महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग-राष्ट्रीय महामार्ग माहिती

महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे प्रकार ,राष्ट्रीय महामार्ग ,सुवर्ण चौकौन मार्ग, रा.सर्वात लांब , महारष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग,समृद्धी महामार्ग, MSRDC इत्यादी

महाराष्ट्र राज्यात एकूण १८ राष्ट्रीय महामार्ग यापैकी काही राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून सुरु होणारे आणि महाराष्ट्रात संपणारे  तसेच काही महराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि बरेच राज्य महामार्ग आहेत. या सर्व महामार्गांची एकूण लांबी ३३,७०५ km ,महाराष्ट्रीय सर्वात लांब महामार्ग त्यांचे विशेष माहिती चाल तर बघूया

महाराष्ट्रातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग

Source : google image

महामार्ग क्र. 6 (नविन क्र. 53) जो हाजिरा ते कोलकत्ता या प्रमुख शहरांना जोडतो तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर,भंडारा या शहरातून जातो त्याची एकूण लांबी भारतात 1949 km आणि महारष्ट्रात 797km आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत.

राज्यात सर्वात जास्त वाहतूकीचा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे पुणे-बेंगळुरू होय.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग pdf

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक यादी महाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून सुरु होणारे आणि महाराष्ट्रात संपणारे

महामार्ग क्र. कोठून कुठे महामार्गावरील शहरे राज्य
NH -4 (ब)
नवीन क्र.NH 348
न्हावाशिवा ते पळस्पे कळंबोली महाराष्ट्र
NH -4 (क)
कळंबोली मार्ग
विशेष : सर्वात कमी लांबीचा 7 km
न्हावाशिवा ते पळस्पे   महाराष्ट्र
NH 50
नवीन क्र.NH 60
पुणे ते नाशिक मंचर ,नारायणगाव , संगमनेर, सिन्नर महाराष्ट्र
NH 160
नवीन क्र. 160
सिन्नर ते अहमदनगर लोणी ,कोपरगाव ,राहुरी महाराष्ट्र
NH 211
नवीन क्र. 52
सोलापूर ते धुळे सोलापूर ,उस्मानाबाद ,बीड,जालना,औरंगाबाद ,जळगाव ,धुळे महाराष्ट्र
NH 204
नवीन क्र.
NH 166 व 361
रत्नागिरी ते नागपूर कोल्हापूर ,सोलापूर ,तुळजापूर ,लातूर,नांदेड ,यवतमाळ ,वर्धा ,बुटीबोरी येथेच NH 7 जोडतो महाराष्ट्र

महराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग

NH 4
नवीन क्र. 48
विशेष :पुणे -बंगलोर हायवे म्हणून प्रसिद्ध
मुंबई ते चेन्नई मुंबई ,पुणे, सातारा, कराड,कोल्हापूर,बेंगळूर महाराष्ट्र ,कर्नाटक ,तामिळनाडू
NH 8
नवीन क्र. 48
मुंबई ते दिल्ली मुंबई , अहमदाबाद , जयपूर, दिल्ली महाराष्ट्र,गुजरात,राजस्थान ,हरियाणा ,दिल्ली
NH 13
नवीन क्र. 52
सोलापूर ते मंगलोर सोलापूर , विजापूर,चित्रदुर्ग ,मंगलोर महाराष्ट्र,कर्नाटक
NH 17
नवीन क्र. 66
विशेष :
मुंबई -गोवा म्हणून प्रसिद्ध
पनवेत ते कोची पनवेल ,महाड,चिपळूण,राजापूर,सावंतवाडी , गोवा, महाराष्ट्र ,गोवा,कर्नाटक ,केरळ

द्रुतगती मार्ग (Express Way)

महाराष्ट्रात प्रमुख द्रुतगती मार्ग मुंबई ते पुणे 95 km चा सहापदरी रोड आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग

  • महामार्ग = मुंबई ते नागूपर 701km आहे.
  • रुंदी : 120 मीटर आहे.
  • 10 जिल्हे, 26 तालुके व 390 गावातून हा महामार्ग जातो.
  • हा आठपदरी द्रुतगती महामार्ग आहे.
  • समृद्धी महामार्ग (हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग)

MSRDC

  • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
  • स्थापना 1996
  • BOT तत्त्वावर रस्ते विकासाचे कार्यक्रम राबविते
  • कशासाठी स्थापन = प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून रस्ते विकासाचा कार्यक्रम राबविण्याकरिता

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण

  • उद्देश मुंबई शहर व परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याकरिता.
  • स्थापना MMRDA Act 1974 अन्वये 26 जानेवारी 1975 करण्यात आले

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना

  • ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे.
  • 2000 पासून सुरू झाली.
  • उद्देश रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना जोडणे (500/500 अधिक लोकसंख्या असलेल्या व रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना बारमाही रस्त्यांना जोडणे.)

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरुवात 2015-16 पासून. या मागचे उद्देश रस्त्यांनी न जोडलेल्या वस्त्यांना जोडणे व अस्तित्वातील स्त्यांचा दर्जा सुधारणे.

राष्ट्रीय महामार्ग माहिती

राष्ट्रीय महामार्ग विशेष म्हणजे भारतातील विशेष राष्ट्रीय महामार्ग या बद्दल जाणून घेणार आहोत AH , NH ,SH काय? भारतातील सर्वात लांब मार्ग  मार्ग

सांकेतिक चिन्ह रस्त्याचा कडेला दिसणारे हे काय आहे. AH, NH आणि SH यांसारखी सांकेतिक चिन्हाने दर्शवली जातात.

AH = Great Asian Highways म्हणजे आशियायी आंतरराष्ट्रीय महामार्ग होय. जो आशिया मधील देशांना जोडतो.

NH = National Highways म्हणजे राष्ट्रीय महामार्ग होय.

SH = State Highways म्हणजे राज्य महामार्ग होय

राष्ट्रीय महामार्ग म्हणजे अशे महामार्ग जे केंद्र सरकार मार्फत तयार केले जातात त्या महामार्गांना राष्ट्रीय महामार्ग असे म्हणतात. विशेष म्हणजे केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्ग तयार करत असते व त्यांची देखभालहि करत असते.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची स्थापना 1988 साली करण्यात आली. उद्देश देशातील राष्ट्रीय महामार्गाचा विकास करणे, देखभाल करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याचे काम है प्राधिकरण करतं भारताचे रोड नेटवर्क हे जगातील दुसरे सर्वात मोठे रोड नेटवर्क आहे.

  • उत्तर ते दक्षिण (जम्मू – काश्मीर ते कन्याकुमारी) या मुख्य रस्त्याचे एकूण अंतर 4000 km
  • पूर्व ते पश्चिम ( पोरबंदर ते सिलचर ) या मुख्य रस्त्याचे एकूण अंतर 3300 किमी आहे.

रस्त्यांचे प्रकार १) राष्ट्रीय महामार्ग २) राज्य महामार्ग ३) प्रमुख जिल्हा मार्ग ४) इतर जिल्हा मार्ग ५) ग्रामीण रस्ते.

भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग

Source : google image

राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 व 7 नागपूर शहरात एकमेकांना छेदतात.

पश्चिम किनाऱ्याला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 (नविन = 66) मार्ग पनवेल ते कोचिन (पेण, महाड, चिपळूण, राजापूर, कणकवली, सावंतवाडी)

पूर्व किनाऱ्याला समांतर राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. 5 होय.

राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबीनुसार महाराष्ट्रामध्ये, राजस्थान व तमिळनाडू पेक्षा जास्त आहे.

भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग क्र.7 (नविन क्र. 44) हा महामार्ग वाराणशी ते कन्याकुमारी पर्यंत आहे. ज्याची लांबी 2369 km आहे. हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून नागपूर, हिंगणघाट (वर्धा),कारंजी, पांढरकवडा येथून जातो त्याची लांबी महाराष्ट्रात 268 km आहे.

सुवर्ण चौकौन मार्ग

हे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या भारतातील मुख्य शहरांबरोबरच तशेच महाराष्ट्रात पुणे, बंगलोर आणि अहमदाबाद या शहरांना देखील जोडतो. या रस्त्याचे एकूण अंतर 5846 km  आहे.

FAQ

भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग

उत्तर = महामार्ग क्र.7 (नविन क्र. 44) हा महामार्ग वाराणशी ते कन्याकुमारी पर्यंत आहे. ज्याची लांबी 2369 km आहे.

समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो?

उत्तर = 10 जिल्हे आणि 390 गावांमध्ये पसरलेला आहे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch