भारतीय संविधान माहिती

नमस्ते मित्रानो आज  भारतीय संविधान माहिती या लेखामध्ये देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. जानुनघेऊया संविधान बद्दल 

संविधान म्हणजे काय एखाद्या सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार करण्याचे कार्य लोकांच्या प्रतिनिधिक संस्थेमार्फत पार पाडले जाते. घटनेवर चर्चा करून ती स्विकृत करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेल्या अशा संस्थेला ‘संविधान सभा म्हणतात ,भारतीय राज्यघटना, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित वैधानिक विभागाकडून प्रकाशित केली जाते.

शासनव्यवस्था कशी  केंद्रामध्ये कार्यकारी , कायदेमंडळ, न्यायमंडळ आणि राज्यमध्ये कार्यकारी, कायदेमंडळ अशी शासनव्यवस्था असते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर

संविधान माहिती

 Image Source google  

संविधान निर्मितीचा प्रवास

भारतासाठी संविधान सभेची मागणी

स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतासाठी संविधान सभेची मागणी  १९२२ मध्ये महात्मा गांधींनी सर्वप्रथम ‘संविधान सभा’ असा शब्दोल्लेख न करता अशा सभेची मागणी केली.

१९३४ मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय मानवेंद्रनाथ रॉय यांना दिले जाते.
डिसेंबर १९३४ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी केली.

१९३८ मध्ये जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली की, स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी.

१९४० च्या लॉर्ड लिनलिथगो यांच्या ‘ऑगस्ट ऑफर’ द्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना ‘मुख्यतः’ भारतीयांनी तयार करावी, हे तत्व मान्य केले.

१९४२ च्या सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या तरतुदींमध्ये, भारताची घटना ‘पूर्णतः’ भारतीयांनी तयार करावी, हे तत्व मान्य करण्यात आले.
शेवटी, मे १९४६ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ मध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.

संविधान सभेची रचना

कॅबिनेट मिशन प्लॅन (त्रिमंत्री योजना) मधील तरतुदींमध्ये संविधान सभेची रचना 

संविधान सभेत एकूण ३८९ सदस्य असतील. त्यांपैकी २९२ सदस्य ११ ब्रिटिश प्रांतांकडून निवडून दिले जातील, ४ सदस्य चीफ कमीशनरच्या प्रांतांकडून (दिल्ली, अजमेर-मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान) निवडून दिले जातील, तर ९३ सदस्य भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील.

संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे करणे ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने, सदस्यांच्या निवडणूका अप्रत्यक्षपणे ‘एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या‘ पद्धतीने केल्या जातील. हे सदस्य १९३५ च्या कायद्यानुसार नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या प्रांतिक कायदेमंडळांच्या सदस्यांकडून निवडून दिले जातील.

१० लाख लोकसंख्येमागे एक सदस्य, असे प्रमाण राखण्यात येईल. सर्व समुदायांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी जागांचे विभाजन तीन प्रमुख गटांमध्ये केले जाईल शिख, मुस्लिम व साधारण.

निवडणुका

ब्रिटिश प्रांतांना देण्यात आलेल्या २९६ जागांसाठी निवडणुका जुलै-ऑगस्ट १९४६ मध्ये घेण्यात आल्या.यापैकी

  • काँग्रेसने २०८ जागा (केवळ ९ जागा वगळता सर्व साधारण जागा) मिळविल्या.
  • मुस्लिम लिगने ७३ जागा (केवळ ५ जागा वगळता सर्व मुस्लिम जागा) मिळविल्या.
  • उर्वरित १५ जागांमध्ये १) प्रत्येकी एक जागा मिळवणारे पक्ष युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल्ड कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, शिख (गैर-काँग्रेस), आणि कम्युनिस्ट या पक्षांना मिळाली, २) ८ जागा अपक्षांना मिळाल्या.
  • एकूण जागांपैकी १५ जागा महिलांना मिळाल्या.
  • संस्थानिकांच्या ९३ जागा मात्र भरल्या जाऊ शकल्या नाही, कारण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय समाजाच्या सर्व गटांना तिच्यात प्रतिनिधित्व मिळाले: हिंदू, मुस्लिम, शिख, पारसी, ॲग्लो-इंडियन, भारतीय ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला इत्यादी.

एकूण जागांपैकी १५ जागा महिलांना मिळाल्या त्या महिला

  1. विजयालक्ष्मी पंडीत (उत्तरप्रदेश)  प्रथम केंद्रीय अरोग्य कॅबीनेत मंत्री, सिमला येथे स्थानिक स्वराजसंस्था परिषद भरवली , युनोच्या आमसभेचे अध्यक्ष ,महाराष्ट्रचे राज्यपाल
  2. सुचेता कृपलानी (उत्तरप्रदेश ) देशातील पहिली महिला मुख्यमंत्री
  3. राजकुमारी अमृता कौर(केंद्रीय प्रांत ) देशातील पहिली कॅबीनेत मंत्री
  4. सरोजिनी नायडू (बिहार ) देशातील पहिली राज्यपाल ,बुल-बुल ए हिंद
  5. दुर्गाबाई देशमु
  6. रेणुका रे
  7. हंसाबेन मेहता
  8. लीला रॉय
  9. कमला चौधरी
  10. एनी मास्कॅरेन
  11. बेगम रसूल up = एकमेव मुस्लिम महिला
  12. पूर्णीमा बॅनर्जी
  13. दक्षयनी वेलाप्यूदन मद्रास ची =एकमेव दलित स्री
  14. मालती चौधरी ओरिसा =तुफानी हे नाव गांधीने ठेवले होते
  15. अम्मू स्वामिनाथन

संविधानातील बिगर काँग्रेस सदस्य

सरदार हुकूमसिंग कुंझरू श्यामाप्रसाद मुखर्जी
डॉ. आंबेडकर एच.सी. मुखर्जी एम आर जयकर
ठाकूरदास मुखर्जी सचितानंद सिन्हा
एन जी अय्यंगार महावीर त्यागी डॉ. राधाकृष्णन
  के.टी. शहा  


अपवाद महात्मा गांधी व मुहम्मद अली जीना हे संविधान सभेचे सदस्य नवते

घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली

९ डिसेंबर, १९४६ सोमवार रोजी सकाळी ११ वाजता न्यू दिल्ली येथील ‘कॉन्स्टिट्युशन हॉल’मध्ये (सध्याचा ‘सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट हाऊस’) संविधान सभेची पहिली बैठक भरली. मुस्लिम लिगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने लिगचे सदस्य बैठकीला हजर राहू शकले नाही. त्यामुळे केवळ २११ सदस्य बैठकीला हजर होते. अध्यक्ष  डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

सच्चिदानंद सिन्हा यांनी आरोग्याच्या तक्रारीमुळे दुपारनंतर फ्रँक अॅन्थनी यांना तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून कार्य करण्यासाठी नामनिर्देशित केले. या दिवशी हजर असलेल्या २०७ सदस्यांनी आपल्या योग्यता सादर करून रजिस्टरवर सह्या केल्या. त्यांमध्ये ९ महिला सदस्या होत्या.

सुभेच्या  प्रथम यु.एस.ए., चीन आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांकडून आलेल्या सदिच्छा संदेशांचे वाचन केले.

घटना समितीचे पहिले अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांची ११ डिसेंबर १९४६ रोजी  यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून  सर बी.एन. राव (सर बेनेगल नरसिंग राव) यांची नेमणूक  व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून केली. घटनेचा कच्चा मसुदा यांनीच तयार केला होता. त्यात 243 कलमे होती. त्यात दुरुस्ती करून 395 कलमे करण्यात आले.आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधिश बेनेगल नरसिंगरावाचे बंधू सर्वाधिक काळासाठी RBI चे गव्हर्नर (1 जुलै 1949 ते 14 जानेवारी 1957) होते. (बेनेगल रामाराव)म्यानमारची घटनाही यांनीच बनवली.

घटना समितीचे उपाध्यक्ष  एच.सी.मुखर्जी (हरेंद्र कुमार मुखर्जी)  हे होते  २५ जानेवारी १९४७ रोजी त्यांची निवड केली  घटना समितीचे सचीव म्हणून  H.V.R.अयंगार यांची निवड केली 

संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता

जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांच/उद्देश पत्रिका लिहिली १३ डिसेंबर, १९४६ रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत ‘उद्देश पत्रिका’ मांडली. तिच्यामध्ये घटनात्मक संरचनेची मूलतत्वे व तत्वज्ञान देण्यात आलेले होते. २२ जानेवारी, १९४७ रोजी संविधान सभेने तिचा स्विकार केला. ही उद्देश पत्रिका घटना निर्मितीच्या पुढील सर्व टप्प्यांवर मार्गदर्शक ठरली. भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका/ सरनामा (preamble) उद्देशपत्रिकेवरूनच तयार करण्यात आलेला आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा

संविधान सभेच्या रचनेत बदल भारत व पाकिस्तान वेगळे

३ जून, १९४७ रोजी जाहीर करण्यात आलेल्या ‘माऊंटबॅटन योजने च्या आधारावर ५ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या ‘भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, १९४७ ला १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली. या कायद्याने भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण करण्यात येऊन त्यांना आपापली घटना निर्माण करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, १९४७ अन्वये, संविधान सभेच्या बाबतीत तीन बदल करण्यात आले

१) संविधान सभेला पूर्ण सार्वभौम बनविण्यात आले.

परिणाम अधिकार मिळाला त्यामुळे आपल्या मर्जीने कोणत्याही प्रकारची घटना तयार करण्याचा अधिकार प्राप्त झाला. तसेच ब्रिटिश पार्लमेंटने केलेल्या कोणत्याही भारतविषयक कायद्यात बदल करण्याचा किंवा तो रद्द करण्याचा अधिकारही प्राप्त झाला.

२) संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला.

परिणाम संविधान सभेला दोन कार्ये देण्यात आली
१)स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती २) देशासाठी कायदे करणे.ही दोन्ही कामे वेगवेगळ्या दिवशी पार पाडली जात असे.

i) संविधान सभेची बैठक जेव्हा घटना निर्मितीच्या कामासाठी होत असे तेव्हा डॉ. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष म्हणून कार्य करीतअसते

ii)कायदे करण्याच्या कार्यामुळे, संविधान सभा हीच स्वतंत्र भारताची पहिले कायदेमंडळ ठरली. कायदेमंडळ म्हणून कार्य करतांना जी.व्ही.मावळणकर तिचे अध्यक्ष म्हणून कार्य करीत असत.

३) पाकिस्तानात गेलेल्या क्षेत्रातील मुस्लिम लिगचे सदस्य संविधान सभेतून बाहेर पडल्याने भारताच्या संविधान सभेची सदस्यसंख्या २९९ इतकी झाली. त्यांपैकी

२२९ हे पूर्वीच्या ब्रिटिश प्रांतांचे प्रतिनिधी होते आणि ७० संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. प्रांतांपैकी सर्वाधिक प्रतिनिधी संयुक्त प्रांत (५५), मद्रास (४९), बिहार (३६) आणि बाँम्बे (२१) या प्रांतांचे होते. संस्थानिकांपैकी सर्वाधिक प्रतिनिधी म्हैसूर (७) आणि त्रावणकोर (६) या संस्थानांचे होते.

संविधान सभेचे दोन उपाध्यक्ष

भारताच्या फाळणीमुळे संविधान सभेच्या नवीन नियमांनुसार १६ जुलै, १९४७ रोजी पुन्हा दोन उपाध्यक्षांची निवड करण्यात आलीः १.एच.सी. मुखर्जी, आणि २.व्ही.टी. कृष्णमाचारी.

संविधान सभेची इतर कामे वरील दोन कामांव्यतिरिक्त संविधान सभेने पुढील इतर कामे केली

  1. मे १९४९ मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकूलाच्या सदस्यात्वाला अनुमोदन दिले.
  2. २२ जुलै, १९४७ रोजी सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला. त्याचे डिझाईन आंध्र प्रदेशाचे पिंगली वेंकय्या यांनी तयार केले होते.
  3. २४ जानेवारी, १९५० रोजी सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्विकृत केले.

भारताची राज्यघटना कोणत्या रोजी स्वीकारण्यात आली

भारताची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना स्विकृत करण्यात आली.मूळ घटनेत प्रास्ताविका, २२ भाग, ३९५ कलमे व ८ अनुसूचींचा समावेश होता.

संविधान सभेची अखेरची बैठक कधी झाली

संविधान सभेची अखेरची बैठक कधी झाली २४ जानेवारी १९५० रोजी झाली त्यावेळेस उपस्थित असलेल्या २८४ सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या.
(इतर माहिती घटनेच्या तीन प्रतींवर सह्या करण्यात आल्याः १. इंग्रजीतील छापील प्रत, २. इंग्रजीतील हस्तलिखित प्रत, आणि हिंदीतील हस्तलिखित प्रत. सह्या होत असतांना बाहेर झिरझिरपाऊस पडत होता, हा एक शुभसंकेत असल्याचा अर्थ लावण्यात आला. घटनेवर सर्वप्रथम जवाहरलाल नेहरूंनी सही केली, अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी सर्वात शेवटी मात्र नेहरूंच्या सहीच्या वर स्वतःची स्वाक्षरी केली. त्यामुळे शेवटची सही फिरोझ गांधी यांची आहे. या दिवसाच्या बैठकीचा शेवट श्रीमती पुर्णीमा बॅनर्जी यांनी गायलेल्या ‘जन गण मन’ यां राष्ट्रगीताने आणि पंडीत लक्ष्मीकांत मैत्र यांनी गायलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाने झाला.)

२४ जानेवारी, १९५० रोजी झालेल्या संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत २६ जानेवारी पासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले. तसेच निवडणूका होईपर्यंत भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक करण्यात आली.

भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली

भारतीय राज्यघटना  २६ जानेवारी १९५० पासून अमलात आली घटनेचा सुरू झाला. हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे डिसेंबर, १९२९ च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पूर्ण स्वराज्य ठरावानुसार २६ जानेवारी,१९३० हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. २६ जानेवारी १९५० हा दिवस ‘घटनेच्या प्रारंभाचा दिन’ म्हणून ओळखण्यात येतो व ‘गणराज्य दिन‘ म्हणून साजरा केला जातो.

भारतीय घटना निर्मिती साठी किती खर्च आला होता

भारतीय घटना निर्मितीसाठी ६४ लाख रूपये खर्च आला होता आणि त्यला बनण्यास २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवसांच्या कालावधीत घटना तयार करण्यात आली. या कालावधीत संविधान सभेची ११ सत्रे झाली. त्यांपैकी ४ सत्रे स्वातंत्र्यापूर्वी तर ७ सत्रे स्वातंत्र्यानंतर झाली. ११ सत्रांदरम्यान संविधान सभेने १६६ दिवस काम केले, त्यापैकी ११४ दिवस घटनेच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी वापरण्यात आले. तसेच घटनाकर्त्यांनी

मसुदा समिती (Drafting Committee)

संविधान सभेने घटना निर्मितीची वेगवेगळी कामे पूर्ण करण्यासाठी विविध समित्यांची निर्मिती केली. त्यापैकी मसुदा समिती महत्वाची आहे 

घटनेची सजावट

कार्य प्रेम बिहारी नारायण = या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेल्या घटनेच्या लिखाणाचे कार्य जवाहरलाल नेहरूंनी सोपविल्यानुसार प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी केले. घटनेचे हे मुळ हस्तलिखित १६x२२ इंच आकाराच्याकागदावर लिहिण्यात आले असून त्यामध्ये २५१ पाने आहेत व त्यांचे एकूण वजन ३.७५ किग्रॅ इतके आहे. या लिखाणासाठी प्रेमबिहारींना सुमारे ६ महिने लागले. या हस्तलिखिताच्या प्रत्येक पानाची चित्ररूप सजावट (illusration) करण्याचे कार्य शांतीनिकेतनच्या नंदलाल बोस यांना देण्यात आले.

नंदलाल बोस व त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक पानाच्या बॉर्डरची डिझाईन व त्यामध्ये सुंदर कलात्मक आकृत्या/चित्रे काढण्याचे कार्य केले. त्यांनी घटनेच्या प्रत्येक भागाच्या सुरूवातीला देवदेवता आणि प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींची चित्रे काढली. उदा. विजयी होऊन परतणारे भगवान राम, लक्ष्मण व सीता, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, गुरु गोविंद सिंह, सम्राट अकबर, शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस इत्यादी.

नंदलाल बोस यांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख होते व्योहार राममनोहर सिन्हा. त्यांनी अनेक पानांवरील चित्रांबरोबरच घटनेची प्रस्ताविका आपल्या हाताने लिहून त्या पानाची संपूर्ण सजावट केली. प्रास्ताविकेचे हे पान कलेचे एक मास्टरपीस म्हणून ओळखले जाते. ही मुळची हस्तलिखित घटना सध्या संसदेच्या लायब्ररीमध्ये हेलियमने भरलेल्या काचेच्या डब्यात ठेवलेली आहे.

FAQ

Q.भारतीय घटना निर्मिती साठी किती खर्च आला होता

उत्तर = भारतीय घटना निर्मितीसाठी ६४ लाख रूपये खर्च आला

Q. संविधान म्हणजे काय?

उत्तर = संविधान म्हणजे काय एखाद्या सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार करण्याचे कार्य लोकांच्या प्रतिनिधिक संस्थेमार्फत पार पाडले जाते. घटनेवर चर्चा करून ती स्विकृत करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेल्या अशा संस्थेला ‘संविधान सभा म्हणतात

Relative Link 

संविधान यावर आयोगाने विचारलेले प्रश्न

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch