भारतीय संविधान उद्देशिका मराठी माहिती-Samvidhan Prastavna In Marathi

भारतीय संविधान उद्देशिका मराठी प्रस्ताविकेचे महत्त्व ,प्रताविका घटनेचा भाग आहे किव्हा नाही , विचारवंतांचे मत इत्यादी संविधान उद्देशिका बद्दल माहिती

उद्देशीका म्हणजेराज्यघटनेची प्रारंभिक माहिती होय. उद्देशिकालाच प्रस्तावना किवा सरनामा देखील म्हणतात

उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला 13 डिसेंबर 1946 रोजी मांडले. आणि 22 जाने. 1947 रोजी मान्यता मिळाली.अमेरिकेच्या घटनेत जगात सर्वप्रथम प्रास्ताविका देण्यात आली आहे. तेथूनच आपण ही संकल्पना घेतली आहे.प्रस्तावना ही एकमेव बाब अशी आहे की ती संविधान सभेत चर्चा व मतदानाविना पारित करण्यात आली आहे.

संविधान उद्देशिका :

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय,
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य,
दर्जाची व संधीची समानता, .
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून,
आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, धर्मविरोधीही नाही, धर्मनिरपेक्ष आहे. भारतीय घटना धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते.

भारत असा पहिला देश आहे  ‘पहिल्या निवडणूका पासूनच सर्वच नागरिकांना मताधिकार देणारा.’काँग्रेसच्या १९५५ मधील आवडी अधिवेशनाचे अध्यक्ष U.N. ढेंबर यात समाजवादी समाजरचनेचे तत्त्व स्विकारण्यात आले.

घटनेत समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यात आला नाही.

भारत गणराज्य आहे.

प्रस्ताविका ही जरी घटनेची प्रस्तावना असली तरी संपूर्ण घटनेनंतर ती अधिनियमित करण्यात आली.
प्रास्ताविका भारतास सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही व गणराज्य असल्याचे घोषित करते. हेच भारतीय जनतेने स्वतःसाठी स्विकारलेले आदर्श आहेत.भारतीय राज्याचे स्वरूप किवा आदर्श आहे

संविधान उद्देशिका क्रम

१) न्याय -स्वातंत्र्य-समानता -बंधुता
२) विचार – अभियुक्ती – विश्वास – श्रध्दा – उपासना /पूजा

३) सार्वभौम -समाजवादी – धर्मनिरपेक्ष – लोकशाही – गणराज्य

संविधान उद्देशिका महत्व

१) प्रास्ताविका आपली घटना ज्या मूलभूत तत्वज्ञानावर म्हणजे राजकीय, नैतिक आणि धार्मिक आधारित आहे त्यांचे प्रदर्शन करते.
२) प्रास्ताविका भारतीय जनतेने स्वतःसाठी स्विकारलेले आदर्श प्रदर्शित करते.
३) घटनेतील प्राधिकारांचा अंतिम स्त्रोत भारतीय जनता आहे हे प्रास्ताविकेतून स्पष्ट होते.

संविधान उद्देशिका घटनेचा भाग आहे किवा नाही

बेरूबारी युनियन १९६० मतानुसार

सर्वोच्च न्यायालयाने बेरूबारी युनियन केसमध्ये प्रास्ताविका घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले.
पण एकापेक्षा अधिक अर्थ निघत असल्यास प्रास्ताविकेतील उद्दिष्टांचा आधार घेता येऊ शकेल असे सांगण्यात आले.

केशवानंद भारती १९७३

केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचे मत फेटाळून लावले आणि प्रास्ताविका घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविका अत्यंत महत्वाचा भाग असून घटनेचा अर्थ प्रास्ताविकेतील उदात्त दूरदृष्टीच्या संदर्भातच लावण्याचे मत

LIC १९९५ मत अविभाज्य भाग

भारतीय जीवन विमा केसमध्येही प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

४) घटना निर्मात्यांनी सुद्धा प्रास्ताविकेस घटनेचा भाग असल्याचे मानले होते.

पण प्रास्ताविकेबद्दल या दोन बाबी महत्वाच्या आहेत

  1. प्रास्ताविका ही कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्त्रोतही नाही व ती त्यांवर प्रतिबंधही आणत नाही.
  2. प्रास्ताविका न्यायप्रविष्ट नाही म्हणजेच तिच्यातील तरतुदींचा भंग जाल्यास हक्क म्हणून न्यायालयात दाद मागता येत नाही

सर्वोच्च न्यायालय मत

कलम ३६८ अंतर्गत प्रास्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते का, हा मुद्दा प्रथम केशवानंद भारती केसमध्ये निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयाने म्हणतात – प्रास्ताविका घटनेचा भाग असल्याने तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. मात्र त्याद्वारे घटनेच्या ‘मूलभूत संरचने’त बदल करता येणार नाही.

प्रास्ताविकेत आतापर्यंत एकदाच सुधारणा करण्यात आली आहे.
घटना (४२ वी सुधारणा) कायदा, १९७६ अन्वये घटनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द टाकण्यात आले.

संविधान उद्देशिका बद्दल विचारवंतांचे मत

विचारवंत विचारवांताचे मत
के. एम. मुन्शी राजकीय कुंडली
एम. व्ही. पायली उत्कृष्ट गद्य-काव्य
पंडीत ठाकुरदास भार्गव अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा
आचार्य जे. बी. कृपलानी कल्याणकारी राज्याची अचंबीत करणारी तत्त्वे
न्या. सिक्री अत्यंत महत्त्वपूर्ण भाग
बेरुबारी संदर्भ खटला घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली
नाना पालखीवाला घटनेचे ओळखपत्र
अर्नेस्ट बार्कर महत्वाची नोंद
  1. प्र.संविधान उद्देशिका घटनेचा भाग आहे ?

    उत्तर = आहे.

  2. प्र.राजकीय कुंडली असे सरनामाला कोणी म्हटले

    उत्तर=के. एम. मुन्शी यांनी म्हटले आहे.

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch