महाराष्ट्रातील नदी प्रणाली नकाशा-महाराष्ट्रातील नद्यांची नावे

महाराष्ट्रातील नदी प्रणाली महारष्ट्रातील भूपृष्ठावर जास्त प्रमाणात प्रभाव आहे. महाराष्ट्रातील नदी प्रणाली नकाशा ,दिशा वाहण्याचे,जलविभाज,दोन मुख्य भाग,व्यापलेले खोरे,उपखोरे(पूर्व वाहिनी ,पश्चिम वाहिनी )

 

Credit : google

महाराष्ट्रातील नदीचे प्रकार

जलप्रणाली प्रकार समावेश
वृक्षकार जलप्रणाली नद्या ,उपनद्या ,नाले ,ओढे यांचा समावेश होतो
केद्र्त्यागी जलप्रणाली सावित्री ,गायत्री,कृष्णा ,कोयना ,या नद्यांचा समावेश होतो
समांतर सह्याद्री पर्वतरांगा आणि कोकणातील सर्व नद्यांचा समावेश होतो
अनिश्चित जलप्रणाली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात अशाप्रकारचे नद्या आढळतात यांचा प्रवाह अनिश्च्त असतो

नद्यांचा मार्गानुसार विभागणी दिशा

विभाग वाहण्याचे दिशा
कोकणातील पूर्व -पश्चिम वाहणारे नद्या
उत्तर महाराष्ट्रात खानदेशात पूर्व -पश्चिम दिशेने वाहणारे नद्या
दखन पठारावर वायव्ये -आग्नेला वाहणारे नद्या
विदर्भातील उत्तर -दक्षिण वाहणारे नद्या

नद्यांची जलविभाजक

१)महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत व काही प्रमाणात सातपुडा पर्वतरांगातील टेकड्या प्रमुख जलविभाजक आहेत

२)सातमाळा -अजिंठा ,हरिश्चंद्र -बालाघाट ,शंभू महादेव डोंगररांगा दुय्यम जलविभाजक

महाराष्ट्रात नद्यांचे दोन मुख्य भाग पडतात

१)पूर्व वाहिनी नदया २)पश्चिम वाहिनी नदया

१) पूर्व वाहिनी नदया महाराष्ट्राचे 75% भाग व्यापतात.

सह्याद्री उगम पावणाऱ्या नद्या गोदावरी ,भीमा ,कृष्णा

सातपुडा पर्वत उगम पावणाऱ्या नद्या वर्धा , वैनगंगा , प्राणहिता

२) पश्चिम वाहिनी नदया महाराष्ट्राचा 25% भाग व्यापतात.

सह्याद्री पर्वतातील नदी कोकणातील सर्व नद्या

सातपुडा पर्वत नदी नर्मदा ,तापी , पूर्णा

प्रमुख नद्याने व्यापलेले खोरे

Credit : google

नदीचे खोरे म्हणजे काय? एखादी नदी पर्वताकडून समुद्राला किंवा एखाद्या सरोवराला मिळेपर्यंत तिला अनेक लहान-मोठ्या नद्या येऊन मिळतात. या सर्व नद्यांना उपनद्या असे म्हणतात. या उपनद्या विस्तृत क्षेत्रातून येतात. या क्षेत्राला नदीचे खोरे किंवा नदीचे पाणलोट क्षेत्र असे म्हणतात.

नदीखोरे %मध्ये
गोदावरी नदीखोरे ४९.५%
भीमा नदी व कृष्णा नदीखोरे २२.६%
तापी व पूर्णा नदीखोरे १६ .७%
कोकणातील नद्या १०.७%
नर्मदा नदीखोरे ०.५%


महाराष्ट्रातील नद्यांची उपखोरी

महाराष्ट्रातील नद्यांच्या खोरे दोन प्रकारे पडतात

१)पूर्व वाहिनी नदी उदा .१)गोदावरी नदी २)भीमा नदी ३)कृष्णा नदी

२)पश्चिम वाहिनी नदी उदा.१) तापी नदी २)कोकण नदी ३)नर्मदा नदी

पूर्व वाहिनी नदी मध्ये समावेश असणारे नदी आणि खोरे

१)गोदावरी नदी २)भीमा नदी ३)कृष्णा नदी(उप खोरे नाही )

गोदावरी नदीचे उप खोरे एकूण ८ आहे

  1. गोदावरी मुख्य खोरे
  2. गोदावरी पूर्णा खोरे
  3. मांजरा खोरे
  4. पैनगंगा
  5. वर्धा खोरे
  6. वैनगंगा
  7. प्राणहिता
  8. इंद्रावती

भीमा नदीचे उप खोरे दोन आहे

  1. भीमा खोरे
  2. सीना खोरे

पश्चिम वाहिनी नदी समावेश असणारे नदी आणि खोरे

१) तापी नदी २)कोकण नदी ३)नर्मदा नदी

तापी नदीचे उप खोरे दोन आहे

  1. तापी-पूर्णा
  2. तापी -मुख्य खोरे

कोकणातील उप खोरे तीन आहे

  1. उत्तर कोकण
  2. मध्य कोकण
  3. दक्षिण कोकण

महाराष्ट्रातील नद्यांची नावे

  • नर्मदा नदी
  • पैनगंगा नदी
  • वर्धा नदी
  • वैनगंगा नदी
  • कृष्णा नदी
  • उल्हास नदी
  • पेंच नदी
  • तापी नदी
  • भीमा नदी
  • गोदावरी नदी

FAQ

Q. नदीचे खोरे म्हणजे काय?

उत्तर =एखादी नदी पर्वताकडून समुद्राला किंवा एखाद्या सरोवराला मिळेपर्यंत तिला अनेक लहान-मोठ्या नद्या येऊन मिळतात त्यास म्हणतात

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch