भाग STI-महाराष्ट्र कृषी व उदयोग MCQ

नमस्ते महाराष्ट्र कृषी व उदयोग MCQ विश्लेषण आयोगाने विचारलेले प्रश्न STI या पेपर ला विचारलेले पूर्व आणि मुख्य परीक्षेत

मित्रानो महाराष्ट्र कृषी व उदयोग MCQ यावर आयोगाने विचारलेले प्रश्न विश्लेषण केल्यावर समजले कि या घटकवर आयोग नेहमी प्रश्न विचारतात चला तर भाग STI  यावर आयोगाने विचारलेले प्रश्न जाणून घेऊया .

भाग STI

प्र.17. खालीलपैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढण्यास कारणीभूत झाले आहेत? (STI पूर्व, 2015)

अ) सरळ समुद्र किनारा  ब) विस्तीर्ण समुद्र बुड

क) सहकारी संस्था        ड) सरकारी आधार

पर्यायी उत्तरे :

1) अ, ब आणि क          2) ब, क आणि ड 

3) अ, आणि ब              4) वरील सर्व

 

प्र.18. नारळाच्या शेतीखाली असलेल्या क्षेत्राच्या संदर्भात खालील जिल्हे उतरत्या क्रमात लावा. (STI मुख्य 2014)

पर्यायी उत्तरे :

1) ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी

2) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे 

3) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड

4) रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग

 

प्र.19. योग्य जोडया लावा. (STI मुख्य 2014)

पिक               पिकाची जात

अ) तांदूळ        1) निळवा

ब) गहू             2) श्रद्धा

क) ज्वारी         3) सोनालिका

ड) बाजरी        4) कस्तुरी

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 3 1 2 4

2) 4 3 1 2 

3) 1 2 4 3

4) 2 1 3 4

 

प्र.20. खालील विधानापैकी चुकीची विधान कोणते? (STI पूर्व, 2014)

अ) महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन रायगड जिल्ह्यात होते.

ब) कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गहू पिकविला जात नाही.

क) भारतात सर्वात जास्त केळी उत्पादन महाराष्ट्रात होते.

ड) महाराष्ट्रात खरीप पिकांचे सर्वात कमी क्षेत्र अकोला-वाशिम जिल्ह्यात आहे.

पर्यायी उत्तरे :

1) अ फक्त 2) ड फक्त

3) अ, ब आणि क 4) ब, क आणि ड

उत्तर (#) हा प्रश्न आयोगाने रद्द केले आहे

 

प्र.21. पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त? (STI पूर्व, 2014)

अ) रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हर्ने येथे आहे.

ब) दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात.

पर्यायी उत्तरे :

1) केवळ अ योग्य आहे.

2) केवळ ब योग्य आहे. 

3) अ व ब दोन्ही योग्य आहेत.

4) अ व ब दोन्ही योग्य नाहीत.

 

प्र.22. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? (STI मुख्य, 2014)

अ) लक्ष्मी, सावित्री,वाराणशी ह्या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या भारताच्या प्रजाती आहेत.

ब) रत्न, रायभोग, काळीमूछ ह्या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या प्रजाती आहेत.

पर्यायी उत्तरे :

1) केवळ अ योग्य आहे.

2) केवळ ब योग्य आहे.

3) अ व ब दोन्ही योग्य आहेत.

4) अ व ब दोन्ही योग्य आहेत.

 

प्र.23. खालील आणि ब ही विधाने वाचून योग्य पर्याय निवडा (STI मुख्य 2012)

अ) महाराष्ट्रामध्ये लागवडी खालील क्षेत्र व नत्क मशागत क्षेत्र यांचे गुणोत्तर अत्यंत कमी आहे.

ब) बेसाल्ट या खडकामध्ये पाणी मुरत नसल्याने भूगर्भातील पाण्याचे साठे कमी आहेत.

पर्यायी उत्तरे :

1) अ आणि ब ही दोन्ही विधाने सत्य असून ब हे अ ची कारणमीमांसा देते. 

2) अ आणि ब ही दोन्ही विधाने सत्य असली तर ब हे अ ची योग्य कारणमिमांसा देत नाही.

3) अ सत्य असून ब चूक आहे.

4) अ चूक असून ब सत्य आहे.

 

प्र.24. खालील अ आणि ब ही विधाने वाचून योग्य पर्याय निवडा : (STI मुख्य 2012)

अ) मुंबई मध्ये सखोल शेती केली जाते.

ब) जमिनीचे मोठे भाडे तत्व शेतकऱ्याला कमी काळात उत्पादन देणारी पिके घ्यायला लावतो.

पर्यायी उत्तरे :

1) अ आणि ब ही दोन्ही विधाने सत्य असून ब हे अ ची कारणमिमांसा देते.

2) अ आणि ब ही दोन्ही विधाने सत्य असली तरी ब हे अ ची योग्य कारणमिमांसा देत नाही.

3) अ सत्य असून ब चूक आहे.

4) अ चूक असून ब सत्य आहे. 

 

प्र.25. महाराष्ट्रातील कोणता विभाग सोयबीन पिकाच्या उत्पादनात अग्रेसर आहे? (STI मुख्य 2012)

1) कोकण         2) विदर्भ 

3) प. महाराष्ट्र   4) मराठवाडा

 

प्र.26. जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? (STI पूर्व, 2012)

1) परभणी       2) लातूर

3) भंडारा         4) औरंगाबाद 

 

प्र.27. महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने————जिल्ह्यात आढळतात? (STI मुख्य 2011)

1) सोलापूर       2) अहमदनगर 

3) जालना        4) अमरावती

 

प्र.28. तिळाच्या लागवडीसाठी————–हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे? (STI मुख्य 2011)

1) सोलापूर       2) कोल्हापूर

3) जळगाव     4) औरंगाबाद

 

प्र.29. महाराष्ट्रातील———-जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरीता प्रसिध्द आहेत. (STI पूर्व, 2011)

1) धुळे व नाशिक          2) पुणे व नाशिक

3) सातारा व नाशिक     4) सांगली व नाशिक 

 

प्र.30. हापूस आंब्याची झाडे———–जिल्हे आढळतात? (STI पूर्व, 2011)

1) सिंधुदुर्ग        2) रत्नागिरी

3) रायगड        4) वरील सर्व जिल्ह्यात 

 

Source : अप्पा हातनुरे सर lates पुस्तकचे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch