भारतीय दंड संहिता MCQ-PSI kayde MCQ

भारतीय दंड संहिता MCQ  या मध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न समाविष्ट केले आहे. अभ्यास करण्यास जालेले पेपरचे अभ्यास करणे खूप महत्व असते विश्लेषणाने अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे.

भारतीय दंड संहिता या घटक वर आयोगाने ४० पेक्षा अधिक प्रश्न विचारलेले आहे. चला तर जाणून घेऊया कसे आले आहे.

शेवटी : उत्तर दिले आहे. 

प्र. १) खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये सदोष मनुष्यवध हा खून नसतो ? ( PSI मुख्य २०१३ )

A) जेव्हा सदोष मनुष्यवध हा स्वत:चा बचाव करण्याच्या हक्काचा कायदेशीर वापर करताना झाला असेल.

B) जेव्हा सदोष मनुष्यवध हा आकस्मिक भांडणातून संतापाच्या भरात आकस्मिक मारामारी सुरु झाली असता झाला असेल.

C) जेव्हा सदोष मनुष्यवध गंभीर व आकस्मिक प्रक्षोभामुळे स्वत:वरचा ताबा सुटल्याने झाला असेल.

D) वरीलपैकी सर्व पर्याय


प्र. २) भारतीय दंड संहिता, १८६० अंतर्गत खालीलपैकी कोणत्या बाबी गुन्हा या सदरात येणार नाहीत ?
( PSI मुख्य २०१३ )

अ) डॉक्टरने पेशंटची संमती घेऊन त्याच्यावर काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करताना पेशंट दगावल्याने डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा.

ब) डॉक्टरने एखाद्या पेशंटला तपासल्यानंतर सहेतुने तो असाध्य रोगाने पिडीत असून लवकरच त्याचा मृत्यू होणार आहे असे सांगितल्याने धक्का बसून अशा व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाल्यास डॉक्टरवर मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल गुन्हा.

क) ठार वेड्या व्यक्तीने वेदाच्या भरात एखाद्या व्यक्तीला जीवे मारल्यास.

पर्याय उत्तरे

A) वरील सर्व गुन्हे आहेत.
B) वरीलपैकी एकही गुन्हा सदरात येत नाही
C) केवळ ‘ब’ व ‘क’ गुन्हे आहेत.
D) ‘अ’ व ‘क’गुन्हे आहेत, ‘ब’ नाही.


प्र. ३) जर सहा पुरुष हल्ला करण्यास गेले आणि त्यातील तीन पुरुषांनी मारले परंतु तीन ने नाही मारले. कुठला पर्याय योग्य आहे. ( PSI मुख्य २०१३ )

A) सगळे सहा पुरुष हल्ल्यासाठी जबाबदार नाहीत.
B) फक्त तीन पुरुष ज्यांनी मारले ते जबाबदार आहेत.
C) ज्या तिघांनी मारले नाही ते निष्पाप आहेत.
D) सगळे सहा पुरुष हल्ल्यासाठी जबाबदार आहेत आणि प्रत्येक जण अशाप्रकारे जबाबदार असेल की टायने स्वत: संपूर्ण इजा केली आहे.


प्र. ४) भारतीय दंड संहिता, १८६० प्रमाणे ” वर्षाच्या मुलाने कोणतेही कृत्य केले तरी तो गुन्हा नसतो.
( PSI मुख्य २०१३ )

A) ५

B) ६

C) ७

D) ८


प्र. ५) भारतीय दंड संहिता, १८६० कोणत्या क्षेत्रात लागू आहे ? ( PSI मुख्य २०१३ )

अ) संपूर्ण भारतात
ब) जम्मू व काश्मीर राज्याव्यतिरिक्त संपूर्ण भारतात
क) जम्मू व काश्मीर राज्याला स्वतंत्र दंड संहिता आहे.
ड) भारतीय दंड संहिता सर्व राज्यांसाठी समान आहे.

पर्याय उत्तरे
A) अ फक्त

B) ब आणि क फक्त

C) क फक्त

D) अ आणि ड फक्त


प्र. ६) गुन्हा करण्याची तयारी करणे हा खालीलपैकी कोण-कोणत्या गुन्ह्यांमध्ये दंडनीय अपराध आहे ?
( PSI मुख्य २०१४ )

अ) बनावट नाणी बाळगणे
ब) भारत सरकार विरुध्द युद्ध करण्यासाठी हत्यारांची जमवाजमव करणे.
क) दरोडा घालण्यासाठी तयारी करणे.
ड) दंगल करण्यासाठी तयारी करणे.
पर्यायी उत्तरे :
A) अ आणि ड फक्त
B) अ आणि ब फक्त
C) अ, ब आणि क फक्त
D) ब आणि ड फक्त


प्र. ७) जर एखाद्या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याने त्रास देण्याकरिता किंवा अनावश्यकरीत्या अडविले, तपासले किंवा अटक केले, तर गुन्हा सिद्ध झाल्यास त्या पोलीस अधिकाऱ्याला जास्तीत-जास्त किती काळासाठी कारावास होऊ शकतो ?( PSI मुख्य २०१४ )

A) ३ महिने

B) ६ महिने

C) ९ महिने

D) १ वर्ष


प्र. ८) खालीलपैकी कोण सार्वजनिक सेवक आहे परंतु सरकारी सेवक नाही ? ( PSI मुख्य २०१४ )

A) नगरपालिका आयुक्त

B) न्याय व्यक्ती

C) कर निर्धारक

D) वरील सर्व


प्र. ९) जोड्या लावा : ( PSI मुख्य २०१४ )

अ) अपकृति १) दखलपात्र, बिनजामिनी,आपसात न मिटण्याजोगा
ब) फसवणूक आणि
संपत्ती बेईमानपणे
२) अदखलपात्र, जामीन देण्याजोगे,
तडजोड करण्याजोगे देण्यास भाग पाडणे
क) अनैसर्गिक गुन्हा ३) दखलपात्र, बिनजामिनी आणि
तडजोड करण्याजोगे
ड) दंडनीय विश्वासघात ४) अदखलपात्र, जामीन देण्याजोगे आणि
आपसात न मिटण्याजोगा

योग्य पर्याय निवडा :
अ ब क ड
A) ४ ३ २ १
B) १ २ ३ ४
C) २ ३ १ ४
D) ३ २ ४ १


प्र. १०) ‘Z’ ला गैर – हानि व्हावी या हेतूने ‘A’ ने ‘Z’ ची अंगठी नदीत फेकली. ‘A’ ने कोणता गुन्हा केला आहे ?( PSI मुख्य २०१४ )

A) फसवणूक

B) गैर – हानी

C) विश्वासघात

D) अपकृती


प्र. ११) व्यभिचाराचा / जारकर्माचा गुन्हा कोणाविरुद्ध असतो ? ( PSI मुख्य २०१४ )

A) पत्नी

B) पती

C) A किंवा B

D) दोन्ही A व B


प्र. १२) भारतीय दंड संहिता १८६०, च्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये अपराधासंदर्भात तरतूद केली आहे ?( PSI मुख्य २०१४ )

A) भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३७५
B) भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३७६
C) भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३७७
D) भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३७८


प्र. १३) भारतीय दंड संहिता मधील Chapter २१ अंतर्गत बेअब्रूचा गुन्ह्याची दाखल द्वारा घेतली जाते.
( PSI मुख्य २०१४ )

A) पोलीस रिपोर्ट
B) व्यथित व्यक्तीने केलेल्या तक्रारी
C) स्वप्रेरणेने
D) वरील सर्व

प्र. १४) भारतीय दंड संहितेतील कलम २९८ अन्वये एखाद्या व्यक्तीला त्याच्या धार्मिक भावना दुखविण्याकरिता काही अपशब्द वापरणे अगर काही वस्तू दाखविणे किंवा हावभाव काणे हा व्यक्तिगत गुन्हा असून त्याकरिता पर्यंत कैद अगर दंड अगर दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ( PSI मुख्य २०१६ )

A) सहा महिने

B) दोन वर्षे

C) एक वर्षे

D) तीन महिने


प्र. १५) ‘ब’ ने जो गुन्हा केले आहे असे ‘अ’ म्हणतो त्याबद्दल ‘ब’ ला शिक्षा करणेत येत आहे अशा न्यायनिर्णय दिला जावा असे ‘अ’ न्यायालयास आवाहन करतो. ‘ब’ ने गुन्हा केलेला आहे असे खालीलपैकी कोणी शाबित केले पाहिजे.( PSI मुख्य २०१६ )

A) ‘अ’ आणि ‘ब’ दोघांनी

B) ‘अ’

C) पोलीस यंत्रणा

D) ‘अ’ चे नातेवाईक


प्र. १६) जिचा मृत्यू घडून आला ती व्यक्ती वयावरील असून तिने स्वत:च्या संमतीने मृत्यू पत्कारला असेल किंवा मृत्यूचा धोका पत्कारला असेल तर, सदोष मनुष्यवध हा खून होत नाही. ( PSI मुख्य २०१६ )

A) सात वर्षे

B) बारा वर्षे

C) सोळा वर्षे

D) अठरा वर्षे


प्र. १७) भारतीय दंड संहिता १८६० कलम ४९८ अ नुसार विवाहित स्त्रीचा पती अगर त्याचे नातेवाईक यांनी जर त्या विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक दिली तर _ पावेतो शिक्षा व दंड सांगितला आहे. ( PSI मुख्य २०१७ )

A)२ वर्षे

B) ५ वर्षे

C) ३ वर्षे

D) ७ वर्षे


प्र. १८) भारतीय दंड संहिता, १८६० कलम २३१ नुसार जो कोणी कोणतेही नकली नाणे तयार करील, किंवा जाणीवपूर्वक त्याच्या नकलीकरणाच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पडील, त्याला पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका प्रकारची कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल. ( PSI मुख्य २०१७ )

A) ७ वर्षे

B) ५ वर्षे

C) ३ वर्षे

D) २ वर्षे


प्र. १९) भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम २४ नुसार जो कोणी एखाद्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा किंवा एखाद्या व्यक्तीची गैरहानी व्हावी या उद्देशाने कोणतीही गोष्ट करतो, तेव्हा ती गोष्ट करतो असे म्हटले जाते.( PSI मुख्य २०१७ )

A) नकलीकारण

B) कपटीपणाने

C) अप्रमाणिकपणे

D) गैरलाभाने, गैरहानीने


प्र. २०)भारतीय दंड संहितेमधील कलम १२१ नुसार भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे-प्रयत्न करणे किंवा करण्यास चिथावणी देण्याच्या अपराधाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. ( PSI मुख्य २०१७ )

A) मृत्युदंडाची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा होते.
B) उच्च न्यायालयासमोर खटला चालविला जातो.
C) अजामिनपात्र गुन्हा आहे.
D) आपसात न मिटविता येणारा गुन्हा आहे.


प्र.२१) भारतीय दंड संहितेच्या कलम २९९ व ३०० नुसार उत्तर द्या.
‘ब’ हा चाबकाने ‘अ’ ला मारण्याचा प्रयत्न करतो पण ‘अ’ हा पिस्तूल काढतो तरीदेखील ‘ब’ आपला प्रयत्न चालवितो, त्यामुळे चाबकाचा मार चुकविण्याचा दुसरा मार्ग राहिला नाही असे प्रामाणिकपणे समजून ‘अ’ हा ‘ब’ वर गोळी झाडतो त्यात ‘ब’ चा मृत्यू होतो त्यामुळे ( PSI मुख्य २०१७ )

A) ‘अ’ ने ‘ब’ चा खून केला आहे.
B) ‘अ’ ने ‘ब’ चा सदोष मनुष्यवध मात्र केला आहे.
C) ‘अ’ ने स्वत:च्या बचावाचा प्रयत्न केल्यामुळे कोणताही गुन्हा केला नाही.
D) वरीलपैकी कोणतेही नाही


प्र. २२) ‘ए’ या पोलीस अधिकाऱ्यास ‘वाय’ ला अटक करण्याकरिता न्यायालयाने आदेश दिलेले आहे आणि चौकशी अंती गैरसमजुतीने ‘झेड’ ला ‘वाय’ समजून ‘झेड’ ला अटक केली आहे. ‘ए’ याने भारतीय दंड संहिता खाली गुन्हा केलेला नाही. ( PSI मुख्य २०१८ )

A) कलम ७६

B) कलम ७८

C) कलम ७७

D) कलम ७९


प्र. २३) भारतीय दंड संहिता १८६० कलम २२ प्रमाणे कुठली मालमत्ता ‘चल’ संपत्ती नाही ? ( PSI मुख्य २०१८ )

अ) वीजप्रवाह
ब) जमिनीतून काढलेले दगड व खनिज
क) पैसे आणि दागदागिने
ड) शेत जमीन
पर्यायी उत्तरे :
A) अ आणि ड

B) अ, ब आणि ड

C) अ आणि ब

D) ड फक्त


प्र. २४) भारतीय दंड संहितेतील कोणत्या कलमान्वये गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाची व्याख्या दिलेली आहे ?( PSI मुख्य २०१८ )

A) कलम १२०-B

B) कलम १२०-A

C) कलम १२०

D) कलम -११९


प्र. २५) भारतीय दंड संहिता १८६० मधील तरतुदी प्रमाणे वयाखालील मुलाने कोणत्याही परिस्थितीत कोणतेही केलेले कृत्य गुन्हा होत नाही ? ( PSI मुख्य २०१८ )

A) पाच वर्षे

B) सात वर्षे

C) सोळा वर्षे

D) बारा वर्षे


प्र. २६) भारतीय दंड संहितेतील कलम अन्वये प्राणघातक शस्त्रनिशी सज्ज होऊन ‘दंगा’ करणे या गुन्ह्यची व्याख्या दिली आहे. ( PSI मुख्य २०१८ )
A) १४५

B) १४९

C) १४८

D) १४६


प्र. २७) “अनैसर्गिक अपराध” याचा उल्लेख भारतीय दंड संहिता १८६० च्या या कलमाखाली आहे.
( PSI मुख्य २०१८ )

A) ३७६ – अ

B) ४९७

C) ३७७

D) वरीलपैकी नाही


प्र. २८) भारतीय दंड संहितेतील खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे ‘व्यक्ती’ या शब्दाची व्याख्या सांगितली आहे ?( PSI मुख्य २०१८ )
A) १०

B) ८

C) ११

D) १२


प्र. २९) भारतीय दंड संहितेतील कोणती कलमे मालमत्तेच्या विरुद्ध अपराधाविषयी आहेत ? ( PSI मुख्य २०१८ )
A) ३७८ ते ४६२

B) ४६३ ते ४८९ (E)

C) ४९९ ते ५१०

D) ३३० ते ३७७


प्र. ३०) भारतीय दंड संहिता १८६० कलम १४१ प्रमाणे ‘बेकायदेशीर जमाव’ संबोधण्याकरिता जमावा मध्ये किती व्यक्ती असल्या पाहिजेत ? ( PSI मुख्य २०१८ )
A) दोन

B) सात किंवा जास्त

C) पाच किंवा जास्त

D) वरीलपैकी नाही


प्र. ३१) भारतीय दंड संहिता १८६० नुसार खालीलपैकी कोणते दंगलीचे घटक आहेत ? ( PSI मुख्य २०१८ )
अ) मारामारी
ब) दोन किंवा अधिक व्यक्तींची मारामारी
क) सार्वजनिक ठिकाणी मारामारी
ड) मारामारीमुळे सार्वजनिक शांततेचा भंग
पर्यायी उत्तरे :
A) ब फक्त

B) ब आणि क

C) ब आणि ड

D) वरील सर्व


प्र. ३२) भारतीय दंड संहिता १८६० मधील सर्वसाधारण अपवादांच्या अनुषंगाने जोड्या जुळवा : ( PSI मुख्य २०१९ )

कलम तरतूद
अ) ८० = १) कायदेशीर कृती करतांना अपघात
ब) ८४ =२) मनोविकल व्यक्तीची कृती
क) ९५ = ३) अल्पसा अपाय करणारी कृती
ड) ९७ =४) शरीराचा व मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
A) ३ १ २ ४
B) २ ३ १ ४
C) १ २ ३ ४
D) ४ ३ १ २

प्र. ३३) भारतीय दंड संहिता १८६० नुसार खालीलपैकी कोणते विधान / विधाने चूक आहे / आहेत ? ( PSI मुख्य २०१९ )
अ) ‘कपटीपणा’ हा स्वतंत्र गुन्हा आहे.
ब) कपटीपणाने संपत्ती लपवणे गुन्हा आहे.
क) कपटीपणाने लग्न करून घेणे गुन्हा आहे.
पर्यायी उत्तरे :
A) अ

B) क

C) फक्त ब

D) ब आणि क


प्र. ३४) योग्य जोड्या जुळवा : ( PSI मुख्य २०१९ )

शिक्षेचे सिद्धांत दृष्टीकोन

अ)सुडवादी सिद्धांत १) हिंदूचे न्यायशास्त्र
ब)प्रायश्चितात्मक सिद्धांत २) दंडात्मक दृष्टीकोन
क) प्रतीवारक सिद्धांत ३) चिकित्सात्मक दृष्टीकोन
ड) सुधारणावादी सिद्धांत ४) उपयोगीतावादी दृष्टीकोन

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड
A) १ ३ ४ २
B) २ ३ १ ४
C) ४ २ १ ३
D) ४ १ २ ३

प्र. ३५) भारतीय दंड संहिता १८६० नुसार ‘दस्तऐवज’ च्या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे / आहेत ? ( PSI मुख्य २०१९ )

अ) कोणत्याही घटकावर कोणताही मजकूर वर्णिला असेल की, जो पुराव्यादाखल स्वीकारता येईल तर त्याला दस्तऐवज म्हणतात.

ब) धनकोवर काढलेल्या धनादेशाला दस्तऐवज म्हणता येत नाही.

क) एखादा नकाशा व आराखडा पुराव्यादाखल स्वीकारता येत असेल तर त्याला दस्तऐवज म्हणतात.
पर्यायी उत्तरे :
A) फक्त अ

B) फक्त क

C) फक्त अ आणि क

D) सर्व अ, ब, क

प्र. ३६) योग्य जोड्या जुळवा : ( PSI मुख्य २०१९ )

खटला निर्णय

अ) मध्य प्रदेश सरकार वि. बाबुनाथ १) सर्वसाधारण अपवाद सिद्ध
करण्याची जबाबदारी आरोपीची असते.
ब) बच्चनसिंग व पंजाब सरकार २) जन्मठेपेचा कालावधी २० वर्षे
इतका गणला जावा.
क) जी.एन. गोडसे वि. महाराष्ट्र सरकार ३) शिक्षेच्या धोरणाबाबत मार्गदर्शन
ड) एस.एन. भादोलकर वि.महाराष्ट्र सरकार ४) दुर्मिळातील दुर्मिळ
गुन्ह्य साठीच मृत्युदंडाची शिक्षा दिली जावी.

पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
A) १ ३ ४ २
B) ३ ४ २ १
C) १ ३ २ ४
D) ३ ४ १ २


प्र. ३७) भारतीय दंड संहिता १८६० मधील प्रकरण मध्ये निवडणूक संबंधित अपराधाची तरतूद दिलेली आहे.( PSI मुख्य २०१९ )
A) IX

B) X

C) XI A

D) XI A


प्र. ३८) भारतीय दंड संहिता १८६० मधील _ मध्ये जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याच्या संभव असलेली घातकी कृतीच्या अपराधाची तरतूद दिलेली आहे. ( PSI मुख्य ०१९)

A) कलम २६८

B) कलम २७०

C) कलम२७९

D) कलम २९४ अ

प्र. ३९) भारतीय दंड संहिता १८६० नुसार खालीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने बरोबर नाही / त ? ( PSI मुख्य २०१९ )

अ) कोणत्याही न्यायालयासमोर बालगुन्हेगारीत्वाचा बचाव दाखल करता येतो.

ब) फौजदारी खटला पूर्ण संपल्यानंतर बालगुन्हेगारीत्वाचा बचाव दाखल करता येत नाही.

क) मॅकनॉटचा नियम मनोविकलतेच्या बचावाशी संबंधित आहे.

पर्यायी उत्तरे :

A) ब

B) क

C) ब आणि क

D) अ

प्र. ४०) भारतीय दंड संहिता १८६० नुसार खालीलपैकी कोणती बाब ही ‘अपप्रेरणा’ या गुन्ह्याचा घटक नाही ? ( PSI मुख्य २०१९ )

अ) गुन्हा करण्यात चिथावणी देणे

ब) फौजदारीपात्र कटात सहभागी होणे.

क) गुन्ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे.

पर्यायी उत्तरे :

A) अ आणि ब

B) ब

C) क

D) अ

प्र. ४१) भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम ———– मध्ये लोक सेवकाला शक्ती पोचण्याचा धाकासाबंधीची अपराधाची तरतूद दिलेले आहे ?

A) १७२

B)१७७

C)१८०

D)१८९


भारतीय दंड संहिता उत्तरे

१)D २)B ३)D ४)C ५)B ६)C ७)B ८)D ९)C १०)D
११)2 १२)C १३)B १३)B १४)C १५)B 16)D १७)C १८)A १९)C
20)B 21)B २२)A २३)A २४)B २५)B २६)C २७)C २८)C २९)A
30)C ३१)D ३२)C ३३)A 34)D ३५)C ३६)B ३७)B ३८)B ३९)#
40)C ४१)D                
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch