मुलभूत हक्क MCQ previous ASO

मुलभूत हक्क MCQ यावर आयोगाने फक्तASO याचेच प्रश्न एकत्र दिले आहे अभ्यास करण्यास योग्य दिशा मिळेल

ASO

१) भारतीय नागरीकांच्या ………अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग ३ कलम १४ ते १८ मध्ये केला आहे.
(Asst मुख्य २०११)

अ ) समतेचा
ब) स्वातंत्र्याचा
क) धर्माचा
ड) चौथ्या

२) मूलभूत हक्कांच्या सरंक्षणाची जबाबदारी खालीलपैकी आहे ?(Asst मुख्य २०११)

अ ) कायदेमंडळ
ब ) कार्यकारी मंडळ
क) राजकीय पक्ष
ड ) न्यायमंडळ

३) भारतीय राज्यघटनेचे कलम १६ कशाशी संबंधित (Asst मुख्य २०१२)

अ ) राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्य
ब ) मूलभूत कर्तव्ये व अधिकार
क ) नववा परिशिष्ट व सातवा परीशीष्ट
(ड) मूलभूत अधिकार

४) अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक मुलभूत हक्कासंबंधी खालील विधाने विचारात घ्या : (Asst मुख्य २०१३)

अ) अल्पसंख्याकांना केवळ शैक्षणिक संस्थांचे प्रशासनकरण्याचा हक्क आहे.
ब) अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे.
क) हा अधिकार निरंकुश असून त्यावर कोणतीही बंधने नाहीत.
ड) कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि कुप्रशासन रोखण्याठी वाजवी बंधने शासन घालू शकते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
१) अ, ब आणि क
२) ब आणि ड
३) ब, क आणि ड
४) अ आणि क

५) कोणत्याही व्यक्तिस सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते, याची दखल संविधानाच्या …….या कलमाखाली घेतली जाऊ शकते. (Asst मुख्य २०१३)
१) ३०
२) ३१
३) ३२
४) ३४

६) खालील विधाने पहा : (Asst मुख्य २०१३)

अ) भारतीय राज्यघटनेच्या कलम १७ नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे.
ब) भारतीय राज्यघटनेच्या ५२ व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी विषयक तरतूदी लागू करण्यात आल्या.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे / त?
१) अ
२) ब
३) अ, ब
४) यापैकी नाही

७) खालील जोड्या जुळवा : (Asst मुख्य २०१३)

अ) अटकेत ठेवलेल्या बंदीला आपल्यापुढे i) प्रतिषेध लेख
हजर करण्याचा व अटकेच्या कारणाचे समर्थन
करण्याचा अटकेत ठेवणाऱ्या सत्तेला न्यायालयाचा आदेश

ब) चालू असलेले कामकाज योग्य विचारार्थ ii) अधिकार मुद्रण लेख पृच्छा
स्वत:कडे किंवा अन्य न्यायालयाकडे हस्तांतरीत
करण्याचा कनिष्ठ सत्तेला न्यायालयाने दिलेला आदेश

क) आपल्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या iii) बंदीप्रत्यक्षीकरण लेख
बाबींवर कारवाई करण्यची कनिष्ठ
सत्तेला न्यायालयाने केलेली मनाई

ड) पात्रता नसताना सार्वजनिक पद (iv) उत्प्रेषण लेख
धारण केलेल्या व्यक्तीला कार्य करण्यास
केलेली मनाई
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
iii iv i ii
i ii iii iv
iv iii ii i
ii i iv iii
८) मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग (III) चे वर्णन यांनी ‘सर्वात टिकात्मक भाग’ असे केले आहे?(Asst मुख्य २०१४)

१) पंडीत जवाहरलाल नेहरु
२)डॉ. राजेंद्र प्रसाद
३) सरदार वल्लभभाई पटेल
४) वरीलपैकी एकही नाही
९) भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे?
(Asst. मुख्य २०१७)


अ ) कायद्यापुढे समानतेचा हक्क (अनुच्छेद १४)
ब ) स्वातंत्र्याचा हक्क (अनुच्छेद १९)
क ) प्राथमिक शिक्षणाचा हक्क (अनुच्छेद २१ A)
ड ) जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण (अनुच्छेद २१)
१०) अनुच्छेद १२ नुसार ‘राज्य’ मध्ये याचा समावेश होतो. (Asst. मुख्य २०१७)

अ) भारताचे शासन व संसद
ब) प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळ
क) सर्व स्थानिक संस्था (नगरपालिका, जिल्हा बोर्ड)
ड) भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था

१) फक्त अ, ब, ड
२) फक्त अ, ब, क
३) फक्त अ, ब
४) वरील सर्व
११) मूलभूत हक्कांबाबत खालील जोड्या लावा: (Asstमुख्य २०१६)


(कलम क्र) (हक्क)
अ) कलम १४ i) धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य
ब) कलम २१ ii) जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य संरक्षण
क) कलम २३ iii) कायद्यासमोर समता
ड) कलम २६ iv) मानवी व्यापारास प्रतिबंध
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
i ii iii iv
iii ii iv i
ii i iv iii
iv iii i ii

उत्तर

१)अ २)ड ३)ड ४)२ ५)३ ६)३ ७)१ ८)४ ९)ब १०)४ ११)२

combine

१) खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर [अनुच्छेद-१९(१) (a)] वाजवी बंधने घालू शकते? (गट ब पूर्व २०१८)


अ) न्यायालयाचा अवमान
ब) अल्पसंख्यांकाचे संरक्षण
क) परदेशांशी मित्रत्वाचे संबंध
ड) भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व
इ) सभ्यता अथवा नितीमता
पर्यायी उत्तरे
१) अ, ब, क, इ
२) ब, क, ड
३) अ, क, ड, इ
(४) वरील सर्व

उत्तर

१)३
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch