महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ कलम १६३ ते १६४ जाणून घ्या सविस्तर

नमस्ते  महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ यामध्ये  मुख्यमंत्री -कार्य ,कलम १६३ ते १६४ ,उपमुख्यमंत्री,मंत्रिमंडळाची रचना इत्यादी माहिती यातून राज्य प्रशासन बद्दल माहिती मिळेल

राज्य मंत्रिमंडळ भारताच्या घटनेमध्ये केंद्राप्रमाणे राज्य स्तरावर राजकीय -प्रशासकीय व्यवस्थेमध्ये खरी वास्तविक सत्ता मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळच्या आहे (राज्यपाल राज्यप्रमुख आणि मुख्यंमंत्री शासन प्रमुख )

कलम १६४ राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्त करतील अट विधानसभेतील बहुमतातील पक्षाला नेत्यालाच मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करावे लागेल घटनात्मकदुरुस्त्या मुख्यमंत्री द्विगृही विधिमंडळपैकी कोणत्याही एका सभागृहाच्या सदस्य असू शकतात .शपथ राज्यपाल देतात

मुख्यमंत्री-कार्य

  1. राज्य नियोजन मंडळाचे पदशिध अध्यक्ष म्हणून करतील
  2. राष्ट्रीय विकास परिषदचे सदस्य म्हणून
  3. आंतर -राज्यीय परिषदेचे सदस्य म्हणून
  4. विभागीय परिषदेचे (Zonal Council ) उपाध्यक्ष म्हणून एकावेळी एका वर्षासाठी (सर्व विभागीय परिषदेचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृह मंत्री कार्य करतात )
  5. राज्यशासनाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून
  6. राज्य मंत्रिमंडळचे बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषवितात
  7. सेवांचे राजकीय प्रमुख म्हणून कार्य करतात .

कलम १६३ ते १६४

घटनेत फक्त १६३ व १६४ या दोन कलमाचे वर्णन केले आहे .

कलम १६३ राज्यपालास सहाय्य व सल्ला देण्यास मंत्रिमंडळ

  • कलम १६३ (१) : राज्यापालास आपली कार्य पार पाडतांना स्वेच्छाधीकार वगळता इतर सहाय व सल्ल्यासाठी मुख्यामंत्रांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल .
  • कलम :१६३(२): राज्यपालाने स्वविवेकानुसार दिलेला निर्णय अंतिम असेल. ( अशी तरतूद राष्ट्रपती बाबत नाही )राज्यपालाने केलेल्या कोणत्याही कृतीची विधीग्राह्याता , त्याने स्वच्येने कृती करायला हवी होती की , नाही या कारणास्तव प्रश्नास्पद करता येत नाही .
  • कलम १६३ (३):मंत्र्याने राज्यपालास दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही .

कलम १६४ मंत्रासंबंधी अन्य तरतुदी

  1. कलम १६४ (१) मुख्यमंत्री राज्यपालाक्डून नियुक्त आणि इतर मंत्र्याची नेमणूक राज्यपाल मुख्यमंत्रीच्या सल्ल्याने करेल
    विशेष छत्तीसगड ,झारखंड ,माध्येप्रदेश व ओडिशा या राज्यामध्ये १ अधिवासी कल्याण मंत्र्याची नेमणूक राज्यपाल करेल
  2. कलम १६४ (1A):राज्य मंत्रिमंडळ एकूण मंत्र्याची संख्या मुख्यमंत्र्यांसहित विधानसभेच्या एकूण सदस्याच्या १५% पेक्षा अधिक असू नये व कमीतकमी १२ असावेत (९१ वी घटनादुरुस्ती २००३ )
  3. कलम १६४ (1B): राज्य विधिमंडळ सदस्य पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरला असेल तर मंत्री म्हणून हि अपात्र ठरतो (९१ वी घटनादुरुस्ती २००३ )
  4. कलम १६४(१) वैयक्तिक मंत्री राज्यपालास जबाबदार असेल
  5. कलम १६४(२) मंत्रिमंडळ सामूहिकरीत्या विधानसभेला जबाबदार असतो.
  6. कलम १६४ (३)मंत्र्याची शपथ ३ र्या अनुसूचित दिल्या प्रमाणे
  7. कलम १६४(४)एखादा मंत्री सलग ६ महिने विधिमंडळ सदस्य नसेल तर अपात्र .
  8. कलम १६४ (५)मंत्र्याचे वेतन व भत्ते विधिमंडळ कायद्याप्रमाणे

उपमुख्यमंत्री नेमणूक: घटनेत तरतुदी नाही कधीकधी गरजेनुसार मंत्रिमंडळात एखाद्या व्यक्तीचे नेमणूक करतात फक्त राजकीय कारणामुळे

मंत्रिमंडळाची रचना: घटनेमध्ये राज्यच्या मंत्रिमंडळाचा आकार तसेच प्रकार यांचाबाद्द्ल तरतुदी नाही

तीन प्रकारचे मंत्री असतात

  1. कॅबीनेत =राज्य मंत्रिमंडळ कॅबीनेत मंत्र्याच्या गटाला कॅबीनेत म्हणतात हे पक्षाचे प्रमुख /जेष्ठ असतात यांना महत्वाचे खाते देतात मुख्य मंत्र्याकडून कॅबीनेत समित्या स्थापन करतात कारण कॅबीनेत मंत्र्याचे कामाचे तान कमी करण्यासाठी
  2. राज्यमंत्री =यांना विभागाचे स्वतंत्र कार्यभार दिला जाऊ शकतो /कॅबीनेत मंत्र्यांना सहाय्य म्हणून
  3. उपमंत्री = यांना विभागाचे स्वतंत्र कार्यभार दिला जात नाही हे प्रशासकीय ,राजकीय तसेच विधानमंडळातील कामकाजात मदत करतात

महारष्ट्र शासन सविस्तर माहिती

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch