महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प जाणून घ्या माहिती

नमस्ते मित्रानो आज महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प या बद्दल , जलविद्युत बद्दल सामान्य माहिती , कोयना जलविद्युत केंद्र ,वैतरणा जलविद्युत प्रकल्प, संयुक्त जलविद्युत प्रकल्प 

जलविद्युत निर्मिती पाण्याच्या स्थितीजन्य अथवा प्रवाहजन्य शक्तीचा उपयोग करून जनित्राचा आंस फिरविल्यावर जल विद्युत निर्माण होते ,पावसाळ्यात वाहणारे पाणी एका धरणात साठवले जाते, व नंतर तेच पाणी उन्हाळ्यात वापरले जाते. साधारणतः धरणाच्या उंचीपासून किंवा पाण्याच्या पातळीपासून जनित्रापर्यंतची उंची २५ ते २५०० मीटर इतके असते.

जल विद्युत निर्मिती ही उंचावर असलेल्या पाण्याची स्थितीज ऊर्जा (Potential Energy) वापरुन त्याला विद्युत उर्जेत करून केली जाते.जलविद्युत निर्मितीसाठी उंचावर पाण्याचा साठा करून ते विद्युत गृहात बर्‍याच खालच्या उंचीवर पाठवले जाते तिथे त्या पाण्याची ऊर्जा वापरुन Turbine फिरवले जाते व त्यावर विद्युत जनित्र फिरवून वीज निर्मिती होते

जलविद्युत निर्मिती फायदे धरणात पुरेसा साठ असल्यास गरज असल्यास तेव्हा वीजनिर्मिती करता येते , जलविद्युत उर्जा निर्मिती केंद्रात कुटल्याही  प्रकारचे ज्वलन होत नाही त्यामुळे वायू प्रदूषण होत नाही 

महाराष्ट्रातील सर्वात लहान जलविद्युत धोम प्रकल्प हा सातारा जिल्ह्यात आहे  आणि महाराष्ट्रातील मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना प्रकल्प हा सातारा जिल्ह्यात जिल्ह्यात आहे 

१९२२ ला भिवपुरी जलविधुत प्रकल्प क्षमता ५ मेगावॅट आणि  १९२७ ला भीमा जलविधुत प्रकल्प क्षमता ३०० मेगावॅट

संयुक्त जलविद्युत प्रकल्प

  • नर्मदा सरोवर =गुजरात आणि महाराष्ट्र
  • पेंच (तोतलाडोह )=मध्यप्रदेश आणि नागपूर

महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प

कोयना जलविद्युत प्रकल्प

कोयना जलविद्युत प्रकल्प सुरुवात १६ जानेवारी १९५४ कृष्णा नदीची उपनदी कोयना आहे.जिल्हा सातारा  तालुका पटना हेळवाकजवळील देशमुखवाडी या ठिकाणी कोयना नदीवर धरण बांधून पाणी आडवले आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाची एकूण विद्युतनिर्मिती क्षमता 1920 मेगावॅट आहे. या मध्ये खालील ठिकाणचे मिळून आहे जसेकी

ठिकाण जलविद्युत क्षमता
धरणपायथा ४० मेगावॅट
अल्लोरे ३२० मेगावॅट
पोफळी ५६० मेगावॅट
तांबरवाडी १००० मेगावॅट
  एकूण मेगावॅट 1920

कोयना जलाशयात दोन वेळेस लेक टॅपिंगचा प्रयोग १) 13 मार्च 1999 रोजी.  २) एप्रिल 2012 मध्ये.

वैतरणा जलविद्युत प्रकल्प

मध्य वैतरणा धरणावर संकरित ऊर्जा प्रकल्प पालघर जिल्ह्य़ातील मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावात उभारलेल्या मध्य वैतरणा धरणावर आता २० मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत तर ८० मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा असा एकूण १०० मेगावॉट क्षमतेचा संकरित वीजनिर्मिती प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे.

वैशिष्टय़े
संकरित ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणारी देशातील मुंबई महानगरपालिका ही पहिलीच ठरली आहे. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे २०८ दशलक्ष युनिट ऊर्जानिर्मिती होणार हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प जलाशयातील पाण्यावर आधारित असल्याने त्यासाठी वेगळ्या जागेची आवश्यकता नाही.

हा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे ५३६ कोटी रुपये खर्च असून प्रकल्प विकासकास तो करावा लागणार आहे. तरी प्रकल्पाची मालकी ही महानगरपालिकेचीच राहणार आहे.

कोचाळे गाव १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण (हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय) २०१४ मध्ये पूर्ण केले. धरणाच्या निर्मितीवेळीच जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा तसेच जलविद्युतनिर्मितीसाठी सयुक्तिक बहिर्गामी जलवाहिनीही टाकण्यात आली होती. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने या जलाशयातून जलविद्युतनिर्मिती करण्यासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी मुंबई महानगरपालिकेस परवानगी दिली.

संविधान निर्मिती-महिला,मसुदा समिती

महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र कोणते

जिल्हा ठिकाण जलविद्युत
राजगड खोपोली
भिरा
भिवपुरी
डोलवहाल
परभणीत येलदरी पूर्णा नदीवर जिंतूर तालुक्यात
औरंगाबाद जायकवाडी
सातारा धोम कण्हेर
विशेष :सर्वात लहान २ मेगावॅट
कोल्हापूर राधानगरी
धुधगंगा
वारणा
सोलापूर उजनी
सिंधुदुर्ग तिलारी (कोल्हापूर -सिंधुदुर्ग दरम्यान )
ठाणे भातसा
पालघर वैतरणा
सूर्या
पुणे भाटघर
वीर
पवना
पानशेत
वरसगाव
मुळशी
अहमदनगर भंडारदरा
निळवंडे
नागपूर पेंच
नासिक दारणा
करंजवन
गौतोमी गोदावरी
बीड माजलगाव

रोगशास्र -सविस्तर रोगाबद्दल माहिती

महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प

पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली हा आहे आणि तो  रायगड जिल्ह्यात आहे ,खोपोली प्रकल्पची स्थापना १९१५ ला झाला आहे याची क्षमता ७२ मेगावॅट निर्मिती  त्याचा मालक टाटा पावर लिमिटेड आहे  

भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प दार्जिलिंग हा आहे . १० नोव्हेंबर १८९७ भारतातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प दार्जिलिंग येथे हा पश्चिम बंगाल राज्यात येतो 12 कि. मी अंतरावरील ‘आर्टा टी इस्टेटच्या’ डोंगर पायथ्याला हाच प्रकल्प आशियाखंडातील पहिला जलविद्युत प्रकल्पही समजण्यात येतो. दार्जिलिंग क्षमता १३० मेगावॅ 3600 फूट उंचीवर आहे 

भारतात जलविधुत उर्जा विकासाची सुरुवात १० नोव्हेंबर १८९७ पासून जाली

FAQ

Q. महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प

उत्तर =पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली हा आहे आणि तो  रायगड जिल्ह्यात आहे

  • कोयना जलविद्युत प्रकल्प सुरुवात केव्हा झाली ?

    उत्तर=16 जानेवारी १९५४

  • राधानगरी जलविद्युत प्रकल्प सुरुवात केव्हा झाली

    उत्तर =९ फेब्रूवारी १९०८

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch