नागरी हक्क संरक्षण MCQ-Protection Civil Rights

नागरी हक्क संरक्षण MCQ या मध्ये आयोगाने विचारलेले पेपरचे प्रश्न विश्लेषण केले आहे. 

मित्रानो या घटकवर आयोगाने विचारलेले प्रश्न १३ पेक्षा अधिक विचारलेले आहे.जाणून घ्या कसे असतात प्रश परीक्षेत 

शेवटी : उत्तर दिले आहे.

प्र. १) नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ नुसार गुन्ह्यात सहाय्य करणाऱ्या व्यक्तीस पुढील शिक्षा होते. ( PSI मुख्य २०१३ )

A) गुन्ह्यास असलेली शिक्षा

B) दुप्पट शिक्षा

C) अर्धी शिक्षा

D) वरीलपैकी एकही नाही


प्र. २) जर एखाद्या व्यक्तीला अस्पृश्य म्हणून, नवीन खोदलेल्या हापशी चे पाणी घेण्यास मनाई केली तर खालीलपैकी कोणता अधिनियम योग्यरीत्या वापरता येईल ? ( PSI मुख्य २०१३ )

A) भारतीय दंड संहिता, १८६०
B) आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक
C) नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५
D) वरील सगळे


प्र. ३) नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ हा कायदा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाच्या आधारावर अधिनियमित करण्यात आलेला आहे ? ( PSI मुख्य २०१४ )

A) अनुच्छेद १६

B) अनुच्छेद १७

C) अनुच्छेद १८

D) अनुच्छेद १९

प्र. ४) अस्पृश्यता (गुन्हे) अधिनियम १९५५ मध्ये दुरुस्ती व त्याचे नागरी हक्क संरक्षण अधिनियम हे नवे नाव कोणत्या वर्षी करण्यात आले ? ( PSI मुख्य २०१४ )

A) १९५६

B) १९७५

C) १९७६

D) १९७८

प्र. ५) नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ मधील कलम २ (अ) नुसार ‘नागरी हक्क’ याचा अर्थसंविधान ———-द्वारे अस्पृश्यता नष्ट केल्याकारणाने एखाद्या व्यक्तीला उपार्जित होणारा कोणताही हक्क असा ( PSI मुख्य २०१६ )

A) अनुच्छेद २४

B) अनुच्छेद १७

C) अनुच्छेद २२

D) अनुच्छेद २

प्र. ६) नागरी हक संरक्षण अधिनियम, १९५५ मध्ये ———- या करिताशिक्षेची तरतूदआहे. ( PSI मुख्य२०१६ )

A) व्यक्तीला इस्पितळात दाखल करून घेण्यास नाकारणे.
B) वस्तूंची विक्री करण्यास किंवा सेवा पुरविण्यास नाकारणे.
C) अस्पृश्यतेवरून उत्पन्न होणारे इतर अपराध.
D) वरीलपैकी सर्व


प्र. ७) नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ मधील कलम ६ अन्वये, सामान्य व्यवहाराक्रमानुसार अन्य व्यक्तींना ज्या वेळी व ज्या ठिकाणी आणि ज्या अटींवर व शर्तीवर माल विकला जातो किंवा सेवा उपलब्ध करून दिल्या जातात त्यावेळी व त्याचे ठिकाणी आणि त्याच अटींवर व शर्तींवर एखाद्या व्यक्तीला ‘अस्पृश्यते’ च्या कारणावरून असा माल विकण्याचे किंवा अशी सेवा उपलब्ध करून देण्याचे जो कोणी नाकारील तो, कमीत कमी व जास्तीत जास्त इतक्या मुदतीच्या कारावासास व कमीत कमी व जास्तीत जास्त अशा द्रव्यदंडासही पात्र होईल.( PSI मुख्य २०१६ )

A) तीन महिने, सहा महिने, पन्नास रुपये, शंभर रुपये
B) एक महिना, सहा महिने, शंभर रुपये, पाचशे रुपये
C) पंधरा दिवस, दोन महिने, शंभर रुपये, पाचशे रुपये
D) एक महिना, तीन महिने, शंभर रुपये, तीनशे रुपये

प्र. ८) “नागरी हक्क संरक्षण” अधिनियमांच्या १९५५ तरतुदींनुसार खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा. ( PSI मुख्य २०१६ )

अ) या कायद्या १९५५ अंतर्गत असलेली समुद्रायिक दंडाची तरतुदी आता रद्द करण्यात आली आहे.

ब) वरील कायदा काही वेगळ्याच नावाने संमत करण्यात आला होता.
पर्यायी उत्तरे :
A) अ विधान असत्य असून ब सत्य आहे.
B) अ विधान सत्य असून ब असत्य आहे.
C) अ आणि ब दोन्ही विधाने सत्य आहेत.
D) अ आणि ब दोन्ही विधाने असत्य आहेत.


प्र. ९) नागरी हक्क संरक्षण अधिनियमात गुन्ह्यास साथ देण्यास पुढील शिक्षा आहे : ( PSI मुख्य २०१७ )

A) गुन्ह्यास दिलेली शिक्षेएवढी
B) गुन्ह्याचा अर्धी शिक्षेएवढी
C) अधिनियमात दिलेले नाही
D) वरीलपैकी नाही

प्र. १०) नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ कलम २ (क) अन्वये, “नागरी हक्क” याचा अर्थ, संविधानाच्या द्वारे अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तीला उपार्जित होणारा कोणताही हक्क असा आहे. ( PSI मुख्य २०१७ )

A) अनुच्छेद १४

B) अनुच्छेद २४

C) अनुच्छेद १७

D) अनुच्छेद ३६६

प्र. ११) नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ मधील कलम _ नुसार माल विकण्याचे किंवासेवा उपलब्ध करून देण्याचे नाकारल्याबद्दल शिक्षा लागू होते. ( PSI मुख्य २०१८ )

A) ४

B) ५

C) ६

D) ६

प्र. १२) नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १६-A अन्वये ज्या व्यक्तीला या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला एखादा अपराध केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले असेल अशा वरील वयाच्या कोणत्याही व्यक्तीला “अपराधी परिविक्षा अधिनियम” १९५८ (१९५८ चा २०) याच्या तरतुदी लागू होणार नाहीत. ( PSI मुख्य २०१८ )

A) १२ वर्षा

B) १४ वर्षा

C) १६ वर्षा

D) १० वर्षा


प्र. १३) नागरी हक्क संरक्षण कायदा, १९५५ च्या कलम नुसार ‘अस्पृश्यता” निवारणातून उदयास आलेले अधिकार संबंधित व्यक्तीला उपयोगी पडतील याची हमी देण्याचे राज्य सरकारचे कर्तव्य आहे ? (PSI मुख्य २०१९ )
A) १६

B) १६-अ

C) १५

D) १५-अ

उत्तरे

१)A २)C ३)B ४)C ५)B ६)D ७)B ८)A ९)A १०)C
११)C १२)B १३)D              

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch