सूची MCQ : केंद्र सूची,राज्य सूची,समवर्ती सूची आयोगाने विचारलेले

नमस्ते  सूची MCQ आयोगाने विचारले केंद्र सूची,राज्य सूची,समवर्ती सूची यावरील प्रश्न

मित्रानो सूचीचे विश्लेषण केल्यावर समजले कि combine ला PSI,ASO आणि  STI यावर आयोगाने वारवार प्रश्न विचारलेले पूर आणि मुख्य परीक्षेत विचारलेले आहे . त्यामुळे यावर आयोग कसे प्रश्न विचारलेले आहे 2011 पासून ते आतापर्यंत चा तर बघूया

ASO

प्र.1. ‘सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा’ हा विषय ——-मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.  (ASO मुख्य 2022)

१) समवर्ती सूची      2) शेषाधिकार     3) राज्यसूची     4) संघसूची

 

प्र.2. भारतीय राज्यघटनेतील सातव्या परिशिष्टातील राज्य सूचीमध्ये नमूद केलेल्या/ ले कोणता/ ते विषय राष्ट्रीय राजधानी दिल्ली शासनाच्या कार्यक्षेत्रातुन विशेषत्वाने वगळण्यात आला/ ले? (ASO मुख्य 2017)

अ) सार्वजनिक सुरक्षा      ब) पोलीस          क) जमीन            ड) कर

पर्यायी उत्तर :

1) ब फक्त                          2) अ, ब

3) अ, ब, क                    4) अ, ब, क व ड

 

प्र.3. खालीलपैकी कोणत्या तरतूदी भारतीय राज्यघटनेच्या सत्ताविभाजनासंबंधीच्या केंद्र सूचीचा भाग नाहीत? (ASO मुख्य 2014)

अ) राज्य शासनाने चालवलेली लॉटरी.

ब) बँक व्यवसाय

क) वजन आणि मापे यांची मानके प्रस्थपित करणे.

ड) उच्च न्यायालयाचे अधिकारी

पर्यायी उत्तरे :

1) फक्त ब                          2) क व ड

3) फक्त ड                      4) अ, क व ड

 

 

प्र.4. खालील तरतुदींपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे? (ASO पूर्व 2013)

1) भाषा                                         2) घटक राज्ये

3) राज्यसभेतील जागांची वाटणी   4) केंद्र, राज्य, समवर्ती सुची 

 

प्र.5. भारतीयसंविधानाच्यापरिशिष्ट 6 मध्ये——–याचारघटकराज्य क्षेत्रामधील जनजाती (जमती) क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतूद आहे?

(ASO मुख्य 2013)

1) अरुणाचल प्रदेश, आसाम, मिझोराम आणि मेघालय

2) मणिपूर, नागालँड, मेघालय आणि आसाम

3) आसाम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा

4) आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम

 

प्र.6. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? (ASO पूर्व 2011)

1) 14                   2) 18                   3) 20                   4) 22

 PSI 

प्र.7. सहाव्या अनुसूची संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? (PSI मुख्य 2022)

1) सहाव्या अनुसुचीखालील स्वायत्त जिल्हे हे राज्याच्या कार्यकारी अधिसत्तेच्या बाहेर आहेत.

2) सहाव्या अनुसूचीतील स्वायत्त जिल्ह्यांच्या क्षेत्रामध्ये वाढ करणे अथवा कमी करणे हे फक्त राष्ट्रपतीच करू शकतात.

3) या क्षेत्रातील जिल्हा आणि प्रादेशिक परिषदा यांना जमीन महसुलाचे मुल्यांकन आणि संकलन करण्याचा अधिकार आहे.

4) वरीलपैकी एकही नाही

 

प्र.8. राज्य सूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होते? (PSI मुख्य 2017)

अ) सायबर लॉ   ब) भूमी             क) पोलीस          ड) वन

पर्यायी उत्तरे :

1) फक्त अ, ब, क           2) फक्त ब, क, ड

3) फक्त ब, क            4) वरील सर्व

 

प्र.9. जोडया लावा. (PSI पूर्व 2013)

अ) संघ सूची               1) दीपगृहे

ब) राज्य सूची             2) शिक्षण

क) समवर्ती सूची          3) कारागृहे

पर्यायी उत्तरे :

अ ब क

1) 1 2 3

2) 2 1 3

3) 3 1 2

4) 1 3 2 

 

प्र.10. समवर्ती सूचित खालीलपैकी कोणता विषय नाही? (PSI मुख्य 2013)

अ) फौजदारी कायदा     ब) फौजदारी पद्धती

क) सार्वजिक आरोग्य     ड) विवाह व घटस्फोट

1) फक्त अ आणि ब        2) फक्त क आणि ड

3) फक्त ब आणि ड        4) फक्त क 

 

प्र.11. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत / सूचित समाविष्ट आहे? (PSI पूर्व, 2012)

1) केंदीय           2) राज्य           3) समवर्ती        4) केंद्र व राज्य

 

प्र.12. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भानुसार खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही? (PSI मुख्य 2012)

1) पोलीस-राज्यसूची     2) जंगल-समवर्तीसूची

3) रेल्वे-केंद्र्सूची           4) विवाह व घस्फोट-राज्यसूची

STI 

प्र.13. खालीलपैकी कोणत्या विषयांच्या समावेश हा केंद्र सूचित आहे? (STI मुख्य 2019)

अ) रेल्वे           ब) युध्द व शांतता         क) पोलीस       ड) शेती

पर्यायी उत्तरे :

1) फक्त अ आणि क                  2) फक्त क आणि ड

3) फक्त अ आणि ब               4) फक्त अ, ब आणि क

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch