संप्रेरक विज्ञान नाेटस-अंतःस्रावी पियुषिका ग्रंथी मराठी

नमस्ते  पियुषिका ग्रंथी ,Thyroid gland,जन्न ग्रंथी,अधोवृक्क ग्रंथी,थायमस,अंत:स्रावी ग्रंथी (म्हणजे ,वैशिष्टे,उदा) इत्यादी Gland बद्दल माहिती घेऊया 

ग्रंथी म्हणजे प्राण्याच्या शरीरात विविध प्रकारचे स्राव स्रावनाऱ्या पेशी समूहाच्या संरचनाना ग्रंथी म्हणता

दोन प्रकारचे ग्रंथी  शरीरातील दोन प्रकारच्या ग्रंथी हे प्रकार त्यांच्या स्रावनाचे वहन व रसायनाचा प्रकार वरून पडतात
१)अंत:स्रावी (Endocrine glands)
२)बाह्यस्रावी (Exocrine glands)

अंतःस्रावी ग्रंथी-

अंत:स्रावी ग्रंथी

अंतःस्त्रावी ग्रंथी यास इंग्रजीत Endocrine glands म्हणतात अंतःस्त्रावी ग्रंथी म्हणजे ज्या ग्रंथीचे स्राव थेट रक्तात सोडले जाते त्यास म्हणतात

अंतःस्त्रावी ग्रंथी वैशिष्टे

नलिका नसतात म्हणून त्यांना नलिकाविरहित म्हणतात.
या ग्रंथीच्या स्त्रावांना संप्रेरके हि म्हणतात.
या ग्रंथी अवश्यक असेल त्याच ठिकाणी असतात
यांचाही स्त्राव एकतर शरीरात किंवा शरीराच्या बाहेर स्रवतो

अंतःस्त्रावी ग्रंथी

  • पियुषिका ग्रंथी
  • Thyroid gland(कंट ग्रंथी )
  • अधोवृक्क ग्रंथी
  • वृषण (जन्न ग्रंथी)
  • पॅराथायरॉईड ग्रंथी
  • थायमस

पियुषिका ग्रंथी-Pituitary gland

पियुषिका ग्रंथी यास english  Pituitary gland म्हणतात तसेच  पियुषिका ग्रंथी ला मास्टर ग्रंथी’ असे म्हणतात(कारण ती अनेक इतर ग्रंथींचे कार्य नियंत्रित करीत असते म्हणून ) विशेष सर्वात लहान अंतस्त्रावी ग्रंथी आहे. हि मेंदूमध्ये वसलेली असते.

पियुषिका ग्रंथी दोन भागात विभागणी केले आहे  ते खाली 

१) ॲन्टेरिअर पिट्यूटरी (Anterior Pitutary)
२) Posterior Pitutary Gland

Anterior Pitutary 

या भागात 6 प्रकारचे संप्रेरके स्त्रावतात.

१) सोमॅटो ट्रॉपिन संप्रेरक (STH) : हे वृद्धी संप्रेरक आहे.याचे कार्य आपल्या शरीरात वाढ ,विकास ,प्रजनन आणि इतर ग्रंथीचे कार्य नियंत्रित करण्याचे काम करते

संप्रेरकचे परिणाम प्रौढ व्यक्ती मध्ये

  • STH प्रौढात जास्त प्रमाणात स्त्रावल्यास व्यक्ती जास्त उंच होतो. त्यालाच अक्रोमेगली म्हणतात.
  • STH कमी प्रमाणात स्त्रवल्यास त्या व्यक्तीची उंची कमी राहते. त्यालाच सिमॉन्डस म्हणतात.

२) मेलेनोसाईट (Melanotropic Harmone MTH) कार्य मेलॅनिनची निर्मिती आणि वितरण नियंत्रित करते.(मेलॅनिन रंगद्रव्य हे केसांसंबंधित आहे)

  1. भूरेकिवा पांढरट केस =मेलॅनिनमधील गंधका मुळे
  2. काळे केस = शुद्ध मॅलेनिनमुळे
  3. तांबडे किवा लाल केस = मेलॅनिनमधील लोहामुळे

) संप्रेरक Prolactin : कार्य दुग्धनिर्मिती ,स्तन ग्रंथीचा विकास आणि वाढ नियंत्रण

४) थायरॉइंट स्टिमूलेटिंग (Thyroid Stimulating संप्रेरके) : कार्य हे संप्रेरक कंठग्रंथीवर नियंत्रण ठेवते.

5) संप्रेरके ACTH : कार्य हे संप्रेरके किडनीवरील अधिवृक्क ग्रंथीवर नियंत्रण ठेवते.

ACTH ful form (Adero Cortico Tropic Harmone) 

६) Gonadotropic संप्रेरके: हे  Follicle Stimulating Harmone बीजोत्पादक संप्रेरक आहे (रणपुरुषात शुक्राणूजनन आणि स्त्रीयात स्त्रीबीज उत्पत्ती प्रोत्साहन करते )आणि Luetinizing Harmorie जननग्रंथीवर नियंत्रण ठेवते.

Posterior Pitutary Gland

यामध्ये संप्रेरके ADH (Anti Divertic Harmone) कार्य  हे वृक्कातील गाळण्याचा दर वाढविते.

Oxytocin संप्रेरके : कार्ये  नैसर्गिक प्रसुतीसाठी Oxytocin चीच गरज असते. स्तनग्रंथीतील दूधाला बाहेर स्वावण्यासही मदत करते.

Coherin संप्रेरके: कार्य  लहान आतड्यातील जेज्युनम या भागाचे एकत्रितरित्या आकुंचन घडवून आणते.

Thyroid gland

Thyroid gland मराठीत कंठ किवा अवटू ग्रंथी म्हणतात विशेष म्हणजे ही सर्वात मोठी अंतस्त्रावी ग्रंथी आहे.याचे वजन  २५ ते ३० ग्रॅम आहे हि आढळते  गळ्यात कंठाच्या खाली किवा श्वासनलीकेच्या तोंडावर असते.

संप्रेरके:  १) Thyroxin २) Tri-iodo-Thyronoine.

Thyroid gland कार्य  

शरीराचे BMR (Basal Metabolic Rate) नियंत्रित करणे आणि ऑक्सीडीकरण वाढवतो व जास्तीत जास्त ऊर्जानिर्मिती करण्यास मदर करतात.

Thyroid gland परिणाम

Thyroxin संप्रेरकेमुले कमी किवा जास्त स्रावल्यास परिणाम होतो 

१) प्रौढ व्यक्तीत कमी स्रावल्यास याचा परिणाम myxoedema नावाचा रोग होतोयामुळे अशा व्यक्तीस थंडी सहन होत नाही व तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल बनतो.

२) हान मुलात संप्रेरके कमी स्राववयामुळे परिणाम cretinism नावाचा रोग होतो. त्यामध्ये मुलगा कमी खातो, जास्त झोपतो, जीभ लांब होते

३) Thyroxin जास्त स्रावल्यास परिणाम Thyrotoxicosis हा रोग होतो यामुळे डोळ्याच्या पाठीमागे चरबी जमा होते त्यामुळे डोळे बाहेरच्या दिशेने बाहेर फेकले जातात

४) या ग्रंथीचा मुख्य रोग म्हणजे गलगंड (Goitre) होय. हा रोग आयोडिनच्या अभावामुळे होतो. यामुळे थायरॉईड ग्रंथीचा आकार खूप वाढतो, मान सुजते व डोळे बाहेर आल्यासारखे दिसतातमुख्यत: डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना होतो. कारण, तेथे उपलब्ध पाण्यात समुद्र क्षारांचे प्रमाण कमी असते.

अधिवृक्क ग्रंथी-Adrenal gland

अधिवृक्क ग्रंथीस आपत्कालीन संप्रेरक म्हणतात (का ?म्हणतात रागात ,भीती ,तणावात असताना मदत करते ) कार्य  रक्तातील क्षाराचे प्रमाण नियंत्रित ठेवणे कोठे  असते मुत्रपिंडावर असते

यामुळे  रोग कोणता होतो या ग्रंथीच्या कार्यात बिघाड झाल्यास Addison’s disease नावाचा रोग होतो. हा रोग झाल्यास वजन कमी होणे, दौर्बल्य, मळमळ इत्यादी लक्षणे निर्माण होऊन शरीरातील सोडिअम पोटॅशिअमच्या प्रमाणात असंतुलन निर्माण झाल्याने मानसिक आजार निर्माण होतात.

थायमस ग्रंथी

शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करणारी ही ग्रंथी आहे. जन्मताच नसणाऱ्याना डायजार्ज रोग म्हणतात

जनन ग्रंथी

या ग्रंथीच दोन विभागात विभागणी 

  1. वृषण ग्रंथी (Testes Gand)
  2. अंडाशय ग्रंथी (Ovary Gland)

वृषण ग्रंथी: हि आढळ पुरुषात- उदरगूहेबाहेर वृषण कोशात.यामध्ये  संप्रेरके टेस्टोस्टेरॉन किवा अॅन्ड्रोजन (शुक्रपेशीच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे), इस्ट्रोडायॉल, इनहिबीन

अंडाशय ग्रंथी: हि आढळ  स्त्रीयात उदरगूहेत दोन्ही बाजूस असते  संप्रेरके २ आहे खाली 
१)प्रोजेस्टेरॉन संप्रेरक कार्यब = प्रसुती, अंडपेशी, मासिक पाळी आणि दुग्धनिर्मिती क्रिया नियंत्रित करते.
२)इस्ट्रोजन= स्त्रीयात शारीरिक परिपक्वता निर्माण करते.

पिनिअल ग्रंथी

संप्रेरक =मेलाटॉनीन संप्रेरकमुले दिवस व रात्रीतला फरक कळतो.आणि उशीरा पौगांड अवस्था प्राप्त होते.

FAQ

  • ग्रंथी म्हणजे काय ?

    उत्तर =प्राण्याच्या शरीरात विविध प्रकारचे स्राव स्रावनाऱ्या पेशी समूहाच्या संरचनाना ग्रंथी म्हणतात

  • ग्रंथीचे प्रकार किती ?

    उत्तर =दोन आहे १)अंत:स्रावी ग्रंथी २)बाह्य:स्रावी ग्रंथी

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch