प्रकाश(LIGHT)-प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा

नमस्ते मित्रानो आज  प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा या लेखामध्ये  प्रकाशचे परावर्तन ,प्रकाशचे अपवर्तन ,प्रकाश विकिरण ,प्रकाशचे अपस्कर्ण ,पूर्ण अंतर्गत  यांच्याबद्द माहिती जाणून घेणार आहोत 

प्रकाश या बद्दल बरेच प्रश्न निर्माण होतात जसे कि  ग्रहाना स्वताचा प्रकाश असतो का? ,चंद्र ज्यावेळी बुडतो त्यावेळी त्याचा मोठा आकार का? असतो. आकाश निळा दिसण्याचे कारण काय? तारे लुकलुकताना का? दिसतात चला तर जाणून घेयू या

प्रकाशाचे परावर्तन

प्रकाशाचे परावर्तन व्याखा एखाद्या पृष्ठभागावर पडून प्रकाशचे किरण परत फिरने यास ‘प्रकाशाचे परावर्तन’ म्हणतात.

नियमित परावर्तन म्हणजे  सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणारे  परावर्तनास ‘नियमित परावर्तन’ म्हणतात आणि अनियमित परावर्तन म्हणजे  खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनाला ‘अनियमित परावर्तन’ म्हणतात.

प्रकाशाचे अपवर्तन

प्रकाशकिरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरंकस जातांना आपली दिशा बदलतात. प्रकाश किरणांच्या या दिशा बदलाला ‘प्रकाशाचे अपवर्तन’ म्हणतात. प्रकाशकिरणांचा वेग वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळा

उदा.

  •  पाण्यात तिरपी ठेवलेली काठी पाण्याच्या पृष्ठभागापासून वाकडी झालेली जाणवते.
  • पाण्याच्या भांड्यात तळाशी ठेवलेले नाणे वर उचलल्यासारखे भासते.
  • तारे लुकलुकतांना दिसतात (तारे का लुकलुकताना दिसतात कारण ताऱ्यांपासून येणारा प्रकाश हवेच्या विभिन्न पनतेच्या थरांतून येत असतांना त्याचे सतत अपवर्तन होत राहते.)
  • वास्तविक सूर्यास्तानंतरही सूर्य काही काळ क्षितीजावर दिसतो.

पूर्ण अंतर्गत परावर्तन

 पूर्ण अंतर्गत परावर्तन निर्माण होण्यासाठी दोन बाबींची आवश्यकता असते एक आहे प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असावा आणि दुसरी बाब आहे आपाती कोन क्रांतिक कोनापेक्षा अधिक असावा.

उदा.

  1. हिऱ्याचे चमकण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रकाशाचे पूर्ण अंतर्गत परावर्तन होय.
  2. प्रकाशीय तंतूंमध्येही प्रकाशाचे पूर्ण अंतर्गत परावर्तन होते, ज्यामुळे प्रकाशाच्या तीव्रतेमध्ये घट न होता तो एका ठिकाणाहूनदुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो.
  3. वाळवंटातील मृगजळाचे कारणही पूर्ण अंतर्गत परावर्तनच आहे

प्रकाशाचे अपस्करण

प्रकाशाचे अपस्करण पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस ‘प्रकाशाचे अपस्करण’ म्हणतात. पांढरी सूर्यप्रकाश शलाका प्रिझमच्या एका पृष्ठभागावर पडू ‘दिल्यास दुसऱ्या पृष्ठभागातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगामध्ये पृथ्थकरण होते.

तांबड्या प्रकाशाचे अपस्करण सर्वांत कमी तर जांभळ्या प्रकाशाचे अपस्करण सर्वांत जास्त होते.

पावसाळ्यात आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपस्करणामुळेच दिसते. हवेत तरंगणारे पाण्याचे थेंब प्रिझमसारखे कार्य करतात. त्यांच्यातून जाणाऱ्या सूर्यप्रकाशाचे पृथक्करण होऊन इंद्रधनुष्याचा पट्टा तयार होतो आणि इंद्रधनुष्य निर्माण होण्यामागे अपस्करणाव्यतिरिक्त परावर्तन, अपवर्तन आणि पूर्ण अंतर्गत परार्वतन या क्रियासुद्धा कारणीभूत असतात.

प्रकाशाचे विकिरण

हवेत तरंगणाऱ्या विविध वायूंच्या किंवा धुळीच्या कणांवर सूर्यकिरण पडले की, ते किरण सर्व दिशांना पसरतात यालाच प्रकाशाचे विकिरण म्हणतात. सूर्यकिरणांतील ज्या रंगाची तरंगलांबी सर्वात कमी असते त्याचे सर्वाधिक विकिरण होते उदा.जांभळा रंग आणि ज्या रंगाची तरंगलांबी सर्वाधिक असते त्याचे विकिरण सर्वात कमी होते उदा. तांबडा तरंग

तरंग लांबी नुसार उतरता क्रम : तांबडा=नारंगी=पिवळा=हिरवा=निळा=परवा=जांभळा

 उदा.

  •  दिवसा सर्वत्र उजेड असतो.
  •  आकाश निळे दिसते (या मागचे कारण काय ?निळ्या रंगाचे जास्तीत जास्त विकिरण होते.)
  •  खोल समुद्रातील पाणी निळे दिसते.
  •  सूर्योदय व सूर्यास्ताच्यावेळी क्षितिजाजवळ अपेक्षा
  •  संधिप्रकाश दिसतो.

चंद्र क्षितिजाजवळ (मावळताना) मोठा का दिसतो? या मागचे कारण  दृष्टिभ्रम

प्रकाशचे संकल्पना

नसर्गिक प्रकाश कोणते ते आहे  सूर्य व आकाशातील इतर तारे हे सर्व नसर्गिक प्रकाश आहे  ग्रहां स्व:ताचाप्रकाश असतो का ? याचे उत्तर आहे नाही  विशेष ग्रहांना स्वतःचा प्रकाश नाही त्यांना  ताऱ्यापासून मिळणारा जे प्रकाशच असतात तेच परावर्तित होतात 

कृतीम स्रोत कोणते मेणबत्ती, गॅसबत्ती, विजेचा दिवा, ट्यूबलाईट हे आहे. (‘उष्ण स्त्रोत’ उदा. विजेचा दिवा, आणि ‘शीतस्त्रोत’ उदा. ट्यूबलाईट, काजवा, निऑन साईन, सोडिअम व्हेपर दिवे.)

प्रकाशाचा वेग

  • निर्वात पोकळीमध्ये प्रकाशाचा वेग, जवळजवळ 3 x 108 m/s
  • हवेत तो 0.03c इतका होतो
  • पाण्यात प्रकाशाचा वेग सुमारे 0.75c
  • काचेमध्ये 0.66c इतका असतो.

सपाट आरसा

घरगुती आरशाच्या मागील बाजूला लावलेला रंग म्हणजे जस्त (tin) व पारा (marcury) यांचे अमालगम असते.सपाट आरशात व्यक्तीचे संपूर्ण प्रतिबिंब बघण्यासाठी आरशाची किमान उंची व्यक्तीच्या उंचीच्या निम्मी असणे गरजेचे असते

गोलीय आरसा 

गोलीय आरसेचे दोन प्रकार

१) अभिसारी/अंतर्गोल आरसा (Concave mirror) 

 यात आरशाच्या आतील पृष्ठभागाला चकचकीत पदार्थाचे विलेपन करून परावर्तक बनविले जाते. हा आरसा दूरवरून येणाऱ्या किरणांना एकत्रित करण्याचे कार्य करतो, म्हणून त्याला अभिसारी आरसा असे म्हणतात. याचा वापर  दाढी करण्यासाठी, डोळे, कान, नाक, दात, कारच्या हेड लॅम्पचा आरसा, सर्चलाईटचा आरसा, सोलर कुकरचा आरसा.

२) अपसारी/बर्हिगोल आरसा (Convex mirror) 

यात आरशाचा बाहेरील पृष्ठभाग परावर्तक असतो. हा आरसा दूरवरून येणाऱ्या किरणांना पसरविण्याचे कार्य करतो, म्हणून बी त्याला अपसारी आरसा असेही म्हणतात. या आरशामुळे मोठ्या क्षेत्रातील वस्तूचे प्रतिबिंब छोट्या क्षेत्रात एकवटते परिणाम दृष्टी क्षेत्र अधिक असते याचा वापर  मोटार वाहनाचा बाजूचा आरसा  

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch