महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाल ,आंबोली ,खंडाळा ,चिकलदरा,महाबळेश्वर यांच्याबद्दल माहिती

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते

जिल्हा
ठिकाण
नंदुरबार तोरणमाळ
जळगाव पाल
पालघर जव्हार
सिंधुदुर्ग आंबोली
सातारा महाबळेश्वर
पाचगणी
कोल्हापूर पन्हाळा
पुणे लोणावळा
खंडाळा
औरंगाबाद म्हैसमाळ
बीड चिंचोली
अमरावती चिकलदरा
नागपूर रामटेक

म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण

म्हैसमाळ हे महाराष्ट्रातील औरंगाबादमधील थंड हवेचे ठिकाण आहे. त्याची समुद्रसपाटीपासून 106 मीटरपेक्षा जास्त उंचीवर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. त्याला ‘मराठवाड्याचे महाबळेश्वर’ ओळखले जाते . म्हैसमाळ हे निर्मळ निसर्ग आणि चित्तथरारक भूप्रदेश यांचे उत्तम मिश्रण आहे.

पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण

Credit : google

पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण लोणावळा खंडाळा हे आहे . लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.लोणावळापासून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या ५ किलोमीटरवर आहे.

पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून ६३० m( सहाशे तीस मीटर) उंचीवर आहे. पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे.

सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण

पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे.

जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले थंड हवेचे ठिकाण पाचगणीचे आहे . महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि. मी. अंतरावर आहे.

वैशिष्ट्य महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लॅंड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत. येथील टेबल लॅंड वर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे.

प्रसिद्ध येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. पूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वाला रस बाहेर येऊन हे डोंगर तयार झाले असावे.असे मानले जाते

चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण

चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यात. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. चिखलदरा हा महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेले एक शहर आहे.

विशेष चिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते.

इतिहासिक पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदऱ्यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.

FAQ

Q. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे

उत्तर = तोरणमाळ हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील क्र. २ थंड हवेचे चे निसर्गरम्य ठिकाण आहे.

Q. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे

उत्तर = चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यात

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch