शाहबाज शरीफ पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान

शाहबाज शरीफ(सामन्य ,जीवनपरीचय ,राजकीय कारकिर्दी ,इतिहास ),मंत्रिमंडळाचा शपथविधी

सामन्य : शाहबाज शरीफ पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्यांनी संसदेत १७४ मते मिळवून इम्रान खान यांच्या पक्षाचे उमेदवार शाह मेहमूद कुरेशी यांचा पराभव केला.सध्या शाहबाज शरीफ PML-N अध्यक्ष आहेत.

शाहबाज शरीफजीवन परिचय

शाहबाज शरीफ यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५१ ला लाहोरमध्ये झाला. त्यांचे वडील मुहम्मद शरीफ हे व्यापारी होते. त्याची आई पुलवामा येथील रहिवासी होती. शाहबाज शरीफ यांना अब्बास शरीफ आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे दोन मोठे भाऊ आहेत.

शिक्षण =लाहोरमधील सरकारी विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांचा कौटुंबिक व्यवसाय हाती घेतला.

राजकीय कारकिर्दी

शाहबाज शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) चे खासदार

शाहबाज शरीफ 2013 साली भारत दौऱ्यावर आले होते. मनमोहन सिंग त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते. त्या काळात शाहबाज पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी एकत्र काम करण्याबाबत बोलले होते.

13 ऑगस्ट 2018 पासून शाहबाज शरीफ नॅशनल असेंब्लीचे सदस्य आहेत आणि विरोधी पक्षनेते देखील आहेत. याच्याअगोदर शाहबाज शरीफ हे तीन वेळा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत. विशेष म्हणजे पंजाबचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

नवाझ शरीफ हे तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत.

इतिहास

2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) ने सर्वाधिक 149 जागा जिंकल्या. शाहबाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगला (PML-N ) 82 आणि बिलावल भुट्टो यांच्या पीपीपीला 54 जागा मिळाल्या. 342 सदस्यांच्या संसदेत बहुमताचा आकडा 172 आहे. त्यानंतर इम्रान खान यांनी काही छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या मदतीने सरकार स्थापन केले.

मंत्रिमंडळाचा शपथविधी

पवित्र कुराणाच्या पठणाने शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली 19 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला.

पाकिस्तानचे कार्यवाहक अध्यक्ष सादिक संजरानी यांनी 34 सदस्यीय मंत्रिमंडळाला शपथ दिली ज्यात 31 कॅबिनेट मंत्र्यांचा ,तीन राज्यमंत्र्यांसह समावेश आहे.

पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो- झरदारी यांच्या नावाचा नव्या मंत्र्यांमध्ये समावेश नाही.

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch