महाराष्ट्र कृषी व उदयोग MCQ विश्लेषण आयोगाने विचारलेले

नमस्ते कृषी व उदयोग MCQ  प्रश्न आयोगाने विचारलेले ASO या परीक्षेत पर्व आणि मुख्य या परीक्षेत विचारलेले प्रश्न

मित्रानो महाराष्ट्र कृषी व उदयोग हा घटक मोठा आणि महत्वाचा आहे आयोग यावर प्रश्न विचारतात PSI ,ASO ,STI  या परीक्षेत पर्व आणि मुख्य परीक्षेत विचारलेले आहे . हा घटक मोठा असल्यामुळे याचे तीन भाग केले आहे .

भाग ASO ,भाग PSI ,भाग STI  असे तीन भाग पडले आहे . चला तर आयोग कसे विचारलेले प्रश्न बघूया

भाग  ASO

प्र.1. खालील विधानांचा विचार करा : (ASO मुख्य 2018)

अ) 1933 सालापासून महाराष्ट्र राज्यात सूतगिरण्यांच्या विकेंद्री-करणाची सुरुवात झाली.

ब) आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क (IIP) नवी मुंबई येथे आहे.

पर्यायी उत्तरे :

1) फक्त अ विधान बरोबर आहे.

2) फक्त ब विधान बरोबर आहे.

3) अ आणि ब विधाने बरोबर आहेत 

4) अ आणि ब विधाने बरोबर नाहीत.

 

प्र.2. आर्थिक व्यवसाय व आर्थिक क्रिया यांच्या योग्य जोडया लावा. (Asst पूर्व, 2017)

आर्थिक व्यवसाय           आर्थिक क्रिया

अ) लघुउद्योग              1) प्राथमिक

ब) व्यापार                  2) व्दितीयक

क) बौद्धिक क्षमतेच्या सेवा 3) तृतीयक

ड) मासेमारी               4) चतुर्थक

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 1 2 3 4

2) 2 3 4 1 

3) 2 1 4 3

4) 4 3 2 1

 

प्र.3. चंद्रपूरमधील नागभिड येथे कोणता उदयोग आहे? (Asst मुख्य 2017)

1) लुगडी

2) रेशम कापड (उत्तर)

3) लाकडी खेळणी

4) चादरी

 

प्र.4. महाराष्ट्रातील पिकांचा त्यांच्या 2011-12 मधील लागवडीखालील क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा. (ASO पूर्व, 2016)

अ) कापूस        ब) ऊस

क) ज्वारी         ड) गहू

इ) तांदूळ

पर्यायी उत्तरे :

1) क, अ, ब, ड, इ

2) अ, क, इ, ब, ड 

3) अ, इ, क, ड, ब

4) इ, क, ड, अ, ब

 

प्र.5. अंजीर पिकाचे उत्पन जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? (ASO पूर्व, 2015)

1) सिंधुदुर्ग

2) कणकवली

3) राजेवाडी 

4) वसई

 

प्र.6. महाराष्ट्रातील शेती संदर्भातील विधानाची अभ्यास करा. (Asst मुख्य 2014)

अ) महाराष्ट्रातील सर्वात जास्त पिकाखालील एकूण क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यात तर सर्वात कमी क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.

ब) महाराष्ट्रात रब्बी पिकांचे सर्वात जास्त क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे तर सर्वात कमी क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे.

पर्यायी उत्तरे :

1) विधान अ बरोबर आणि विधान ब चूक आहे.

2) विधान अ चूक आणि विधान ब बरोबर आहे.

3) विधान ब आणि विधान अ चूक आहेत.

4) विधान अ आणि विधान ब बरोबर आहेत. 

 

प्र.7. खालील विधाने पहा : (Asst मुख्य 2014)

अ) महाराष्ट्रात पहिली सुत गिरणी इ.स.1851 मध्ये कावसजी टाटा यांनी मुंबईत सुरु केली.

ब) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना 1955 साली पद्मश्री विठ्ठलराव

विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाला.

पर्यायी उत्तरे :

1) दोन्ही विधाने बरोबर

2) दोन्ही विधाने चूक 

3) अ बरोबर त ब चूक

4) ब बरोबर तर अ चूक

 

प्र.8. महाराष्ट्राची मृदा व हवामान फळांच्या वाढीसाठी पोषक असल्याने अनेक प्रकारच्या फळांचे उत्पादन केले जाते? (ASO मुख्य, 2014)

अ) सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सर्वात जास्त जागेत फळांचे उत्पादन घेतले जाते.

ब) महाराष्ट्रात भारताच्या एकूण केळी उत्पादनाच्या 20% उत्पादन होते.

क) लातूर जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन होत नाही.

पर्यायी उत्तरे :

1) विधान अ आणि विधान ब बरोबर आहेत. 

2) विधान अ आणि विधान क बरोबर आहेत.

3) विधान ब आणि विधान क बरोबर आहेत.

4) विधाने अ, ब आणि विधान क बरोबर आहेत.

 

प्र.9. दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागांचे प्रमुख केंद्र आहे? (ASO पूर्व, 2013)

1) बार्शी           2) इचलकरंजी   3) मीरज          4) सांगली

 

प्र.10. देशातील पहिली ‘संत्रा वायनरी’ नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? (ASO पूर्व, 2012)

1) सावरगाव              2) भिवापूर

3) काटोल                   4) नारखेड

 

प्र.11. योग्य जोडया लावा. (ASO पूर्व, 2012)

अ) आपटा        1) पेपर

ब) पळस          2) काथ

क) खैर            3) रंग

ड) बांबू            4) बिडी

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 1 2 3 4

2) 2 3 1 2

3) 3 4 2 1

4) 4 1 4 3

(उत्तर) (#) हा प्रश्न आयोगाने रद्द केले आहे

 

प्र.12. महाराष्ट्रातील मासेमारीबद्दल काय खरे नाही? (ASO पूर्व, 2012)

अ)महाराष्ट्रात मासेमारीसाठी 75000 पेक्षा अधिक चौ.कि.मी. क्षेत्र उपयुक्त आहे.

ब) महाराष्ट्रात मासेमारी खाऱ्या, निमखाऱ्या व गोडया पाण्यावर चालते.

क) अधिक मासेमारी गोडया पाण्यावर चालते.

ड) सुमारे अर्धे पकडलेले मासे सुकविले जातात.

इ) तीव्र उन्हाळ्यात मासेमारी बंद असते.

पर्यायी उत्तरे :

1) अ, ब

2) क, ड

3) क, इ   

4) अ, ड

 

प्र.13. दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात गडद प्रदेश खालीलपैकी कोणत्या पिकांच्या उत्पादन प्रदेश दाखवतो? (ASO मुख्य, 2012)

 

मित्रानो येथे  नकाशा आहे .

 

1) ज्वारी, बाजरी, गहू 

2) तांदूळ, गहू, बाजरी

3) गहू, बाजरी, मका

4) कापूस, ज्वारी, तांदूळ

 

प्र.14. योग्य जोडया लावा. (ASO मुख्य, 2012)

यादी I (विद्यापीठ)                              यादी II (ठिकाण)

अ) महात्मा फुले कृषी विद्यापीठ            1) दापोली

ब) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ      2) राहुरी

क) डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण          3) परभणी

कृषी विद्यापीठ

ड) मराठवाडा कृषी विद्यापीठ               4) अकोला

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 1 2 3 4

2) 4 2 3 1

3) 2 4 1 3 

4) 3 4 2 1

 

प्र.15. योग्य जोडया लावा. (ASO मुख्य, 2012)

यादी I (फळे)     यादी II (उत्पादक प्रदेश)

अ) केळी          1) मालवण

ब) काजू           2) श्रीरामपूर

क) मोसंबी       3) वसई

ड) कलिंगड       4) अलिबाग

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 3 1 2 4

2) 1 2 4 3

3) 2 1 3 4

4) 4 3 2 1

प्र.16. खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही? (ASO पूर्व, 2011)

1) इंद्रायणी       2) जया           3) हंसा            4) हिरामोती 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch