प्रश्न संविधान निर्मिती ,वैशिष्टे फक्त ASO आयोगाने विचारलेले

प्रश्न संविधान निर्मिती व वैशिष्टे या घटकावर आयोगाचे प्रश्न ASO( combine ) च्या पेपरमध्ये आलेले २०११-ते २०१९ पर्यंत पूर्व व मुख्य या परीक्षेत विचारलेले प्रश्न समावेश केलेला आहे

ASO प्रश्न -उत्तरे पूर्व +मुख्य

१) भारतीय राज्यघटनेने स्वीकाराळेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो ? ( ASST पूर्व २०११ )

अ) राष्ट्रपती
ब) राज्यपाल
क) पंतप्रधान
ड) मुख्यमंत्री

२)———- हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते ?(asst .२०११)

अ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
ब)वल्लभभाई पटेल
क)डॉ.राजेंद्र प्रसाद
ड)पंडित नेहरू

३)खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे ?(asst. पूर्व २०११)

अ)सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते
ब)सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते
क)यामध्ये केवळ एकच सरकार असते
ड)यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात

४ ) भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते ?(Asst मुख्य २०१२)

अ)डॉ.राजेंद्र प्रसाद
ब)डॉ.बी.आर .आंबेडकर
क)जे.पी.कृपलानी
ड)सरदार वल्लभभाई पटेल

५ )संघीय शासन व्यवस्थेमध्ये ?(Asst.पूर्व २०१२)

अ)सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते
ब)सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते
क)यामध्ये केवळ एकच सरकार असते
ड)यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात

६)खाली दिलेली भारतीय राज्यघतनेची वैशिष्ट्य आणि त्यासमोर दिलेले स्रोत तपासून योग्य पर्याय निवडा ?
(Asst.मुख्य २०१२ )

अ)कॅबिनेत व्यवस्था –फ्रान्स
ब)मुलभूत हक्क –सोव्हित युनियन
क)उर्वरित अधिकार –ऑस्ट्रेलिया
ड)मार्गदर्शक तत्वे – जर्मनी

१)अ आणि ब बरोबर ,तर क आणि ड चूक आहेत
२)अ , क , ड ,बरोबर तर ब चूक आहे
३)सगळेच चूक आहेत
४)क आणि ब बरोबर ,तर अ आणि ब चूक आहेत

७ ) खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या ?(Asst.पूर्व २०१३ )

अ)विजया लक्ष्मी पंडित
ब)सुब्बलक्ष्मी
क)सुचेता कृपलानी
ड)सरोजिनी नायडू
पर्याय उत्तरे
१)अ आणि ब केवळ
२) अ ,क, आणि ड,
३)ब, क ,आणि ड
४)अ , ब आणि ड

८)भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबबतच्या खालील विधानांच्या विचार करा : (Asst.पूर्व २०१३)

अ)संसदीय लोकशाही = ब्रिटीश राज्यघटना
ब)संघराज्य = अमेरिकेची राज्यघटना
क)मार्गदर्शक तत्वे = आयर्लंड राज्यघटना
ड)सामायिक सूची = ऑस्ट्रोलीयाची राज्यघटना
आता बरोबर असलेले विधाने निवडा

१)अ एकमेव बरोबर आहे .
२)अ आणि ब बरोबर आहे
३)अ,ब आणि क बरोबर आहेत
४)सर्व बरोबर आहेत .

९)सूची “अ” व सूची “ब ” मधील जोड्या जुळवा (Asst.मुख्य २०१३ )

“अ “(तरतुदी) “ब”(स्रोत )
अ)कायद्याचे राज्ये i)ऑस्त्रोलीया
ब)घटनादुरुस्ती ii)इंग्लंड
क)समवर्ती सूची iii)दक्षिण आफ्रिका
अ ब क
ii iii i
i ii iii
iii ii i
iii i ii

१०)साविदन सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बरोबर जुळत नाही ?(Asst . मुख्य २०१३ )

समिती अध्यक्ष


अ )सुकाणू समिती =डॉ. राजेंद्र प्रसाद
ब )कामकाज समिती = के. एम .मुन्शी
क )मुलभूत हक्क उपसमिती = जे. बी. कृपलानी
ड )अल्पसंख्याक उपसमिती = मौलाना अब्दुल कलाम आझाद

११) भारतीय साविधानाचे वैशिष्ट्ये आणि त्यांच्या स्रोतांच्या योग्य जोड्या लावा.(asst. मुख्य २०१४ )

अ) एकेरी नागरीत्व i) ब्रिटीश राज्यघटना
ब)मुलभूत हक्क ii)फ्रान्स राज्यघटना
क)स्वातंत्र ,समता,बंदुता iii)कॅनेडीयन राज्यघटना
ड)उर्वरित अधिकार iv)अमेरिकेची राज्यघटना

अ ब क ड
iv iii i ii
i iv ii iii
iii i iv ii
i iii iv ii
१२)राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ?(asst.पूर्व २०१४ )

अ) बिहार
ब)केंद्रीय प्रांत
क)बॉम्बे
ड)पंजाब
१३) ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीचे पहिली बैठक घेण्यात आली . या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले ?(Asst. पूर्व २०१४)

अ) डॉ.बी. आर .आंबेडकर
ब) डॉ.राजेंद्र प्रसाद
क)डॉ. सचीनदानंद सिन्हा
ड)पंडित जवाहरलाल नेहरू
१४)भारताच्या संघराज्यात्म्क पद्धती बाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही ?(Asst. पूर्व २०१५)

अ) राज्यघटनेत ‘संघराज्य ‘ हा शब्दप्रयोग कोठेही केलेला नाही .
ब)संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही .
क)अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वांचा भंग करतात.
ड)राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिकन पद्धती प्रमाणे स्वीकारली आहे .
१५)संविधान सभे बाबत खालीलपैकी कोणतेही विधाने सत्य आहेत ?(Asst. पूर्व २०१५ )

अ)ती प्रौढ मताधिकारी आधारित नव्हती .
ब)ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती .
क)ब्रिटीश भारतास २९२ जागा देण्यात आहे होते
१६) भारतात खालीलपैकी कोणत्या तरतूदी या संघराज्य पध्दतीच्या विरोधी आहेत ? (Asst मुख्य २०१३)

अ) राज्ये अविनाशी नाहीत.
क) अखिल भारतीय सेवा
ब) आणीबाणी तरतूदी
ड) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व
इ) राष्ट्रपतीद्वारे राज्यांच्या विधेयकावर नकाराधिकार
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब, क, ड
३) अ, ब, क, इ
२) ब, क, ड, इ
४) ब, क, इ
१७) भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली
(Asst मुख्य २०१६)


अ ) ११
ब ) १६
क) ११४
ड ) १६५
१८) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. (Asst मुख्य २०१६ )

अ ) घटना समितीची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी भरली.

ब ) डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडले गेले.

क ) जवाहरला नेहरूंनी १३ डिसेंबर १९४६ रोजी ‘उद्दिष्ठांचा ठराव मांडला.

ड ) ‘उद्दिष्ठांचा ठराव’ हा एक मताने २६ जानेवारी १९४७ रोजी मंजूर झाला.
१९) खालील विधाने विचारात घ्या (Asst. मुख्य २०१७)

अ) भारतीय संघराज्य हे राज्यांमधील कराराचा परिणाम आहे..

(ब) ‘नाशवंत घटकांचा अविनाशी संघ’ (Indestrictible Union of Destructible Units) असे भारतीय संघराज्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे.

(क) अविनाशी राज्यांनी बनलेला एक अविनाशी संघ’ (Indestrictible Union composed of Indestructible States) असे अमेरिकन संघराज्याबाबत त्यांच्या सर्वोच न्यायालयाने वर्णन केले आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
१) अ, ब
२) ब
३) ब. क
४) क
२०) विधान
(A) भारत सरकार कायदा, १९३५ अनुसार शेषाधिकार केन्द्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. कारण
(R) भारत सरकार कायदा, १९३५ अनुसार संघराज्यीय, प्रांतिक आणि समवर्ती अशा तीन सूच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती. (Asst. मुख्य २०१७)


१) A आणि R दोन्हीही बरोबर असून R हे ये योग्य स्पष्टीकरण आहे.
(२) A आणि R दोन्हीही बरोबर आहेत परंतु R हे A चे योग्यस्पष्टीकरण नाही.
३) A बरोबर आहे तर R चूक आहे.
४) A चूक आहे तर R बरोबर आहे.
२१) १५ ऑगस्ट १९४३ पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा, १९३५ अंतर्गत ……. भाग ………. विभाग (कलमे) भाग आणि परिशिष्टे होती. (ASOमुख्य २०१८ )

१) १५, ३२५, १२
२) १४, ३२१, १०
३) १६, ३२०, ८
४) १७, ३२४, ९
२२ ) भारताच्या फाळणीनंतर घटनासमितीच्या संख्येबाबतच्या विधानांचा विचार करा. (ASOमुख्य २०१८)

अ) समितीची सदस्यसंख्या २९९ पर्यंत खाली आली.
ब) संस्थानांच्या प्रतिनिधींची संख्या ७० पर्यंत कमी झाली.
क) प्रातांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या २२९ इतकी कमी झाली.
वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?
१) केवळ अ
२) केवळ अ आणि ब
३) केवळ ब आणि क
४) अ, ब आणि क
२३ ) भारतीय संघराज्यवादासंबंधी न्यायालयान लावलेल्या अर्थाबद्द खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
(विशेषत: एस. आर. बोमई वि. भारत सरकार खटल्याच्या संदर्भात) (ASOमुख्य २०१८)


अ ) न्यायमूर्ती अहमदी यांनी असे मत व्यक्त केले की, भारतीय राज्यघटनेचे संघराज्यात्मक राज्याऐवजी निमसंघराज्य अथवा एकात्म असे वर्णन करणे अधिक योग्य ठरेल.

ब ) न्यायमूर्ती सावंत आणि न्यायमूर्ती कुलदिप सिंग यांनी लोकशाही आणि संघराज्य हे भारतीय राज्यघटनेचे अत्यावश्यक वैशिष्ट्ये असल्याचे म्हटले आहे.

क ) न्यायमूर्ती जीवन रेड्डी आणि न्यायमूर्ती अग्रवाल यांनी असे मत व्यक्त केले की, संघराज्य अथवा संघराज्यात्मक शासन याला निश्चित असा अर्थ नाही.

ड ) वरीलपैकी एकही नाही
२४ ) भारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मुलतत्वे दिसून येतात? पर्याय निवडा.
(ASOमुख्य २०१८ )

अ) दुहेरी शासन व्यवस्था
ब) अधिकारांचे वाटप
क) एकेरी नागरिकत्व
इ) स्वतंत्र न्यायमंडळ
ड) द्विगृही कायदेमंडळ
फ) आणीबाणी विषयक तरतूदी
पर्यायी उत्तरे
1)फक्त अ, ब, क, फ
2)फक्त अ,ब, ड, इ
3)फक्त क, ड, इ, फ
4)वरील सर्व
२५ ) भारतीय संविधानातील विविध स्रोताशी संबंधित यादी-I व यादी II जुळवुन दिलेल्या उत्तरातील योग्य पर्याय निवडा.
(ASST मुख्य- 2019)


स्तंभ – I स्तंभ – II
a) मुलभूत हक्क I) आयर्लंडची राज्यघटना
b) संसदीय लोकशाही II) अमेरिकेची राज्यघटना
c) संसदेचे संयुक्त III) ब्रिटीश राज्यघटना
अधिवेशन
d) राज्याच्या धोरणाची
मार्गदर्शक तत्वे. IV) ऑस्ट्रेलियाची राज्यघटना
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
II III I IV
IV III II I
II III IV I
III I II IV

संविधान निर्मिती स्पष्टीकरण

उत्तरे

१)क २)क ३)ब ४)अ ५)ब ६)३ ७)२ ८)४ ९)१ १०)ड ११)२ १२)ब १३)क
१४)ड १५)३ 16)३ १७)ब १८)अ १९)३ 20)४ 21)ब २२)४ २३)ड २४)२ २५)३  
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch