भाग PSI महाराष्ट्र कृषी आणि उदयोग MCQ विश्लेषण आयोगाने विचारलेले

नमस्ते  महाराष्ट्र कृषी आणि उदयोग MCQ आयोगाने विचारलेले प्रश्न PSI यावर पूर्व आणि मुख्य या परीक्षेत विचारलेले २०११ पासून ते आतापर्यंत

मित्रानो विश्लेषण केल्यावर समजले कि २०११   ते २०१६  पर्यंत आयोगाने पूर्व आणि मुख्य परीक्षेत विचारलेले आहे . असे नही कि येणाऱ्या परीक्षेत विचारू शकत नाही. आयोग आहे .

भाग  PSI

प्र.31. योग्य जोडया लावा. (PSI पूर्व, 2016)

जिल्हा            मासेमारी केंद्र

अ) मुंबई          1) श्रीवर्धन

ब) ठाणे           2) वेंगुर्ला

क) रायगड       3) वर्स्रोवा

ड) रत्नागिरी     4) सातपाटी

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 1 2 3 4

2) 4 1 2 3

3) 3 4 1 2

4) 2 3 4 1

उत्तर (#) आयोगाने हा प्रश्न रद्द केले आहे

 

प्र.32. भारतात ‘जल –मनुख्य’ (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते? (PSI पूर्व, 2016)

1) माधवराव चितळे      2) मेघा पाटकर

3) सुंदरलाल बहगुणा     4) राजेंद्र सिंह 

 

प्र.33. योग्य जोडया लावा . (PSI पूर्व, 2016)

शहरे                         कार्य

अ) पुणे, मुंबई              1) उद्योगधंदे

ब) मनमाड, नागपूर       2) व्यापार/ बाजारपेठ

क) वारणानगर, प्रवरानगर 3) प्रशासकीय

ड) सांगली, निफाड        4) वाहतूक

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 3 4 1 2 

2) 3 1 4 2

3) 2 3 1 4

4) 4 3 1 2

 

प्र.34. कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता? (PSI पूर्व, 2013)

1) यवतमाळ     2) अमरावती     3) पुणे     4) जळगाव

 

प्र.35. योग्य जोडया लावा. (PSI पूर्व, 2013)

यादी I(पिके)     यादी II (प्रमुख सुधारित जाती)

अ) गहू            1) सुवर्णा

ब) ज्वारी         2) बन्सी

क) तांदूळ         3) लक्ष्मी

ड) कापूस         4) चिनोर

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 1 2 3 4

2) 2 4 3 1

3) 2 1 4 3 

4) 3 2 1 4

 

प्र.36. जिल्हे व पिके याबाबत पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत? (PSI मुख्य, 2013)

अ) नाशिक जिल्हा बाजरी उत्पादनात अग्रेसर आहे.

ब) भंडारा जिल्हा भात उत्पादनात अग्रेसर आहे.

क) कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीन उत्पादन होत नाही.

ड) ठाणे जिल्ह्यात ऊसाचे उत्पादन घेतले जाते.

पर्यायी उत्तरे :

1) अ, क, ड       2) अ, ब     3) अ, ब, क      4) क, ड

 

प्र.37. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली? (PSI मुख्य, 2013)

1) वसंतराव नाईक                  2) शंकरराव चव्हाण

3) यशवंतराव चव्हाण      4) वसंतराव पाटील

 

प्र.38. नारळाची लागवड झाल्यावर किती वर्षात फळे यावयास लागतात आणि साधारणपणे किती वर्षापर्यंत फळधारणा होत राहते? (PSI मुख्य, 2013)

1) 5 ते 10 वर्षात व 50 वर्षापर्यंत

2) 2 ते 3 वर्षात व 30 वर्षापर्यंत

3) 12 ते 15 वर्षात व 75 वर्षापर्यंत

4) 5 ते 10 वर्षात व 100 वर्षापर्यंत 

 

प्र.39. महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? (PSI पूर्व, 2012)

1) ईशान्य भागात         2) पश्चिम भागात 

3) आग्रेय भागात           4) मध्य भागात

 

प्र.40. महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? (PSI पूर्व, 2012)

1) पश्चिम महाराष्ट्र        2) विदर्भ आणि मराठवाडा 

3) कोकण                   4) उत्तर महाराष्ट्र

 

प्र.41. खालील विधानांचा आढावा घ्या. (PSI मुख्य, 2012)

अ) देशाच्या औषधोउत्पादनामध्ये पूर्वी महाराष्ट्राचा वाटा 15% होता.

ब) देशाच्या औषधोउत्पादनामध्ये पूर्वी महाराष्ट्राचा वाटा 40%होता.

क) देशाच्या औषधोउत्पादनामध्ये सध्या महाराष्ट्राचा वाटा 40% आहे.

ड) देशाच्या औषधोउत्पादनामध्ये सध्या महाराष्ट्राचा वाटा 15% आहे.

कोणती विधाने बरोबर आहे?

1) अ आणि ब    2) ब आणि क

3) क आणि ड    4) ब आणि ड 

 

प्र.42. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये प्रमुख फळ, उत्पादन करणारे जिल्हे छायांकित केलेले आहेत, ते जिल्हे खाली दिलेल्या फळांच्या नांवाशी योग्य जोडया लावा. (PSI मुख्य, 2012)

अ) केळी          ब) द्राक्षे           क) आंबा          ड) संत्री

सांकेतिक :

अ ब क ड

1) 1 2 3 4

2) 2 1 4 3 

3) 4 3 2 1

4) 2 3 1 4

 

प्र.43. खालील विधाने महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाची ठिकाणे व स्थापना दर्शवितात त्यांच्या आढावा घ्या. (PSI मुख्य, 2012)

अ) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जिल्हा – अहमदनगर 1968.

ब) डॉ. पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठ, अकोला जिल्हा-अकोला – 1969

क) डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली जिल्हा- रत्नागिरी- 1972

ड) मराठवाडा कृषी विद्यापीठ, मुदखेड, जिल्हा नांदेड – 1992

वरीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

1) अ आणि ब    2) फक्त क

3) ब आणि क    4) फक्त ड 

 

प्र.44. अयोग्य जोडी ओळखा : (PSI मुख्य, 2012)

फळ                संशोधन केंद्र

अ) आंबा           वेंर्गुला – सिंधुदुर्ग

ब ) नारळ         रत्नागिरी – रत्नागिरी

क) केळी            यावल – जळगाव

ड) संत्री               श्रीरामपूर – अहमदनगर

पर्यायी उत्तरे :

1) अ    2) ब     3) क     4) ड 

 

प्र.45. जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यांत खालीलपैकी कोणते पिक सर्वात महत्वाचे पिक आहे? (PSI मुख्य, 2012)

1) कापूस         2) ज्वारी          3) भुइमुग         4) केळी 

 

प्र.46. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उदयोग मोठया प्रमाणात चालतो? (PSI पूर्व,2011)

1) सिंधुदुर्ग        2) रत्नागिरी

3) सातारा        4) कोल्हापूर 

 

प्र.47. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरु करण्यात आले आहे? (PSI पूर्व, 2011)

1) लोणंद         2) पाडेगाव         3) शेखामिरेवाडी          4) कागल

 

प्र.48. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्टॅबेरी लागवडीसाठी प्रसिध्द आहे? (PSI मुख्य, 2011)

1) महाबळेश्वर     2) रत्नागिरी      3) नाशिक       4)नागपूर

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch