सदाहरित वने-महाराष्ट्रातील वने

सदाहरित वने वनाचे प्रमुख प्रकार 6 या मध्ये वार्षिक प्रजन्य, तापमान ,वृक्षाची उंची, किती टक्के व्यापलेले क्षेत्र ,प्रमुख वृक्ष ,वैशिष्टे इ. माहिती

वनाचे महत्व किती हे आपणास सागण्याची आवशकता नाही.या वनापासून मानवाला मिळणारे गरजेचे वनस्पती औषधी, सागवान,तेंदूचे पाने, इतर भरपूर वापर या वनातील वृक्षां पासून होतो.चला तर आज आपण महाराष्ट्र किती प्रकारचे वने आढळतात ते जाणून घेऊ या.  

महाराष्ट्रातील वनांचे प्रकार

सदाहरित वने

सदाहरित वने या भागात नेहमी हिरवी गार वृक्ष असतात या भागात ३०० ते ६०० से.मी पर्जन्य असते. महाराष्ट्रात सदाहरित वने तुरळक प्रमाणात आढळतात. विपुल पर्जन्याच्या प्रदेशात पठारी अथवा दऱ्याखोऱ्यात हिरवीगार वने आढळतात. या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान, भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात.

सदाहरित वने वृक्षांमध्ये जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरे. विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ, गारबी, पळसवेल, वाटोळी, वगैरे अजस्र वेली आढळतात.

आर्द्र पानझडी वने

आर्द्र पानझडी वने या ठिकाणी पर्जन्यमान १५० ते २०० सेंमी.पाऊस असतो घाटमाथ्यावरून खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, व सपाट भागावर या प्रकारची वने आढळतात. निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवानाची झाडे असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची ३०-३५ मीटरपर्यंत असू शकते. व्यापारीदृष्ट्या अशा वनांचे महत्त्व फार आहे.

आर्द्र पानझडी वने वृक्षांमध्ये सागवान व त्याच्याबरोबरच शिसवी, सावर, बीजा, हळदू, कळंब, ऐन, बोंडारा, शिरीष, अर्जुनसादडा, धावडा इ. उपयुक्त वृक्ष सापडतात.

शुष्क पानझडी वने

शुष्क पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते. उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात. अशारानात सागवान वृक्षही आढळतात.

असाणा, तिवस, सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण, टेंबुणीर वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा, तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात.

इमारती लाकडाच्या दृष्टीने या प्रकारच्या वनांना कमी महत्त्व असले, तरी भरपूर जळावू लाकडाचा पुरवठा करणारी जंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात.

अशा रानातील वृक्षांची वाढ अतिशय हळू असल्याने जर अनिर्बंध लाकूडतोड सुरू झाली तर सर्व प्रदेश वैराण होण्यास वेळ लागत नाही. अशा वनात दुय्यम उत्पन्न देणाऱ्या वनस्पती म्हणजे तेंदू, गवते, औषधी वनस्पती, इ. लावून अशा जंगलाचे महत्त्व वाढविता येईल.

काटेरी वने

पठारी प्रदेशातील ८० सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळ आहेत. या भागातील नापीकजमिनीवर अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात.

नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडा व पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. काटेरी खुज्या वनस्पती व त्यांच्याबरोबर गवताळ माळराने असे दृश्य सर्वत्र दिसते.

या भागात बाभूळ, बोर, खैर, निंब हे वृक्ष आणि तारवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते असून त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात

महाराष्ट्रातील वने

उपकटिबंधीय सदाहरित अरण्ये

उपकटिबंधीय सदाहरित अरण्ये यास पर्जन्यची आवशकता असते 200 सेमी पेक्षा अधिक सदाहरित वने कोकण भागात सह्याद्रीच्या पायथ्यालगत आढळते जिल्हा सिंधुदुर्ग –सावंतवाडी या परिसरमध्ये जांभा मुद्रेच्या भागात हवामान आर्द्र आणि उष्ण हवामान सरासरी तापमान असते.

सदाहरित वने कोणती बांबू, पिसा, अंजन ,हिरडा, नागचंपा ,पंधरा सिडार,फणस ,जांभूळ,कावसी,ओक

सदाहरित वने उपयोग मर्यादित प्रमाणात कारण या वृक्षाचे लाकूड कठीण व जडू असल्यामुळे हा काही प्रमाणात फळे. कंदमुळे, डींक इ.गोळा करण्याचे व्यवसाय चालतो.

सदाहरित वने वैशिष्टे वृक्षाची उंची 45 ते 60 मी , घनदाट वनाचे आच्छादन असते ,हि वने नेहमी सदाहरित असतात, या वनस्पतीचे पाने रुंद असतात

उष्ण कटिबंधिय निमसदाहरित अरण्ये

उष्ण कटिबंधिय निमसदाहरित अरण्ये हे वार्षिक सरासरी पर्जन्य: 150-200 सेमी. तसेच सरासरी तापमान 20 ते 30 से.असते. प्रदेश सह्याद्रीच्या पायथ्याशी हि वने आढळते. आंबोली ,लोणावळा ,इगतपुरी या ठिकाणी आढळतात राज्यातील 8% क्षेत्र या अरण्याने व्यापलेला आहे.

वैशिष्टे : हरित अरण्ये आणि पानझडीची अरण्ये यांच्या संक्रमण अवस्थेत, वृक्षाची उंची सदाहरित यापेक्षा कमी उंची : 20 ते 30 मी, हि वने सलग पट्यात व तुटक स्वरुपात आढळता , याचे पाने विशिष्ट कालावधी गळतात हि वने आर्थिकदृष्ट्या महत्वाची असते.

औषधी वनस्पती: सर्पगंधा हि वनस्पती रक्तदाबावर गुणकारी आहे व धावल हि वनस्पती दम्याच्या विकारासाठी उपयोगी असते.

प्रमुख वृक्ष : राणफणस, कदंब, शिसम, बिवळा, आंबा, नारळ, सुपारी, किंजल, सावर, बेन, शिषव, नारळ,

उपउष्णकटिबंधिय सदाहरित अरण्ये

येथे 250 सेमी पेक्षा जास्त प्रजन्य असतो. या भागात आढळतात महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकर, गाविलगड टेकडया, सातपुडा, अस्तंभा डोंगर. विशेष म्हणजे या झाडाची उंची 1200 मीटर पेक्षा अधिक आढळतात ,वृक्ष प्रमुक हिरडा, अंजन, जांभळा ,काटवी, बेहडा, तेजपान ,लव्हेंडर

उष्णकटिबंधिय आर्द्र पानझडी अरण्ये

उष्णकटिबंधिय आर्द्र पानझडी अरण्ये यास उष्णकटिबंधिय मान्सून अरण्ये असेही म्हणतात याचे पर्जन्य 120 ते 160 सेमी दरम्यान असते , वार्षिक तापमान 20 ते 30 से. आहे. उष्णकटिबंधिय आर्द्र पानझडी अरण्येमहाराष्ट्रात 30% भाग व्यापलेले आहे.

कोणत्या भागात आढळते सहयाद्रीच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात, सातमाळा, बालाघाट, हरिशचंद्र डोंगर,धुळे, डाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, भंडारा.

प्रमुख वृक्ष मुख्यतः सागवान याशिवाय हिरडा, बिबळा, लेडी, येरुल, तेंदू, चंदन, पळस,आवळा खैर

विशेष चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पूर्व भागात चिरोल व नवेगाव टेकड्यावर आहेत हा परिसर अल्लापल्ली अरण्ये म्हणून ओळखतात या वृक्षाची भारतातील प्रसिद्ध वृक्ष म्हणून गणना केली जाते. वृक्षाची उंची 30 से 40 मीटर. पावसाळ्यात हिरवेगार तर उन्हाळ्यात पानगळ होते

उष्णकटिबंधिय शुष्क पानझडी अरण्ये

उष्णकटिबंधिय शुष्क पानझडी अरण्ये वार्षिक पर्जन्य 80 ते 120 सेमी दरम्यान. सरासरी तापमान 35 ते 40 से. आणि महाराष्ट्र 60% वने या प्रकारात आढळतात

कोणत्या भागात आढळते सातपुडा पर्वतरांगा, अजिंठा डोंगररांगा, विदर्भ, मराठवाडी बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. प्रमुख वृक्ष सागवान, धावडा, शिसम, तेंद, पळस, बीजली, अंजन, बोर, बेल, आवळा

वैशिष्ट्ये अतिश विरळ वने ,उन्हाळ्यात पानगळ तर पावसाळ्यात नवीन पाने येतात

उपयोग सागवान आर्थिकदृष्ट्या महत्वाचे वृक्ष ,मध,डिंक,लाख,कात,व्यवसाय चालतो. तेंदूच्या पानापासून विडी व्यवसाय ,औषधी वनस्पती आढळते.

उष्ण कटिबंधिय काटेरी अरण्ये

उष्ण कटिबंधिय काटेरी अरण्ये या भागात पर्जन्य 80 सेमी पेक्षा कमी पडतो. यास महाराष्ट्राचा प्रजन्य छायेचा प्रदेश आहे. म्हणून ओळखतात असे महाराष्ट्र एकूण 1% काटेरी वने आढळतात

कोणत्या भागात आढळते पुणे, सातारा, सांगली, लगाव, पुळे, कोल्हापूर, अहमदनगर पूर्व भागात, सोलापूर, मराठवाडा, विदर्भातील

प्रमुख वृक्ष हिरडा, निंब, कोरफड, निवडुंग ,बाबुल,खैर,हिवर  

वैशिष्ट्ये वृक्षाच्या पानाचा आकार लहान ,वृक्षाचे मुळे खोल जमिनीत जातात ,लाकूड टनक असतात, साल जाड असते. ,पानाच्या टोकाला काटे असतात.

खारफुटी वने

खारफुटी वने यास खाजन वने असेही म्हणतात .महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टी भरती ओहोटीच्या भागात नद्याच्या मुखा जवळ हि वने आढळतात ही वने दलदलीच्या ठिकाणी आढळतात., कोणत्या भागात आढळते ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, श्रीवर्धन, देवगड,

विशेष रायगड जिल्हात सर्वाधिक खारफुटी वने आहे. महाराष्ट्रात या वनाचे प्रमाण 0.1% आहेत. वृक्षाची उंची यांची उंची खूप कमी असते. खारफुटी वनामुळे समुद्रीय प्राण्यांची प्रजनन व पोषणाची सोय होते. या वनातील वृक्षांना सुंद्री म्हणतात

प्रमुख वृक्ष काजळा, आंबेरी, कांदन, चिची, तिवारी इ.

FAQ

सदाहरित वने कोणत्या प्रदेशात आढळतात

उत्तर = या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान, भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात.

सदाहरित वनांमध्ये कोणत्या वनस्पतीचा समावेश होतो

उत्तर = सदाहरित वने वृक्षांमध्ये जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch