वित्तीय बाजाराचे प्रकार कोणते-भारतीय व्यापारी बँक स्वतत्र्यपुर्वी आणि स्वातंत्र्योत्तर

वित्तीय बाजाराचे प्रकार कोणते  ,भारतीय बँक रचना,बँक विशेष ,बँक निर्मिती  स्वतत्र्यपुर्वी आणि स्वातंत्र्योत्तर प्रगती,संयुक्त भांडवली बँकांचे वर्गीकरण इत्यादी

म्हणतात कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो. वित्त म्हणजे कर्जाने दिला-घेतला जाणारा पैसा होय ,वापरण्यात येणाऱ्या वित्ताच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेस ‘वित्तीय व्यवस्था‘ असे म्हणतात.

भारतीय वित्तीय व्यवस्थेचे भाग भारतीय वित्तीय व्यवस्था चार भाग आहे

  1. वित्तीय बाजार
  2. वित्तीय संस्था
  3. वित्तीय सेवा
  4. वित्तीय साधने

वित्तीय बाजार म्हणजे वित्ताच्या देवाणघेवाणीचा बाजार होय. कालावधीनुसार दोन भाग पडतात

१)नाणे बाजार
ज्या भागात अल्पकालीन निधीचा देवाण घेवाण होते त्यास नाणे बाजार म्हणतात
नाणे बाजारात कर्ज व्यवहार १ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी होतात. पण कृषिसाठी हा अल्प कालावधी १५ से १८ महिन्यांपर्यंतचा असतो यात दोन भागाचा समावेश होतो

  1. असंघटीत क्षेत्र =उदा.सावकार ,सराफी पेधीवाले
  2. संघटीत क्षेत्र =उदा.व्यापारी बँक व्यवसाय, सहकारी क्षेत्रातील व परकीय बँकांचा समावेश

) भांडवल बाजार
वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम व दीर्घकालीन निधींची देवाण घेवाण होते त्याला भांडवल बाजार असे म्हणतात.
भांडवल बाजारात १ वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात कमीत कमी ५ वर्ष जास्त २०-२५ वर्षांपर्यंतच्या कालावधीलाअसतो
व्यापारी बँका ,विकास वित्तीय संस्था ,विमा कंपन्या ,मर्चंट बँका ,म्युच्युल फंड्स इत्यादी

फरक नाणे बाजार आणि भांडवल बाजार
नाणे बाजार अल्पकालिन वित्ताची आणि भांडवल बाजारात मध्यम व दीर्घकालिन वित्ताची देवाणघेवाण चालते. या दोन्ही बाजारांचे विभाजन प्राथमिक व द्वितीय बाजार असे केले जाते. प्राथमिक बाजारात प्रथमच निर्माण होणाऱ्या पतसाधनांची आणि द्वितीय बाजारात जुन्या किवा विद्यमान पतसाधनांची देवाणघेवाण चालते.

भारतीय बँक व्यवसायाची रचना

भारतीय बँकव्यवसायाचे वर्गीकरण दोन भागांमध्ये करण्यात येते
१)असंघटित बँक व्यवसाय : यामध्ये सावकार व सराफी पेढीवाले यांचा समावेश होतो. उदा. भारतात पूर्वीपासून कर्ज व्यवहार करणारे महाजन, सेठ, श्रेष्ठ, शेट्टी, चेट्टियार, सराफ इ.

२)संघटित बँक व्यवसाय: संघटित क्षेत्र हे RBI च्या नियंत्रणाखाली असतात यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँक खाजगी क्षेत्रातील बँक , सहकारी क्षेत्रातील बँक , परकीय बँकांचा इत्यादी समावेश होतो.

भारतीय बँकव्यवसायाची निर्मिती

दोन भागात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर

स्वातंत्र्यपूर्व

  1. १७७० अलेक्झांडर अँड कंपनीने कलकत्त्याला ‘बँक ऑफ हिंदुस्तान’ नावाची भारतातील पहिली बँक स्थापन केली.
  2. १९ व्या शतकाच्या सुरवातीला ईस्ट इंडिया कंपनीने तीन प्रेसिडेन्सी बँकांच्या स्थापन केल्या १८०६ पहिल्या बँक स्थापन प्रेसिडेन्सी बँकेची ‘बँक ऑफ कलकत्ता’
    पहिल्या बँक बद्दल थोडक्यात माहिती
    १८०९ मध्ये तिला सनद मिळून तिचे रुपांतर ‘प्रेसिडन्सी बँक ऑफ बंगाल’ मध्येकरण्यात आले.
    विशेष =ही भारतातील मर्यादित जबाबदारीच्या तत्त्वावरील पहिली संयुक्त भांडवली कंपनी व बँक ऑफ बंगालला १८२३ मध्ये नोटा छापण्याचा अधिकार देण्यात आला आणि १८३९ मध्ये शाखा उघडण्याची अनुमती देण्यात आली.
    १८४० दुसरी प्रेसिडन्सी बँक ‘बँक ऑफ बॉम्बे
    १८४३ तिसरी प्रेसिडन्सी बैंक ‘बँक ऑफ मद्रास’
    विशेष =१९२१ मध्ये तिन्ही प्रेसिडेन्सी बँका एकत्र करून इंपिरियल बँकेची स्थापना करण्यात आली. ती एक खाजगी बँक होती, पण ब्रिटिश सरकारसाठी बँक म्हणून कार्य करीत होती.
  3. १८६५= अलाहाबाद बँक, अलायन्स बँक ऑफ सिमला इत्यादी स्थापना.
  4. १८८१= ‘अवध कमर्शिअल बँक’ या भारतीयांनी मर्यादित जबाबदारीच्या तत्त्वावर स्थापन केलेल्या पहिल्या बँकेची स्थापना.
  5. १८९४= लाला हरकिशन यांच्या अथक प्रयत्नांमुळे पंजाब नॅशनल बँके’ ची स्थापना. ती संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक होय.
  6. १९०५ मध्ये सुरु झालेल्या स्वदेशी चळवळीमुळे भारतीय बँकांच्या स्थापनेला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळाले. १९०६ ते १९१३ या कालावधीत एकूण ९८ बँका स्थापन झाल्या. उदा. बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा इत्यादीं. पण गैरव्यवस्थापन मुले बँकिंगची तत्वे योग्य रीतीने न पाळणे १९१३-१७ दरम्यान ८७ बँका बुडाल्या.
  7. १ एप्रिल १९३५ भारताची मध्यवर्ती बँक म्हणून RBI कायदा १९३४’ द्वारे ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ची स्थापना

स्वातंत्र्योत्तर प्रगती

१) १ जानेवारी १९४९ रोजी RBI चे राष्ट्रीयीकरण केले त्यासाठी ‘RBI कायदा, १९४८’ संमत करण्यात आला.

२) बैंकिंग विनियमन कायदा १९४९ (भारतात बँकबुडीचे प्रमाण खूप असल्याने व्यापारी बँकांच्या कार्यपद्धतीवर कायदेशीर नियंत्रण आणण्यासाठी भारतीय संसदेने १७ फेब्रुवारी १९४९ रोजी ‘बैंकिंग विनियमन कायदा १९४९ संमत केला आणि तो १६ मार्च १९४९ पासून कार्यवाहित झाला.)या कायद्यामुले फायदा RBI ला महत्त्वाचे अधिकार प्राप्त झाले RBI ला भारतीय व्यापारी बँकांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आले.

  • बँकेची स्थापना करणे,शाखा काढणे यासाठी RBI ची संमती आवश्यक होती
  • RBI व्यापारी बँकांचे हिशेब तपासू शकते.
  • RBI व्याजदर किती असावा या वर नियंत्रण

१९४९ च्या कायद्यात परिस्थितीनुरूप बदल करण्यात आले.महत्वाचा बद्दल दि बँकिंग कंपनीज् अॅक्ट १९६१ नुसार RBI ला सरकारच्या संमतीने बँकांचे सक्तीने विलीनीकरण करण्याचा हक्क मिळाला.

३)१ जुलै १९५५ SBI कायदा या कायदामुळे सरकारने इंपिरिअल बँकेला ताब्यात घेऊन तिचे रुपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI)करण्यात आले.हे रूपांतर करण्याची शिफारस १९५१ च्या अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीने (अध्यक्षः ए. डी. गोरवाला) आपल्या डिसेंबर १९५४ च्या अहवालात केली होती. समितीने दिलेले कारण कृषी व ग्रामीण विकासासाठी योग्य प्रमाणात वित्तपुरवठा व्हावा यासाठी ग्रामीण भागात बँकिंगच्या सोयीसुविधांचा विस्तार व्हावा

४)१९५९ सरकारने SBI (संलग्न बँका) कायदा पास केला यामुळे ८ संस्थानिकांच्या बँका SBI ने आपल्या ताब्यात घेतल्या. त्यांना SBI च्या सहयोगी बँका म्हणून ओळखण्यात येते.

बँकेची माहिती pdf

सहयोगी बँका यादी

८ सहयोगी बँका यादी

  1. स्टेट बँक ऑफ बिकानेर
  2. स्टेट बँक ऑफ जयपूर
  3. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद
  4. स्टेट बँक ऑफ पटियाला
  5. स्टेट बँक ऑफ त्रावणकार
  6. स्टेट बँक ऑफ म्हैसूर
  7. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र
  8. स्टेट बँक ऑफ इंदोर
सहयोगी बँक विलीकरन
  1. १९६३ मध्ये दोन सहयोगी बँकांचे विलिनीकरण करून एकच स्टेट बँक ऑफ बिकानेर व जयपूर ही बँक निर्माण करण्यात आल्याने सहयोगी बँकांनी संख्या ७ झाली.
  2. ऑगस्ट २००८ मध्ये स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रचे विलीकरन SBI केले एकूण संक्या ६ सयोगी बँक झाल्या
  3. ऑगस्ट २०१० मध्ये स्टेट बँक ऑफ इंदोरचे विलिनीकरण SBI मध्ये करण्यात आल्याने सहयोगी बँकांची संख्या ५ झाली.
  4. १५ ऑगस्ट २०१६ रोजी भारत सरकारने उर्वरित पांच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँक याचे विलिनीकरण SBI मध्ये करण्यासाठी मान्यता दिली. पण विलिनीकरण १ एप्रिल २०१७ रोजी अंमलात आले.

६)१ फेब्रुवारी १९६९ व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रण लादण्यात आले. त्याबाबतचा निर्णय तत्कालिन उपपंतप्रधान व अर्थमंत्री श्री. मोरारजी देसाई यांनी घेतला.
सामाजिक नियंत्रण मुळे

१) १९ जुलै १९६९ या दिवशी १४ खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. १४ अशा बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ज्यांच्या ठेवी जून १९६९ मध्ये रु. ५० कोटीपेक्षा अधिक होत्या.
इतर

  • सर्वाधिक ठेवी सेंट्रल बँक ऑफ इंडिया ४३३ कोटी
  • सर्वाधिक कमी ठेवी बँक ऑफ महाराष्ट्र ७३ कोटी
  • सर्वात जुनी बँक इंडियन ओव्हरसीज बँक स्थापना १८३६ ला
  • सर्वात नवीन बँक युनायटेड बँक ऑफ इंडिया १९५० स्थापना

२) १५ एप्रिल १९८० ला ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण अशा ६ बँका ज्यांच्या ठेवी १४ मार्च १९८० रोजी रु. २०० कोटींपेक्षा अधिक होत्या. यादी ६ बँकची

  1. आंद्र बँक
  2. न्यू बँक ऑफ इंडिया
  3. ओरीएंटल बँक ऑफ कॉमर्स
  4. कॉर्पोरेशन बँक
  5. पंजाब and शिंध बँक
  6. विजया बँक
विलीकरन राष्ट्रीय बँक

४ सप्टेंबर १९९३ ला तोट्यात चाललेल्या न्यू बँक ऑफ इंडियाचे विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेत करण्यात आल्याने राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या १९ झाली

१ एप्रिल २०१९ बँक ऑफ बडोदा ,देना बँक आणि विजया बँक यांचे विलीकरन =बँक ऑफ बडोदा मध्ये केले

१० सरकारी बँकची विलिकरन घोषणा 30 ऑगस्ट २०१९ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केले आता सरकारी बँकची संख्या १३ होईल अगोदर १९ होती `खाली बँक विलिकरन केले

  1. पंजाब नॅशनल बँक ,ओरीएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया ह्याचं विलीकरन = पंजाब नॅशनल बँक मध्य होणार आहे
  2. कॅनरा बँक आणि सिंधीकेत बँक ह्यांचे विलीकरन =कॅनरा बँक मध्ये केले
  3. युनियन बँक ऑफ इंडिया ,आंध्र बँक आणि कार्पोरेशन बँक ह्यांचे विलिकरन =युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये केले
  4. इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक ह्यांचे विलिकरन =इंडियन बँक मध्ये केले

विलीकरण मुले परिणाम
सर्वात मोठी सार्वजनिक बँक क्रमांक नुसार

  1. पहिला नंबर =SBI
  2. दुसरा नंबर =PNB (पंजाब नॅशनल बँक )
  3. तिसरा क्रमांक =बँक ऑफ बडोदा
  4. चौथा क्रमांक =कॅनरा बँक
  5. पाचवा बँक =युनियन बँक ऑफ इंडिया

RBI १९९३ मध्ये खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन करण्याची संमती दिली. या नुसार स्थापन झालेल्या बँकांना नवीन खाजगी बँका असे म्हणतात

१९९४ ला भारत सरकारने सार्वजनिक क्षेत्रासाठी बँकचे आंशिक खाजगीकरण धोरण जाहीर केले या धोरणात ५१%भागीदारी सरकारची असली पाहिजे

संयुक्त भांडवली बँकांचे वर्गीकरण

RBI कायदा १९३४ या कायद्यान्वये व्यापारी बँकांचे वर्गीकरण दोन प्रकारे केले
१) अनुसूचित बँका २) बिगर अनुसूचित बँका असे करण्यात आले.

अनुसूचित बँक : ज्या बँकांचा समावेश RBI कायदा १९३४ च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे. त्यांना अनुसूचित बँका असे म्हणतात.

बिगर अनुसूचित बँक : ज्या बँकांचा समावेश RBI कायदा १९३४ च्या दुसऱ्या अनुसूचिमध्ये करण्यात आलेला नाही त्यांना गैर-अनुसूचित बँका असे म्हणतात.

बँकेची वैशिष्ट्ये

बँक विशेष

  • भारतातील पहिली बँक= बँक ऑफ हिंदुस्तान (स्थापना १७७०)
  • भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बैंक= अवध कमर्शिअल बँक (स्थापना १८८१)
  • पहिली पूर्ण भारतीय बँक= पंजाब नॅशनल बँक (स्थापना १८९४)
  • भारतातील सर्वात मोठी बँक = स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)
  • भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक= ICICI बँक
  • भारतातील सर्वात मोठा बँक समूह= राष्ट्रीयीकृत बँकांचा समूह
  • भारतात सर्वाधिक शाखा असलेली परकीय बँक=स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक(UK)
  • परदेशात सर्वाधिक शाखा असलेली भारतीय बँक =स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)
  • परदेशात सर्वाधिक देशांमध्ये काम करणारी भारतीय बँक=स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)
  • जगातील सर्वात मोठी बँक= इंडस्ट्रियल कमर्शिअल बँक ऑफ चायना
  • भारतात चेकची व्यवस्था सुरू करणारी पहिली बँक=बेंगाल बँक (स्थापना १७८४)
  • भारतात बचत बँक सुरू करणारी पहिली बँक= प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगाल (स्थापना १८३०)
  • इंटरनेट बँकींग सुरू करणारी पहिली बँक= ICICI बँक
  • क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक=सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • ATM सुरू करणारी पहिली बँक=HSBC (स्थापना १९८७)
  • ISO प्रमाणपत्र मिळालेली पहिली बँक= कॅनरा बँक
  • म्युचुअल फंड सुरू करणारी पहिली बँक = स्टेट बँक ऑफ इंडिया
  • सर्वात जुनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक= अलाहाबाद बैंक
  • भारताबाहेर शाखा काढणारी पहिली बैंक= बँक ऑफ इंडिया लंडन (स्थापना १२४६)
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch