचे कमी होण्याचे कारण लोहाच्या कमतरतेनं ग्रस्त असतात, तर 30 टक्के लोक ॲनिमियाग्रस्त असतात.

रक्ताचा सामू किती

PH म्हणजे एखाद्या पदार्थाचा सामू होय.( म्हणजेच एखाद्या पदार्थामध्ये हायड्रोजन आयनचे किती केंद्रिकरण झाले आहे हे पाहणे म्हणजे सामू होय. एखाद्या पदार्थाचा सामू (PH) पहाण्यासाठी दर्शकाचा उपयोग करतात किंवा PH स्केलचा उपयोग केला जातो.) रक्ताचा सामू (PH) ७.४ असते


PH स्केल ० ते १४ पर्यंत असते.
जर PH ० ते ७ असेल तर तो पदार्थ आम्लधर्मी (Acidic ) असतो. जर PH७ ते १४ असेल तर तो पदार्थ अल्कधर्मी (Basic) असतो.जर PH बरोबर ७ असेल तर तो पदार्थ उदासिन

इतर सामू PH पाण्याचा सामू ७ , नमक PH ७ , समुद्रातील पाणी PH ८.५ ,लाळ PH ६.५ ते ७.५ , दुध PH ६.४ ,मानव मुत्र PH ४.८ ते ८.४ , निंबू PH २.४

रक्त प्रमुख घटक

द्रवभाग ( Liquid ) यामध्ये रक्तद्रव असते. रक्तद्रवामध्ये 90 ते 92% पाणी असते आणि 8 ते 10% नायट्रोजन व इतर क्षार असतात. रक्ताचे प्रमुख दोन घटक बनते पहिला रक्तद्रव्य (plasma) ५५ % आणि दुसरा रक्तपेशी Corpuscles ४५ %

रक्त तयार कसे होते? रक्त हा लाल रक्त पेशी , पांढऱ्या रक्त पेशी आणि बिंबिका यांनी बनलेला व गुंतागुंतीची रचना असलेला जैविक द्रव पदार्थ आहे. रक्ताचा मुख्य घटक पाणी आहे.

रक्तद्रव्य (plasma)

हा फिकट पिवळसर रंगाचा नितळ काहीसा आम्लारिधर्मी द्रव असतो. रक्ताच्या एकूण आकारमानापैकी ५५ टक्के आकारमान रक्तद्रव्याचे असते. त्यात सुमारे ९०% पाणी, ७ % प्रथिनांसारखे घटक आणि ३% असेंद्रिय घटक असतात.

मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते मानवी शरीरामध्ये सरासरी सुमारे 60-70 टक्के पाणी असतं, हे प्रमुख मुख्यत्वे आपल्या वयावर अवलंबून आहे.

हिपॅरिन रक्तद्रव्यात हिपॅरिन असतो आणि प्लीहेमधून स्त्रवत असते त्याचे कार्य रक्त रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठू न देणे म्हणजे मानवी शरीरात रक्त गोटू न देणे

रक्तदान केल्यावर बाटलीत रक्त गोठू नये म्हणून त्यात सोडियम ऑक्झॅलेट किवा पोटॅशीयम अॅक्झेलेत टाकतात.

प्रमुख असेद्रीय घटक रक्तद्रव्यात कोणते ? कॅल्शिअम, सोडिअम आणि पोटॅशिअम हे प्रमुख असेंद्रिय असतात.त्यांचे कार्य चेता आणि स्नायू यांचे कार्य नियंत्रित करतात.

रक्तद्रव्य यात ४ प्रकारचे प्रथिने असतात

  1. ग्लोबुलीन = हे रोगकारकांच्या संक्रमणास विरोध आणि antibodies तयार करतात
  2. अल्ब्युमिन = शरीरातील पाण्याचे समतोल राखण्याचे क्स्र्य करते
  3. फायब्रिनोजेन =रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात
  4. प्रोथ्रोम्बीन =रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात

रक्तपेशी

रक्तपेशी घनभाग असतात रक्तपेशीचे तीन प्रकारचे पेशी असतात यांचे तीन भागात विभाजन केले आहे पहिला Plateletes (चपट्या रक्तपेशी ) दुसरा RBC (लाल रक्तपेशी ) आणि तिसरा WBC (पांढऱ्या रक्तपेशी )

Plateletes/चपट्यापेशी

रक्तबिंबिका किवा रक्तपट्टीका (Blood Platelets or Thrombocytes). पट्यापेशीला ह्या नावाने हि ओळखतात , यांचा आकार आकर अतिशय लहान आणि तबकडीच्या आकाराच्याअसतो व्यास 3 Micron
१micron म्हणजे १०-३ mm होय , संख्या एका घन मिलीमीटरमध्ये संख्या २.५ ते ४ लाख असते. , निर्मिती अस्थिमज्जेमध्ये , कार्य रक्त गोठण्याची क्रिया सुरू करणे ,पांढया रक्तपेशीपेक्षा जास्त व ताबड्या रक्तपेशीपेक्षा संख्येने कमी असतात.

डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड इत्यादी रोगांमध्ये रक्तातील रक्तपट्टीकांचे प्रमाण कमी होते व रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. ,जर चपट रेशीचे प्रमाण वाढले तर थ्रोबोसायथेमिया रक्ताचा कन्सर होतो.

कॅल्शियम ,Vit K,Vit C आणि रक्तबिंबिका रक्त रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत हे जीवनसत्व महत्त्वाचे ठरते

रक्त गोठणे प्रक्रिया

पहिली पायरी
थ्रोम्बीन तयार होते , थ्रोम्बोप्लास्टीन ,प्रोथॉम्बीन आणि कॅल्शियम याचा संयोग होऊन थ्रोम्बीन तयार होते.

दुसऱ्या पायतरीत
फायब्रीन तयार होते , थ्रॉम्बीन आणि फायब्रीनोजन यांच्या संयोगाने फायब्रीन तयार होते.

तिसऱ्या पायरीत
रक्त गोठणे होते , फायब्रीन आणि चपट्या रक्तपेशी यांच्या संयोगाने रक्ताची गोळी तयार होते. यालाच
रक्त गोठणे म्हणतात.

लाल रक्तपेशी

लाल रक्तपेशी यास लोहित पेशी,तांबड्या पेशी असे म्हणतात आणि इंग्रजीत Red Blood Corpuscles (RBC )शास्रीय भाषेत Erythrocytes म्हणतात अधिक माहिती .. RBC

३)पांढऱ्या पेशी

पांढऱ्या पेशीस श्वेतपेशी म्हणतात इंग्रजीत White Blood Corpuscles(WBC)शास्रीयभाषेत Leucocytes म्हणतात. अधिक माहिती ..WBC

Relative Link

FAQ

  1. मानवी शरीरात किती लिटर रक्त असते

    उत्तर =५ ते ६ लिटर

  2. रक्ताला लाल रंग कोणामुळे येते

    उत्तर =हिमोग्लोबीन मुळे

  3. रक्त पेशी किती प्रकारच्या असतात

    उत्तर = ३ प्रकारचे ( १)चपट्या रक्तपेशी २)लाल रक्तपेशी ३)पांढऱ्या रक्तपेशी )

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch