[25 ते 28] संविधानामध्ये कोणत्या कलमाद्वारे धार्मिक स्वातंत्र्याची तरदूत केलेली आहे

संविधानामध्ये कोणत्या कलमाद्वारे धार्मिक स्वातंत्र्याची तरदूत केलेली आहे कलम 25 ते 28 यामध्ये (कलम २५ ,कलम २६ ,कलम २७ ,कलम २८ )या कलमांचा सविस्तर माहिती दिले आहे

धार्मिक स्वातंत्र्य हक्क कलम

कोणत्याही धर्माचा सराव, उपदेश आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य हा आधुनिक भारतात घटनात्मक हक्क आहे.

कलम २५

समकालीन भारतातील धर्म स्वातंत्र्य हा देशाच्या घटनेच्या कलम २५ अंतर्गत हमी मिळालेला मूलभूत हक्क आहे. त्यानुसार, भारतातील प्रत्येक नागरिकास स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रसार करण्याचा हक्क आहे.

कलम 25= विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रगटीकरण, आचरण आणि प्रचार’

व्याख्या= व्यक्तीच्या वैयक्तिक धार्मिक हक्कांना संरक्षण
4 प्रकाराचे हक्क सर्वांना प्राप्त आहेत
१)सद्सद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य
२)प्रगटिकरणाचा हक्क
३) आचरनाचे
४)प्रचारचे स्वातंत्र
अपवाद
वरील हक्क मात्र सार्वजनिक सुव्यवस्था, नितिमत्ता व आरोग्य यांच्या आधीन राहूनच प्राप्त होतात.

राज्यसंस्थेस काय अधिकार प्राप्त आहेत
अ)धर्माचरणांशी संबंधित कोणत्याही आर्थिक, वित्तीय, राजकीय किवा धार्मिकेतर कार्याचे नियमन करण्यांचा अधिकार.

ब)सामाजिक कल्याण व सुधारणेची तरतूद करण्याचा/ सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था, हिंदूचे सर्व वर्ग व पोटभेद यांना खूले करण्यासाठी तरतूद करण्याचा अधिकार

कलम २५ बद्दल दोन स्पष्टीकरण
१) हिंदू या शब्द लेखात शीख ,जैन किवा बौद्ध धर्म प्रगत करणाऱ्या व्यक्तीचे उल्लेख समाविष्ट आहे

२) कृपणे धरण करणे व स्वत:बरोबर बाळगणे हे शीख धर्माचे प्रकटीकरण समाविष्ट आहे असे मान्यत येईल

कलम 26

कलम २६ =’धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य

कलम 26 अन्वये, प्रत्येक धार्मिक सांप्रदायास किवा त्यातील गटास पूढील हक्क असतील

१)धार्मिक व धर्मदायी उद्देशाकरिता संस्थांची स्थापना करून त्या स्वखर्चाने चालवण्याचा हक्क.
२)धार्मिक बाबीमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था स्वतःपाहण्याचा हक्क
३)जंगम व स्थावर मालमत्ता स्वमालकिची असण्याचा व ती संपादन करण्याचा हक्क
४)कायदयानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा हक्क पण वरील हक्क सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता व आरोग्य राखण्याच्या अधीन राहूनच प्राप्त होतील.

धार्मिक सांप्रदायांचे निकष
सर्वोच्च न्यायालयाच्या मते धार्मिक सांप्रदायाने 3 अटी पूर्णकेल्या पाहिजेत
A. तो एक व्यक्तीचा असा समूदाय हवा, ज्याची धार्मिक श्रद्धांची तत्त्वांची अशी एक व्यवस्था हवी जी त्याच्या मते
त्याच्या अध्यात्मिक सुस्थितीसाठी आवश्यक आहे.

B. त्यांची एक सामाईक संघटना हवी.

C. त्याला एका स्पष्ट भिन्नत्वदर्शक नाव हवे.
वरिल निकषांच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने

  • रामकृष्ण मिशन
  • आनंद मार्ग

यांना हिंदूधर्माअंतर्गत धार्मिक संप्रदाय म्हणून दर्जा दिला आहे. पण अरविंद सोसायटी धार्मिक संप्रदाय नसल्याचे घोषित केले.

कलम 27

कलम २७ =एखादया विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता ‘कर’ देण्याबाबत स्वातंत्र्य.

कलम 27 अन्वये=कोणत्याही व्यक्तीवर असा कर देण्याची सक्ती केली जाणार नाही ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे किवा धार्मिक संप्रदायांचे संवर्धन करण्यासाठी खर्च करावयाचे आहे.(समजा राज्यसंस्था करांतून प्राप्त सार्वजनिक पैसा एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी प्रोत्साहनासाठी वापरणार नाही. मात्र हे पैसे सर्व धर्माच्या संवर्धनासाठी वापरता येतील)

विशेष

हि तरतदू केवळ कर आकारण्यास प्रतिबंध करते शुल्कआकारण्यास नाही. म्हणजे(शुल्काचा उददेश धार्मिकसंस्थांच्या गैर-धार्मिक प्रशासनाचे नियंत्रण करणे हा असतो. त्या धर्माचे संवर्धन करणे हा नसतो)उदा. यात्रेकरूंना काही सुविधा देण्यासाठी शुल्क आकारता येईल.

कलम 28

कलम २८=शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणकिवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य.

कुठे नाही देणार =पूर्णतः राज्यसंस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणारे नाही.

कुठे देनार= राज्यसंस्थेमार्फत प्रशासित केली जाणारी एखादी शैक्षणिक संस्था जर ‘दाननिधीकिवा न्यास’ म्हणून स्थापन करण्यात आली असेल तर तेथे धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकेल.

व्यक्ती = शासनमान्य किवा शासन-अनुदानीत शैक्षणिक संस्थामधील कोणत्याही व्यक्तीला त्याच्या पालकाच्या संमती शिवाय धार्मिक शिक्षण सहभागी होण्यास भाग पाडले जाणार नाही.

Related link

FAQ

कलम 25 नुसार भारतीयांना कोणता अधिकार मिळतो

उत्तर = भारतातील प्रत्येक नागरिकास स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रसार करण्याचा हक्क आहे.

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch