मुलभूत हक्कावर MCQ previous STI

STI पूर्व + मुख्य मुलभूत हक्कावर MCQ आयोगाने विचारलेले अभ्यास करण्यास अत्यंत उपयुक्त

STI

१)ओ.बी.सी. चळवळ प्रभावीत झाली. (STI पूर्व २०११)
अ ) मंडळ आयोगामुळे
ब ) सरकारिया आयोगामुळे
क ) महाजन आयोगामुळे
ड ) फजल अली आयोगामुळे

२) खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही ?(STI पूर्व २०१२ )
अ ) समतेचा हक्क
ब ) स्वातंत्र्याचा हक्क
क ) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
ड ) मालमत्तेचा हक्क

३) राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निदेश (writs) जारी करण्याचे अधिकार ……दिलेले आहेत.
(STI मुख्य २०१२)

अ ) सर्वोच्च न्यायालयास कलम ३२ अन्वये
ब ) उच्च न्यायालयास कलम २२६ अन्वये
क ) सर्वोच्च न्यायालय कलम ३२ अन्वये आणि उच्च न्यायालय कलम २२६ अन्वये असे दोघांनाही
ड ) कोणतेही न्यायलयास किंवा अधिकरणास

४). योग्य कथन/कथने ओळखा. (STI पूर्व २०१३)
अ) पृथ्थकरणीयतेचा सिध्दांत निर्धारित करतो की, एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या
विरुध्द आहे.
ब) विकसनशील निर्वचनाचा सिध्दांत हा संविधानाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील समाजिक-विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो.
१) कथन ‘अ’ बरोबर, ‘ब’ चुकीचे
२) कथन ‘अ’ चुकीचे, ‘ब’ बरोबर
३) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर
४) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चुकीची

५) विधान (अ) : भारताच्या राज्यघटनेत ‘अल्पसंख्य’ शब्दाची व्याख्या नाही.
कारण (ब) : अल्पसंख्यांक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे. (STI पूर्व २०१३)

१) अ आणि ब बरोबर आहेत, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
(२) अ आणि ब बरोबर आहे, ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही..
३) अ बरोबर आहे. पण ब. चूक आहे.
(४) अ चूक आहे, पण ब बरोबर आहे.

६) योग्य कथन / कथने ओळखा. (STI पूर्व २०१५)
अ) अनुच्छेद ४७ प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या १४ वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे.
ब) ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे ६ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले.
पर्यायी उत्तरे
१) कथन अ बरोबर, कथन ब चुकीचे
२) कथन अ चुकीचे, कथन ब बरोबर
३) दोन्ही कथने अ आणि ब बरोबर आहेत
४) दोन्ही कथने अ आणि ब चुकीचे आहेत

७). खालील विधाने विचारात घ्या : (STI मुख्य २०१६)
अ) कायद्यापुढील समता ही संकल्पना मुळशी अमेरिकन आहे. तर ‘कायद्याचे समान संरक्षण’ ही संकल्पना ब्रिटिशांकडून घेतली आहे.
ब) ‘कायद्याचे अधिराज्य’ ज्याचा अंतर्गत अनुच्छेद १४ मध्ये आहे ते राज्यघटनेचे पायाभूत वैशिष्ट्य असून ते घटनादुरुस्तीद्वारे
देखील नष्ट करता येणार नाही.
क) राजदूत, याच्यासह परदेशस्थ यांना फौजदारी व दिवाणी कारवाईपासून संरक्षण दिलेले आहे.
वरीलपैकी कोणते विधान/ ने बरोबर आहे/ त?
१) अ, ब
२) अ, क
३) फक्त ब
४) वरील सर्व

यावर स्पष्टीकरण = मुलभूत हक्क

८)नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान/ विधाने बिनचूक आहे/ आहेत ? (STI मुख्य २०१६)
(अ) नागरिकांची मूलभूत कर्तव्ये ही ४२ व्या भारतीय घटनादुरुस्तीद्वारे १९७६ साली घटनेत समाविष्ट करण्यात आली.
ब) नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेत समावेश करणारा जपान हा एकमेव देश आहे.
क) भारतीय राज्यघटनेतील कलम ५१ मध्ये ११ मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. अकरावे कर्तव्य २००२ मध्ये केलेल्या
८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले.
पर्यायी उत्तरे
१) फक्त अ
२)फक्त अ आणि ब
३) फक्त अ आणि क
(४) वरीलपैकी सर्व
९) योग्य कथन ओळखा (STI मुख्य २०१६)
अ) डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी भाग ३ चे वर्णन संविधानाचा ‘सर्वाधिक टीकात्मक भाग’ असे केले आहे.
ब) डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी अनुच्छेद ३२ चे वर्णन संविधानाचा आत्मा आणि हृदय असे केले आहे.
पर्यायी उत्तरे
१) फक्त अ
२) फक्त ब
३) वरीलपैकी सर्व
४) वरीलपैकी एकही नाही
१०)जोड्या लावा: (STI मुख्य २०१६)

अ) कलम १४ i) शोषणविरुद्धचा अधिकार
ब) कलम २१ अ ii) पदव्यांची समाप्ती
क) कलम २३ iii) कायद्यासमोर समानता
ड) कलम १८ iv) ६ ते १४ वर्षाच्या सर्व मुलामुलींना मोफत व अनिवार्य शिक्षण
पर्यायी उत्तरे
अ ब क ड
१)iv ii i iii
२)iii iv i ii
३)i ii iii iv
४)ii iii iv i
११)परकीय यक्तींना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क व त्यासंदर्भातील राज्यघटनेतील कलम यांच्या जोड्या लावा:
(STI पूर्व २०१६)

ब (मुलभूत हक) (कलम )
अ) कायद्यासमोर समानता i ) कलम २८
ब) जीवित आणि व्यक्तिगत
स्वातंत्र्याचे रक्षण ii) कलम १४
क) धार्मिक स्वातंत्र्य iii) कलम २५
ड) शैक्षणिक संस्थांमध्ये
धार्मिक शिक्षण iv) कलम २१
पर्यायी उत्तरे
अ ब क ड
i ii iii iv
ii iv iii i
iii i iv ii
iv ii i iii
१२) खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?
अ. भाषिक अल्पसंख्य समुदायातील बालकांना प्राथमिक
शिक्षणाच्या टप्प्यावर मातृभाषेत शिक्षणाचा पुरेशी सोय पुरविण्यांत यावी. असे निर्देश आपले संविधान प्रत्येक राज्याला देते.

ब. धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कशाच्याही आधारे राज्याच्या अथवा राज्याचे अनुदान घेणाऱ्या कोणत्याही
शिक्षण संस्थेला कोणालाहि प्रवेश नाकारता येणार नाही.

क. शैक्षणिक संस्थेला अनुदान मंजूर करतांना केवळ तिचे व्यवस्थापन हे अप्लसंख्यकांचे आहे
या कारणास्तव राज्याला भेदभाव करता येणार नाही. (STI. मुख्य २०१७)
१) फक्त अ
२) फक्त ब
३) फक्त क
४) यापैकी कोणतेही नाही.
१३) भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. गणपती उत्सव आणि मोहरम
एकदम आले आहेत. प्रशासनाने गणपती उत्सव मंडळे आणि मोहरम ताबुत मंडळे या दोन्हीवर बंधने घातली. ही कृती

अ. धार्मिक स्वातंत्र्यांच्या विरुध्द
ब. घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारी आहे.
क. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि स्वास्थ्य रक्षणाकरिता घटनेने शासनाला बंधने घालण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाची कृती बरोबर आहे. वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहे / आहेत?
(STI. मुख्य २०१७)

१) फक्त ब
२) फक्त क
३) फक्त अ आणि क
४) फक्त अ आणि ब
१४)परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा झाल्यास खालीलपैकी कोणते मुलभूत अधिकार
निलंबित होऊ शकतात? (STI मुख्य २०१७ )

अ) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
ब) वृत्तपत्र स्वातंत्र्य
क) मुक्त संचार स्वातंत्र्य
ड) जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण
पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब
२) केवळ क
३) अ, ब, क आणि ड
४) अ, ब आणि क
१५)खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ? (STI मुख्य २०१८ )
अ) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद-१५ हे भारतीय नागि आणि परकीय अशा दोघांनाही उपलब्ध आहे.
ब) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद-१६ हे केवळ भारती नागरिकांनाच उपलब्ध आहे.
क) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद-२१ हे भारतीय नागरिक आणि परकीयांना देखील भारतीय भूमीवर उपलब्ध आहे
पर्यायी उत्तरे
१) फक्त अ
२) फक्त ब आणि क
३) फक्त क
४) अ, ब आणि क
१६) राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वावरील भाष्ये आणि भाष्यकार यांची जुळणी करा. (STI मुख्य २०१८)
अ) “….. त्यांना निदान शैक्षणिक मूल्य आहे. i) अॅलन ग्लेडसहिल
ब)”आर्थिक क्षेत्रातील समाजवाद” ii) बी. एन. राव
क) “सामाजिक क्रांतीची ध्येये पुढे नेण्याकडे रोख” iii) के. एम.
ड) “…… शासनाला इतरकाही iv) ग्रॅनव्हीले ऑस्टिन
गोष्टी करण्याबाबतच्या विधायक सूचना”
पर्यायी उत्तरे
अ ब क ड
ii iii iv i
i ii iii iv
iii iv i ii
iv i ii iii
१७)जोड्या लावा (अनुच्छेद आणि मूलभूत अधिकार) (STI राज्यसेवा-2019)
अनुच्छेद मूलभूत अधिका
a) अनुच्छेद 15 i) पदव्यांची समाप्ती
b) अनुच्छेद 17 ii) कायद्यासमोर समानता
c) अनुच्छेद 18 iii) भेदभावाचा अभाव
d) अनुच्छेद 14 iv) संधीची समानता
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
iii iv ii i
ii iv i iii
iii iv i ii
ii iii iv i

उतरे

१)अ २)ड ३)क ४)३ ५)१ ६)२ ७)३ ८)१ ९)१ १०)४
११)२ १२)४ १३)२ १४)४ १५)२ १६)१ १७)२
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch