मूलभूत कर्तव्ये कलम-Mulbhut Kartavya

मूलभूत कर्तव्ये  अमलबजावणी ,कोणत्या देशाकडून घेतले,सरदार स्वर्ण सिंह समिती,कर्तव्येच्या यादी इत्यादी 

मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी 3 जानेवारी 1977 रोजी झाली भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत. नवीन कर्तव्ये २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरूस्तीने ११ वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले

कलम 51’A’ व मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा यातील कलम 29(1) यामध्ये एकवाक्यता आहे.

कर्तव्ये कोणत्या देशात अढळत नाही  युएसए, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या देशात आढळत नाही  तसेच  कर्तव्ये कोणत्या देशात अढळते  जपान, व्हिएतनाम आणि नेदरलँड या देशात आढळते 

मुलभूत कर्तव्येच्या विरुद्ध

भारताचे दुसरे महान्यायवादी सी.के. दफ्तरी यांनी व ए.के. सेन यांनी मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेला जोडू नये असा विरोध केला होता.

समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदाऱ्या पार पाडणेही अपेक्षित असते.

लोकशाहीत लोकांनी केवळ हक्कांचीच मागणी करू नये, तर कर्तव्यांप्रती त्यांनी दक्ष असावे लागते.

मात्र भारताच्या मूळ घटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता.

सरदार स्वर्ण सिंह समिती १९७६

आणीबाणीच्या काळातील निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारत सरकारने १९७६ मध्ये सरदार स्वर्ण सिंह समितीची स्थापना केली. या समितीने मुलभूत कर्तव्यांचे एक स्वतंत्र प्रकरण घटनेत समाविष्ट करण्याची शिफारस केली. १९७६ मध्ये ही शिफारस मान्य करून ४२ व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये घटनेतील भाग चार A मध्ये कलम ५१ समाविष्ट करण्यात आले. यामध्ये १०  मूलभूत कर्तव्ये  देण्यात आली आहेत.

सरदार स्वर्ण सिंह समिती शिफारशी 

  • मूलभूत कर्तव्यांचे एक स्वतंत्र प्रकरण घटनेत समाविष्ट करण्याची शिफारस केली.
  • १० मूलभूत कर्तव्यांपैकी केवळ आठच कर्तव्यांची शिफारस स्वर्ण सिंह समितीने केली होती.
  • तत्कालिन काँग्रेस (इंदिरा गांधी )सरकारने ही शिफारस स्विकारली

४२ व्या घटनादुरूस्ती १९७६ भाग IV A समाविष्ट करण्यात आला. या नवीन भागात कलम ५१ A हे केवळ एकच कलम टाकण्यात आले. या कलमात १० मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आली.

इतर सरदार स्वर्ण सिंह समितीबद्दल

  • समाजवादी देशांनी नागरिकांच्या मूलभूत हक्क व कर्तव्यांना सारखेच महत्व प्रदान केले आहे.
  • मूलभूत कर्तव्ये स्वत:हून लागू होत नाहीत त्यासाठी कायदे करावे लागतात.

मूलभूत कर्तव्यांची यादी 

  1. घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे
  2. ज्यामुळे आपल्याला राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे,
  3. भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे
  4. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे
  5. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलिकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे
  6. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे
  7. वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणिमात्रांबद्दल दया बुद्धी बाळगणे
  8. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे
  9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे
  10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे,
  11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास / पाल्यास, त्याच्या वयाच्या ६ वर्षापासून
    ते १४ वर्षापर्यंत शि
    क्षणाची संधी उपलब्ध करून देणे. (हे मूलभूत कर्तव्य ८६ व्या घटनादुरूस्ती, २००२ ने समाविष्ट केले.)
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch