शांततेचा नोबेल पुरस्कार 2022 संयुक्तपणे दिला

७ ओक्टोबर जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार 2022 यावेळी शांततेचा नोबेल पुरस्कार एका व्यक्ती आणि दोन संस्थांना मिळाला आहे.

७ ओक्टोबर जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार २०२२  यावेळी शांततेचा नोबेल पुरस्कार एका व्यक्ती आणि दोन संस्थांना मिळाला आहे. नोबेल शांतता पुरस्कार संयुक्तपणे एलेस बिल्यात्स्की आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना देण्यात आला आहे.

२०२२ नोबेल शांतता पुरस्कार

नॉर्वे नोबेल समितीचे प्रमुख बेरिट रिज अँडरसन यांनी शुक्रवारी ओस्लो येथे नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला नोबेल शांतता पुरस्कार बेलारशियन मानवाधिकार अधिवक्ता एलेस बिलियात्स्की आणि दोन मानवाधिकार संस्था रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना देण्यात आला आहे.

का ? दिला मानव अधिकारच्या संरक्षणासाठी नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला

कार्य बेलारशियन मानवाधिकार अधिवक्ता एलेस बिल्यात्स्की आणि रशिया आणि युक्रेनमधील मानवाधिकार संघटना यांचे कार्य बेलारशियन मानवाधिकार अधिवक्ता एलेस बिल्यात्स्की आणि रशिया आणि युक्रेनमधील मानवाधिकार संघटनायांनी  त्यांच्या संबंधित देशांतील नागरी समाजाच्या अधिकाराचे प्रतिनिधित्व करत आहेत

त्यांनी अनेक वर्षांपासून प्राधिकरणावर टीका केली आहे आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याच्या अधिकारांना प्रोत्साहन दिले आहे.

युद्धगुन्हेयांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

मानवी हक्कांचे उल्लंघन आणि सत्तेचा गैरवापर यांचे दस्तऐवजीकरण करण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला आहे

शांतता आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरी समाजाचे महत्त्व दाखवून दिले आहे.

२०२२ नोबेल शांतता पुरस्कार

१. बेलारूसचा एलेस बिल्यात्स्कीबद्दल

१९८० च्या दशकाच्या मध्यात बेलारूसमधील लोकशाही चळवळीच्या आरंभकर्त्यांपैकी एलेस बिल्यात्स्की हे एक होते.

१९९६ मध्ये राष्ट्रपती (अलेक्झांडर लुकाशेन्को) यांना हुकूमशाही अधिकार देणार्‍या वादग्रस्त घटनादुरुस्तीला प्रतिसाद म्हणून व्यास (स्प्रिंग) या संस्थेची स्थापना करण्याचे श्रेय बिल्यात्स्की यांना जाते.

कालांतराने Viasana एक “व्यापक-आधारित मानवाधिकार संघटनेत विकसित झाली ज्याने राजकीय कैद्यांवर अधिकार्‍यांकडून छळाचा वापर दस्तऐवजीकरण आणि विरोध केला.

२०२०  मध्ये स्वीडिश राइट लाइव्हलीहुड फाऊंडेशन द्वारे “पर्यायी नोबेल” म्हणून ओळखल्या जाणार्‍या राईट लाइव्हलीहुड पुरस्काराच्या तीन प्राप्तकर्त्यांपैकी ते एक होते.

तुरुंगात असताना नोबेल पारितोषिक मिळवणारे ते चौथे व्यक्ती आहेत.

२. रशियन मानवाधिकार संघटना( स्मारक)

या संस्थेची स्थापना १९८७ ला “माजी सोव्हिएत युनियनमधील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केली होती या मागचा उद्देश होता  की कम्युनिस्ट राजवटीच्या दडपशाहीचा बळी कधीही विसरला जाणार नाही.”

१९५४ ला  नोबेल शांतता पारितोषिक विजेते आंद्रेई सखारोव्ह आणि मानवाधिकार अधिवक्ता स्वेतलाना गानुश्किना या संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होते.

रशियाची सर्वात मोठी मानवाधिकार संस्था म्हणून तिचे वर्णन केले गेले आहे आणि सध्या तिचे कार्य “रशियामधील राजकीय छळ आणि मानवी हक्कांचे उल्लंघन” बद्दल माहिती गोळा करण्यात मदत करते.

३. युक्रेनियन मानवाधिकार संघटना(सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज)

नागरी स्वातंत्र्य केंद्राची स्थापना करण्या मागे उद्देश  “युक्रेनमधील मानवी हक्क आणि लोकशाहीला चालना देण्याच्या उद्देशानेशाने” २००७ ला कीव येथे करण्यात आली.

सध्या केंद्र स्वतःचे वर्णन करते युक्रेनमधील अग्रगण्य एजंटांपैकी एक, जनमत आणि सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीवर प्रभाव पाडणारा, नागरी सक्रियतेच्या विकासास समर्थन देणे आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क आणि एकता यांच्याद्वारे मानवी हक्कांना चालना देण्याचे कार्यांमध्ये सक्रियपणे भाग घेतो”.

फेब्रुवारी २०२२ ला रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर, नागरी स्वातंत्र्य केंद्र युक्रेनियन नागरी लोकसंख्येविरुद्ध रशियन “युद्ध गुन्हेगार” ओळखण्यासाठी आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या प्रयत्नात गुंतले आहे.

नोबेल शांतता पुरस्कार २०२१

२०२१ चा नोबेल शांतता पुरस्कार फिलिपिन्सची पत्रकार मारिया रुसा आणि रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह यांना देण्यात आला

का ? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

नोबेल शांतता पुरस्कारचा इतिहास  

  • नोबेल शांतता पुरस्कार एकूण १४० विजेत्यांना प्रदान करण्यात आला आणि आतापर्यंत त्यापैकी ११० व्यक्ती आणि ३० संस्थांना देण्यात आला आहे( ३० संस्थापैकी इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस याला तीन वेळा देण्यात आला आणि संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्त कार्यालयाला दोनदा सन्मानित करण्यात
  •  ११० व्यक्तीपैकी ३ व्यक्तींना विभागून शांतता पुरस्कार दोन वेळेस सामायिकदिले आहे.१९९४ ला यासर अराफात, शिमोन पेरेस, यित्झाक रबिन यांना आणि २०११ ला एलेन जॉन्सन सरलीफ, लेमाह गबोवी आणि तवाक्कोल करमन यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • सर्वात तरुण नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई या देण्यात आला २०१४ चा शांतता पुरस्कार मिळाला तेव्हा ती १७ वर्षांची होती.
  • सर्वात जुने नोबेल शांतता पारितोषिक विजेते जोसेफ रॉटब्लाट आहेत, ज्यांना १९९५ मध्ये पुरस्कार देण्यात आला तेव्हा ते ८७ वर्षांचे होते.
  • महिला नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या: ११० नोबेल शांतता पारितोषिक विजेत्यांपैकी १८  महिला आहेत. नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या पहिल्या महिला बर्था फॉन सटनर आहेत ज्यांना १९०५  मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता.
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch