भारतातील बेरोजगारीचे प्रकार-Unemployment in Marathi

बेरोजगारी ही आपल्या देशातील एक  मोठी आणि गंभीर समस्या हे आहे. चला तर  बेरोजगारीचे प्रकार व्याख्या ,वर्गीकरण ,बेरोजगार प्रमाण ,बेरोजगारचे प्रकार ,रोजगार व बेरोजगारीचे मोजमाप,UPSS पद्धत,NSSO फेऱ्या हे जणू घेऊया 

रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता बेरोजगारी ही आपल्या देशातील एक  मोठी आणि गंभीर समस्या हे आहे. कारण बेरोजगारीच्या ह्या अवस्थेतुन आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी जावेच लागत असते.कारण ही एक देशव्यापक समस्या आहे. 

खुली बेरोजगारी

काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात
उदा. ग्रामीण भागातील स्वतःच्या मालकीची शेत जमीन नसलेले अकुशल व अर्धकुशल कामगार रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरी भागात आलेले बेरोजगार होय .

हंगामी बेरोजगारी

विशिष्ट कालावधीक काम मिळणे पण ते वेळ संपल्यानंतर काम न मिळणे
उदा : शेतीचा नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी हे हंगामी बेरोजगारीचे तसेच पर्यटन क्षेत्र ,वूलन कापडाचे कारखाने ,आईसक्रिमचे कारखाने इत्यादी 

प्रच्छन्न बेरोजगारी

अदृश्य यास  प्रच्छन्न बेरोजगारी देखील म्हणतात  समजा एक काम करण्यासाठी २ माणसाची गरज असणे पण तेथे २ पेक्षा जास्त असणे अदृश्यपणे/प्रच्छन्न बेरोजगारम्हणतात उदा. शेतीचे एक क्षेत्र जर २ व्यक्ती आपल्या क्षमतेचा वापर करून पिकवू शकतो पण तेथे ४-५ लोक तेथे काम करीत असल्यास ते प्रच्छन्नपणे बेरोजगार असतात. यास सीमान्त उत्पादकता शून्य किंवा नाममात्र असते. कारण अशा व्यक्तींना व्यवसायातून बाजूला सारले तरी त्यामुळे उत्पादनाच्या पातळीवर मुळीच विपरीत परिणाम होत नाही.

कमी प्रतीची बेरोजगारी

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा किवा शिक्षणाच्या दर्जापेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते यास कमी प्रतीची बेरोजगारी म्हणतात उदा. एखाद्या इंजिनिअरला क्लार्कची नोकरी करावी लागते

सुशिक्षित बेरोजगारी

जेव्हा सुशिक्षित लोक कमी प्रतीच्या किवा  खुल्या बेरोजगारीला बळी पडतात तेव्हा त्याला सुशिक्षित बेरोजगारी असे म्हणतात.

चक्रीय बेरोजगारी

विकसित भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत जी बेरोजगारी दिसून येते तिला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात.

घर्षणात्मक बेरोजगारी

जेव्हा कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतिक्षेत ऐच्छिकरीत्या बेरोजगार असतो तेव्हा त्यास घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात.
विशेषत विकसित देशांत जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना त्यांच्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पडतात व कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतिक्षेत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते.

संरचनात्मक बेरोजगारी

अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदल झाल्यामुळे कामगारांची कौशल्ये आणि कामासाठी आवश्यक कौशल्ये यांमध्ये असंतुलन निर्माण झाल्याने निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला संरचनात्मक बेरोजगारी असे म्हणतात.

यांच्यात फरक तंत्रज्ञानाचा दर्जा सुधारल्यामुळे दीर्घ मंदीच्या कालावधीमुळे इत्यादी कारणांमुळे निर्माण होऊ शकते. घर्षणात्मक बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी या दोन प्रकारांना मिळून ‘नैसर्गिक बेरोजगारी’ असे म्हटले जाते.

तांत्रिक बेरोजगारी

हे संरचनात्मक बेरोजगारीचे एक स्वरूप आहे. उत्पादन प्रक्रियेत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने जुनी तांत्रिक कौशल्ये असलेल्या कामगारांना काम मिळत नाही किंवा त्यांना काढून टाकले जाते.

 जुनाट बेरोजगारी

दीर्घकालिक यास जुनाट बेरोजगारी म्हणतात  ज्यावेळी बेरोजगारी हे देशाचे दीर्घकाळासाठीचे वैशिष्ट्य बनते त्यावेळी त्या स्थितीला दीर्घकालिक बेरोज़गारी असे म्हणतात. काही देशांमध्ये विशेषतः विकसितदेशात एक वर्षापेक्षा अधिक ‘कालावधीसाठी बेरोजगार राहिलेल्या व्यक्तीस दीर्घकालिक बेरोजगार असे म्हणतात.

या मागचे काय कारण दारिद्र्याचे दृष्टचक्र, संसाधनांचा अल्प विकास व वापर, उच्च लोकसंख्या वाढीचा दर, कालबाह्य तंत्रज्ञानाचा वापर, भांडवल निर्मितीचा दर कती

प्रासंगिक बेरोजगारी

बऱ्याच क्षेत्रांमध्ये कामगारांना करारावर घेतले जाते. करार संपल्यानंतर पुढील काम मिळेपर्यंत अशा कामगारांना प्रासंगिक बेरोजगार असे संबोधले जाते. अशा व्यक्तींना कामाची कोणतीही शाश्वती नसते.

बेरोजगारीचे मोजमाप

भारतात बेरोजगारीविषयक आकड्यांचे तीन प्रमुख स्त्रोत आहेत

  • दशवार्षिक जनगणनेचे अहवाल,
  • राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेचे (NSSO) अहवाल( यांचे अहवाल सर्वात महत्वाचे मानतात )
  • रोजगार व प्रशिक्षण सरसंचलनालय (DGET) यांकडील एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडे झालेल्या नोंदणीची आकडेवारी.

राष्ट्रस्तरीय आकडेवारी जमा करण्यासाठी साधारणत पंचवार्षिक सर्वेक्षणे केली जातात. NSSO पहिले सर्वक्षण आपल्या २७ व्या सर्वेक्षण फेरीमध्ये ऑक्टोबर १९७२ सप्टेंबर १९७३ या कालावधीसाठी केले होते. आतापर्यंत ९ सर्वक्षणे पूर्ण केली असून ९ सर्वक्षण फेरी ६८ व्या जुलै २०११ केली
NSSO सध्या रोजगार व बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी तीन प्रमुख पद्धतींचा वापर करते

  • नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा (UPSS)
  • चालू साप्ताहिक दर्जा (CWS)
  • चालू दैनिक दर्जा (CDS)

UPSS पद्धत

i) नित्य प्रमुख दर्जा (UPS) हा व्यक्तीने सर्वेक्षणपूर्व ३६५ दिवसांमध्ये तुलनेने अधिक काळासाठी केलेल्या आर्थिक कृतीशी संबंधित असतो. (समजा जे व्यक्ती ३६५ दिवसांमध्ये मोठ्या कालावधीसाठी (१८३ दिवस किंवा अधिक) एखाद्या आर्थिक कामात गुंतलेले असतात ते नित्य प्रमुख दर्जावर रोजगारात असल्याचे मानले जाते.)

ii)नित्य प्रमुख दर्जावर (SS) ३६५ दिवसांमध्ये एखादी दुय्यम आर्थिक कृती केलेली असल्याचे शक्य आहे. जर ३० दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी एखादी दुय्यम आर्थिक कृती केलेली असेल तर तो दुय्यम दर्जावरही रोजगारात असल्याचे समजतात
दोन्ही दर्जांचे एकत्रीकरण करून व्यक्तीचा ‘नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा’ निश्चित केला जातो.

CWS पद्धत

यात व्यक्तीच्या सर्वेक्षणपूर्व ७ दिवसांतील आर्थिक कृतींचा समावेश होतो. या आधारावर सर्वेक्षणपूर्व ७ दिवसांत कोणत्याही एका दिवसात किमान एक तास काम करणाऱ्याला व्यक्तीस रोजगारी समजले जाते.

CDS पद्धत

यात व्यक्तीच्या सर्वेक्षणपूर्व ७ दिवसांतील दररोजच्या आर्थिक कृतींचा समावेश होतो. आठवड्यात दररोज किमान ४ तास काम करणे आवश्यक असते.

NSSO फेरी 

NSSO ची ६६ व ६८ वी फेरीनुसार बेरोजगारीचे दर

६६ वी २००९ -१० मध्ये

  • UPSS =२%
  • CWS =३.६%
  • CDS =६.६%

६८ वी फेरी २०११-१२

  • UPSS =२.२ %
  • CWS =३.७ %
  • CDS =५.६%

रोजगार व बेरोजगार सामन्य

कामगार म्हणजे काय  उच्च  किवा कमी धर्जाचे अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रीयामध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्र्य उत्पनात भर घालणारे सर्व व्यक्तींना कामगार म्हणतात

कामगारचे वर्गीकरण 
१) नियमित पगारदार
२) किरकोळ मजुरी कामगार
३) स्वयं –रोजगार

रोजगार व बेरोजगार व्याख्या

भारतात रोजगार व बेरोजगारीशी संबंधित आकडेवारी तयार करतांना केवळ १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येचाच विचार केला जातो.

श्रम शक्ती

श्रम शक्ती मध्ये काम करणाऱ्या किवा  काम शोधत असलेल्या किवा  कामासाठी उपलब्ध आलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश होतो त्यामध्ये रोजगारी तसेच बेरोजगारी व्यक्तींचा समावेश होतो.
सूत्र श्रम शक्ती= कामगार आणि बेरोजगार

श्रम शक्तीच्या बाहेरील व्यक्ती

१५ पेक्षा अधिक वय असणारे लोकसंख्येतील असे व्यक्ती येतात जे काम करतही नाहीत आणि काम शोधतही नाहीत उदा. त्यांमध्ये विद्यार्थी, गृहिणी, पेन्शनर्स, भिकारी इत्यादींचा समावेश होतो.

श्रम शक्ती सहभाग दर

देशाच्या एकूण लोकसंख्येत (१५+) श्रम शक्तीचे प्रमाण. हे प्रमाण १००० लोकसंख्येमागे मोजले जाते.
सूत्र श्रम शक्ती सहभाग दर = (श्रम शक्ती + एकूण लोकसंख्या) x १०००

बेरोजगारी दर

श्रम शक्तीपैकी कामासाठी उपलब्ध असलेल्या मात्र रोजगार प्राप्त न झालेल्या व्यक्तींचे हजारी प्रमाण.
सूत्र बेरोजगारी दर= (बेराजगार ÷ श्रम शक्ती) x १०००

बेरोजगार प्रमाण

एकूण लोकसंख्येपैकी (१५+) बेरोजगार व्यक्तींचे १००० प्रमाण
सूत्र बेरोजगार प्रमाण= (बेरोजगार ÷एकूण लोकसंख्या) x १०००

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch