सूर्यमालेतील ग्रहांची माहिती

सूर्यमालेतील ग्रहांची माहिती या मध्ये ८ ग्रह बुध ,शुक्र,पृथ्वी,मंगळ ,गुरु, शनी, युरेनस ,व नेपच्यून व चंद्र,धुमकेतू प्लुटो यांची माहिती

खगोलशास्त्र या खूप ह्याचे विस्तार झालेले दिसून येते आज मानव दुसऱ्या ग्रहावर जावून तेथील माहिती मिळवू लागला आहे. खोगोल शास्रबद्दल माहिती करून घेणे खूप महत्वाचे आहे. त्यामध्ये आपणास खुप काही समजून येथे चला तर जाणून घेऊया खगोलशास्त्र बद्दल माहिती ..

सूर्यकुल 

सुर्यकुल म्हणजे सूर्याभोवती ग्रह आणि काही अवकाश वस्तू फिरता त्यास म्हणतात उदा.८ ग्रह ,प्लुटो ,बुटके ग्रह इत्यादी .

सूर्यकुलाचे स्वरूप कसे  तारा = सूर्य = ग्रह = उपग्रह = लहान वस्तू = लघुग्रह = धुमकेतू सारखे वस्तू

विश्व म्हणजे लक्षावधी ताऱ्यांचा समूह होय.(विश्वामध्ये १०० अब्जापेक्षा जास्त तारामंडले आहे.) तारामंडले यास आकाशगंगा(The Milk Way) किव्हा गॅलक्षी (Galaxies) असे म्हणतात .

परिवलन म्हणजे ग्रहाचे स्वत:भोवतीफिरणे होय. (परीवलनासाठी लागणाऱ्या कालावधीला आपण दिवस म्हणतो ) आणि  परिभ्रमण म्हणजे  ग्रहाचे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणे म्हणजे होय ( परिभ्रमणसाठी लागणारे कालावधीस वर्ष असे म्हणतात .)

  • पूर्वेकडून पश्चिमकडे परिभ्रमण करणारे ग्रह शुक्र व युरेनस हे आहे.
  • अंतर्गत ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे आहे. आणि बहिगर्त ग्रह गुरु शनी ,नेपच्यून , युरेनस हे आहे.
  • सूर्यापासून अंतरानुसार दूर= बुध ,शुक्र,पृथ्वी,मंगळ ,गुरु, शनी, युरेनस ,व नेपच्यून
  • पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रह= शुक्र, मंगळ, बुध ,गुरु, शनी, युरेनस ,व नेपच्यून
  • आकारानुसार उतरत्या क्रमाने=गुरु,शनी,युरेनस, नेपच्यून, पुथ्वी, शुक्र,मंगळ,व बुध

सूर्यमालेतील ग्रहांची नावे

ग्रह बुध ,शुक्र,पृथ्वी,मंगळ ,गुरु, शनी, युरेनस ,व नेपच्यून यांच्याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहू 

 बुध ग्रह

बुध व्यास ४८४९.६ कि.मी. चंद्र नाही ,सूर्यापासून सरासरीअंतर ५७.६ दशलक्ष कि.मी. आहे  ,सूर्याभोवती प्रदक्षिणेचा काळ ८८ दिवस लागेते 

वैशिष्ट्य हा ग्रह सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. सुर्मालेतील सर्वात लहान ग्रह आहे ( पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडासा मोटा येईल ) ,दर तासाला १,७६,००० कि.मी. वेगाने लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो ,बुधावर वातावरण नाही.त्याचा परिणाम दिवसा कडक ऊन आणि रात्री गोठविणारी थंडी  

इतर माहिती  या ग्रहास सूर्यास्त किवा सूर्योदय वेळी क्षितिजावर पाहता येतो. बुधला स्वत:भोवती एकफेरीमारण्यास ५९ दिवस लागतात.(परिवलन काळ ) परिभ्रमण काळ ८८ दिवसाचा असतो.(सर्वात कमी भ्रमण काळ )

शुक्र ग्रहा

शुक्र ग्रहचा व्यास १२,०३२ कि.मी आहे चंद्र  नाही  सूर्यापासून सरासरी अंतर  १०७.५२ दशलक्ष कि.मी. ,सूर्याभोवती प्रदक्षिणेचा काळ  २२५ दिवस परिवलन काळ २४३ दिवस आहे. परिभ्रमण काळ २२५ दिवस आहे. morning star किवा evening star असे म्हणतात कारण सकाळी पूर्वेकडे आणि सायंकाळी पश्चिमेस दिसतो म्हणून चंद्राला जशा कला असतात तशा शुक्राच्या हि कला असतात

वैशिष्ट्य

  • शुक्र हा पृथ्वीला हा पृथ्वीला सार्वत जवळचा ग्रह ,
  • चंद्र व सूर्य यांच्यानंतर सर्वात चमकदार होय ,
  • पृथ्वी पेक्षा दुप्पट आकार आणि वस्तुमान
  • हा ग्रह स्वत:भोवती पूर्वेकडून –पश्चिमकडे फिरतो.
  • सपाट ,खडकाळ ,मैदान  आणि ज्वालामुखी क्रियेची चिन्हे
  • शुक्र ग्रहाभोवती सल्फुरिक असिडस् चे ढग आहेत ते पिवळ्या रंगाचे आहेत.
  • कार्बन डायऑक्साईड आवरण असते.

 पृथ्वी ग्रह

पृथ्वीचीग्रहचे  वैशिष्टे मध्येम तापमान ,ऑक्सिजन अस्तित्व ,पाण्याची उपलब्धता ,सुर्यकुलातील एकमेव पृथ्वी ग्रहावर जीवसृष्टी ,पृथ्वी गोल आहे हि संकल्पान ग्रीक लोकांनी मांडली. व्यास  १२,७३२.२ कि.मी चंद्र   १ आहे.

  • सूर्यापासून सरासरी अंतर :- १४८.८ दशलक्ष कि.मी.
  • सूर्याभोवती प्रदक्षिणेचा काळ :- ३६५ दिवस
  • पृथ्वीची सरारी त्रिज्या ६३७१ कि.मी. आहे.
  • पृथ्वीची सरारी व्यास १२७४२ की,मी. आहे.
  • पृथ्वीची ध्रुवीय व्यास १२७१४ की,मी,
  • पृथ्वीची विषुववृत्तीय व्यास १२७५६ की.मी.
  • पृथ्वीची ध्रुवीय परीघ ४०,००९ की.मी.
  • पृथ्वीची विषुवत्ती परीघ ४०,०७७ की.मी.   
  • विषुववृत्तीय व्यास १२,७५६ कि.मी. आणि ध्रुवीय व्यास आहे १२,७१४ कि.मी. यांच्यातील फरक ४२ कि.मी.आहे.
  • विषुववृत्तीय परीघ 40,०७७ कि.मी. आणि ध्रुवीय परीघ आहे ४०,००९ कि.मी. यांच्यातील फरक ६८ कि.मी.आहे.
  • एकूण पृष्टीय क्षेत्रफळ ५१० दशलक्ष आहे (भूखंडे २९.२२% आणि महासागर ७०.७८%)
  • वय ४.६ अब्ज वर्ष
  • भूपृष्ठावरील सर्वात उंच ठिकाण एव्हरेस्ट ज्याची उंची ८,८५० मी. आहे.
  • भूपृष्ठावरील सर्वात निम्म ठिकाण मृत समुद्र ज्याची खोली -३९७ मी. आहे.
  • महासागरची सरासरी खोली ३,७३० मी आहे.( महासागरची सर्वात मोठी खोली मारियाना गर्त  ज्याची खोली ११,०२२ मी.)
  • पृष्टीय सरासरी तापमान १४ अंश से. आहे.(सर्वात जास्त तापमान ५८ अंश से.अल अझीझीयाह , लिबिया  आणि सर्वात कमी तापमान – ८९.६ अंश )
  • ध्रुवीय अक्षाभोवतीचा परिभ्रमण काल २३ तास ५६ मी. ४.०९ सेकंद आहे.

 मंगळ ग्रह

वैशिष्ट्य मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे कारण त्यांच्यावर लोहखनिजाचे साठे आहे. उजाड उपग्रह आणि दगडधोंडे (सर्वात उंच पर्वत Nix-Olympia) आहे म्हणतात माउंट एव्हरेस्ट पेक्षा तीन पट मोठा आहे. या ग्रहावर पूर्वी जीवसृष्टी होती हे पुरावे मिळाले आहे. कोणे एके काळी जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी वैशिष्ट्यांचे अस्तित्व ,पूर्वी पाण्याच्या अस्तित्वाचा खुणा

मंगळ ग्रहाचा व्यास  ६७७५५.२ कि.मी ,चंद्र २ ,सूर्यापासून सरासरीअंतर :- २२५.६ दशलक्ष कि.मी. सूर्याभोवती प्रदक्षिणेचा काळ :- ६७८ दिवस

  • परिवलन काळ २४.७ दिवस आहे.
  • परिभ्रमण काळ ६८६ दिवस आहे.
  • याला दोन उपग्रह आहे. ( डीमोस आणि थोबोस )डीमोस हा सर्वात छोटा उपग्रह असून १९७६ मध्ये व्हाकिंग यानाने मंगळाचा अभ्यास केला आहे.
  • मंगळाचे अभ्यास करणारे मोहिमा= Mars odyssey Mission-2 (2003 ) , oporchunity (2004)  

गुरु ग्रह

वैशिष्ट्य  सूर्यकुलामधील सर्वात  मोठा गुरु ग्रह आहे.

गुरुचे अंतर्गत तापमान २५००० अंश से. आहे.सूर्यकुलामधील सर्वात मोठ्या ग्रहावरील ग्रेट रेड स्पॉट चे दोन पायोनिअर उपग्रहाद्वारे छायाचित्र प्राप्त व्हायेजर- I आणि II ने मेघाचे संक्षुब्ध आच्छादनचे आवर्तन धाखावले ,ध्रवीय वलय , तीन नवीन चंद्र आणि चंद्रावर ज्वालामुखी धाखावले आहे.

याला उपग्रह आहे.उदा. आयो, युरेप्पा , कॅलीस्टो,आलमाठीया, हिमालीया , गानिमिड (गानिमिड हा ग्रह त्यांच्यापैकी सर्वात मोठा आहे.आणि विशेषस म्हणजे सूर्यमालेतील देखील )

गुरुचे  व्यास  १,४१,९६८ कि.मी ,चंद्र ७९ ,सूर्यापासून सरासरीअंतर  ७७२.८ दशलक्ष कि.मी. ,सूर्याभोवती प्रदक्षिणेचा काळ :- ११-९ वर्ष  

  • परिवलन काळ ९.५० मिनिट आहे.( सर्व ग्रहांपैकी सर्वात कमी)
  • परिभ्रमण काळ ११.९ वर्ष आहे.
  • १६ जुलै १९९४ ला या ग्रहावर सुमेकर लेव्ही -९ हा धुमकेतू आढळला होता.

शनी ग्रह

वैशिष्ट्य व्हायेजर- I यांना संशोधनांती असे समजून आले की शनीची सोनेरी वलये (कडा) हजारो तरंग आणि सर्पिल पट्ट्यांनी निर्माण झालेले असून त्यांची जाडी फक्त सुमारे ३५ मीटर आहे.

शनी ग्रह याला महासागरात टाकले तर हा तरंगतो असे म्हणतात कारण याची घनता कमी आहे. शनी हा केवळ डोळ्याने दिसणारा शेवटचा ग्रह आहे. टायटन चंद्रावर नायट्रोजन वातावरण आणि हाड्रोकार्बन वातावरण आणि हाड्रोकार्बन ,शनीचा रंग नीला आहे. फोबो हा उपग्रह शनीच्या कक्षेत फिरण्याच्या विरुद्ध दिशेत शनिभोवती फिरतो.

या ग्रहाचा सर्वात मोठा ग्रह टायटन आहे. (इतर महत्वाचे ग्रह उदा. मीमांस टेथिस , एनसिलाडू, डीऑन, रिया, हायपेठीयन फोबो,इत्यादी उपग्रह आहे.)

  • व्यास :- १,१९,२९६ कि.मी
  • चंद्र :- ८२ (२०२१ पासून सर्वात जास्त ग्रह )
  • सूर्यापासून सरासरीअंतर :- १,४१७.६ दशलक्ष कि.मी.
  • सूर्याभोवती प्रदक्षिणेचा काळ :- २९.५ वर्ष
  • परिभ्रमण काळ २९.५ वर्ष आहे.

 युरेनस ग्रह

युरेनस  ग्रहाचा शोध १७८१ ला लागला याचा रंग आहे निळसर /हिरवट निळा आहे. परिभ्रमण काळ ८४ वर्ष आहे.

वैशिष्ट्य जययुक्त युरेनस,व्हायेजर- I ला युरेनस ग्र्हसाभोवती ९ गाड, सघन कड्या आढळल्या ,कॉर्कस्क्रू आकाराचे चुंबकीय क्षेत्र असून त्याचा विस्तार दशलक्ष कि.मी.चा आहे.

  • व्यास :- ५२,०९६ कि.मी
  • चंद्र :- २७ आहे.
  • सूर्यापासून सरासरीअंतर :- २८५२ दशलक्ष कि.मी.
  • सूर्याभोवती प्रदक्षिणेचा काळ :- ८४ वर्ष  

नेपच्यून ग्रह 

नेपच्यून ग्रहचा  शोध १८४६ मध्ये जर्मनमध्ये जोहान गाले याने लावला आहे. याचा रंग फिकट पिवळा आहे. वैशिष्ट्य युरेनसापेक्षा अधिक घनतायुक्त परंतु थोडा लहान ,वातावरण नीलसदृश यांचे रुपांतर शुभ्र मेघात जलदरित्या होते. ,वातावरण हाड्रोकार्बन संयुगे बर्याच अंशी असतात. ,सूर्यापासून प्राप्त होणाऱ्या ऊर्जेपेक्षा २.३ पटीने उत्सर्जन होते. व्हायेजर- II ने ध्रुवीय प्रकाशाची नोंद केलेली आहे.  

  • व्यास :- ४९,०००  कि.मी
  • चंद्र :- १४  
  • सूर्यापासून सरासरीअंतर :- ४,४९७ दशलक्ष कि.मी.
  • सूर्याभोवती प्रदक्षिणेचा काळ :- १६५ वर्ष
  • परिवलन काळ १६ तास  आहे.
  • परिभ्रमण काळ १६४ वर्ष आहे.

प्लुटो आणि बुटके ग्रह

शास्रज्ञानी आपल्या सुर्यमालेत प्लुटो हा नववा ग्रह मानलेला होता. २००६  ला शास्रज्ञानी प्लुटो पुनर्नामानक बुटका ग्रह केले आहे. यामुळे आपल्या सुर्यकुलात ८ ग्रह आहे.

सूर्य -तारा

वैशिष्ट्य मध्यमवयीन तारा, वायुरूप  सूर्याचे गाभ्यात कमाल तापमान २७ दशलक्ष से. सूर्याच्या डागाचे निरीक्षण करता सूर्याचे ११ वर्षाचे चक्रपृथ्वीवर काही रेडीओ लहरी बिघाड आणतात. तसेच उत्तर प्रकाश आढळतात  

  • व्यास :- १३,८४,००० कि.मी
  • चंद्र :- ८ ग्रह
  • वय: ४.५ अब्ज वर्ष

 

 धुमकेतू

सूर्याभोवती अतिलंब वर्तुळाकार कक्षेत फिरतात. धुमकेतू परिभ्रमण काळ खूपच जास्त असतो. तो तेजस्वी गोल असतो आणि त्याला एकलांब पुच्छ असते.हे पुच्छ सूर्याचे विरुद्ध बाजूला असते. जसजसा धुमकेतू सुर्याच्या जवळ येतो पुच्छ मोठे होत जाते. धुमकेतू शोधणाऱ्या शास्रज्ञानाचे नाव त्या धुमकेतू दिला आहे.

चंद्र

  • चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे.
  • पृथ्वीवरून चंद्राचा ५९% पृष्ठभाग दिसतो.
  • चंद्र हा दरोज दिवशीच्या वेळेपेक्षा ५० मिनिट उशिरा उगवतो.
  • चंद्राला सूर्यापासून मिळणारे एकूण प्रकाशापैकी एकूण ७% एवढाच प्रकाश प्रकाश परावर्तीत होऊन पृथ्वीवर पडतो.
  • चंद्रावरील गुरुत्वाकर्षणाच्या केवळ १/६ आहे म्हणून चंद्रावर गेल्यास मानवाचे वजन कमी करते.
  • उदा. रमेश चंद्रावरील वजन १२० kg आहे. तर त्यांचे पृथ्वीवरील वजन किती असणार?
  • मावळताना किवा उगवताना चंद्र मोठा दिसतो याचे कारण प्रकाशाचे अपवर्तन किवा वक्रीभवन म्हणतात  

GMRT

full form = Giant Meter Wave Radio Telescope

हे एक दुर्बीण आहे. टी पुणे नाशिक मार्गावर असलेल्या नारायण गावाजवळ खोडद येथे उभारलेले आहे.

ISRO

full form = Indian Space Research Organisation

हे भारतीय अवकाश संशोधन संस्था आहे.

स्थापन :-१५ ऑगस्ट १९६९

FAQ

प्र.सुर्यमालेतील एकूण किती ग्रह आहे.

उत्तर =सूर्यमालेत ८ ग्रह आहे.

प्र.सर्वात जास्त उपग्र कोणत्या ग्रहाला आहे.

उत्तर :शनीला एकूण ८२ उपग्रह आहे.

प्र.सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता?

उत्तर : बुध हा सुर्यामातील सर्वात लहान ग्रह आहे.

प्र.सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

उत्तर : गुरु हा सर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे.

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch