इस्रो शुक्रयान-१ पाठवणार डिसेंबर २०२४ ला जाणून घ्या

शुक्रयान-१ भारत डिसेंबर २०२४ ला शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी शुक्रयान-१ पाठवणारचला तर जाणून घेऊया उद्देश ,२०२४ हेच वर्ष का निवडले ,कार्य आणि इतर माहितीशुक्र ग्रह ,ISRO

शुक्रयान-१ चा उद्देश : भारत डिसेंबर २०२४ ला शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी शुक्रयान-१ पाठवणार विशेष हे वाहन सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रहाभोवती फिरताना अभ्यास करेल

२०२४ हेच वर्ष का निवडले असेल

शुक्र पृथ्वीपासून सरासरी ४१० दशलक्ष किमी दूर आहे. सूर्याभोवती फिरत असताना हे अंतर वाढत-कमी होत राहते. डिसेंबर २०२४ मध्ये शुक्र पृथ्वीच्या अगदी जवळ येईल. यामुळे अंतराळयानाला सर्वात लहान कक्षीय मार्ग निश्चित करणे शक्य होणार आहे. जर हि वेळ गेली तर आपणास अशी संधी २०३१ ला मिळेल

शुक्रयान-१चे कार्य काय असेल

  • शुक्राची रचना कसी आहे
  • सक्रिय ज्वालामुखी शोधणे
  • शुक्राची आकाराचे बाह्य आणि बाह्य स्तर तपासणे
  • लावा प्रवाहाविषयी माहिती गोळा करणे
  • खालच्या पृष्ठभागावरील थरांचे परीक्षण करणे
  • शुक्राच्या अंतर्गत संरचनेचा अभ्यास करणे
  • शुक्राच्या वातावरणाचे परीक्षण करणे
  • सौर वाऱ्यांशी शुक्राचा संबंध कसा आहे हे शोधणे

इस्रो काय म्हतात

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने ०४ मे २०२२ रोजी सांगितले की देशाकडे अजूनही शुक्र ग्रहावर मोहिमा पाठवण्याची क्षमता आहे.

इस्रोच्या बैठकीत अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले की मिशनचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून आवश्यक निधी उभारण्यात आला आहे. उल्लेखनीय आहे की भारताने २०१७ मध्ये शुक्रयान-१ मोहिमेची माहिती दिली होती. ते म्हणाले, मिशन प्रभावी करण्यासाठी वैज्ञानिकांना आवाहन करण्यात आले आहे.

इतर माहिती

शास्त्रज्ञांनी दावा केला : सप्टेंबर २०२० ला शास्त्रज्ञांनी फॉस्फिन वायू सापडल्याचा दावा केला होता विशेष म्हणजे हा वायू सूक्ष्म जीव देखील बनवतो. भारतीय मिशन पृथ्वीबाहेरील जीवनाची पुष्टी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

शुक्र ग्रह

  • हा सूर्यापासून २ ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे
  • परिवलन काळ =२४३ दिवस
  • परिभ्रमण काळ =२२५ दिवस
  • पृठीवला सर्वात जवळचा ग्रह
  • स्वत:भोवती पूर्वेकडून -पश्चिमकडे फिरतो
  • यास mornig star किवा evening star म्हणतात
  • सौर मंडळातील सर्वात रहस्यमय ग्रह
  • ते सल्फरच्या ढगांनी झाकलेले आहे,
  • पृष्ठभागावर ज्वालामुखी आणि लावा आहे.

ISRO

ISRO full form =Indian Space Research Organisation म्हणजे भारतीय अवकाश संशोधन संस्था
स्थापना=१५-०८-१९६९
मुख्यालय=बंगलोर (कर्नाटक )भारत
ब्रीदवाक्य =मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch