भूगोल इतर MCQ PYQ आयोगाने विचारलेल

भूगोल इतर MCQ Combine या परीक्षेत आयोगाने विचारलेले २०११ पासून ते आतापर्यंत इतर प्रश्न कसे विचारलेले जाणून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल अभ्यास कसा करावा

मित्रानो विश्लेषण केल्यावर समजले कि आयोगाने काही प्रश्न अगदी सामान्य प्रश्न विचारलेले जे आपण ज्यास्त करून त्या गोष्टी कडे दुर्लक्ष करतो चला तर जाणून घऊया ते प्रश्न

प्र.1. महाराष्ट्रातील चाळी व घरे यांचा विकास करणारी संस्था म्हाडा (MHADA) केव्हा उदयास आली? (STI मुख्य 2022)

1) जून 1975         2) जानेवारी 1985

3) डिसेंबर 1957  4) डिसेंबर 1977

प्र.2. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविणारे ‘ग्राम स्वच्छता अभियानाचा’ मुख्य उद्देश्य म्हणजे : (STI मुख्य 2022)

अ) ग्रामीण समाजातील जातियवाद कमी करणे.

ब) ग्रामीण भागात शौचाचा उपयोग करणे.

क) माणसाची मने स्वच्छ करणे.

ड) ग्रामीण भागातील हवा स्वच्छ करणे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/ त?

पर्यायी उत्तरे :

1) फक्त अ

2) फक्त क आणि ड

3) फक्त अ आणि ड

4) फक्त ब 

प्र.3. आय. एस. आर. ओ. म्हणजे : (STI पूर्व, 2016)

1) इंडियन स्टेट्स रिसर्च ऑर्गनायझेशन

2) इंटरनॅशनल स्पेस रिजनल ऑर्गनायझेशन

3) इंटरनॅशनल सायंटीफिक रिसर्च ऑर्गनायझेशन

4) इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन

प्र.4. महाराष्ट्र सरकारने दरिद्रयरेषेखालील लोकांना त्वरित आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली. सुरुवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या जिल्हा गटाला याचा लाभ मिळेल? (STI मुख्य 2012)

1) गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, रायगड, धुळे, व पुणे.

2) सोलापूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, धुळे, मुंबई, मुंबई, उपनगर व रायगड. 

3) नागपूर, नांदेड, अमरावती, धुळे, रायगड, गडचिरोली, व सोलापूर.

4) नांदेड, धुळे, ठाणे, रायगड, सोलापूर, अमरावती व गडचिरोली.

प्र.5. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केंव्हा पासून सुरु झाली?

1) 15 ऑगस्ट 1947           2) 26 जानेवारी 1950

3) 1 एप्रिल 1951           4) 1 मे 1950

प्र.6. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता अगतिक प्रकल्प बांधा-वापरा आणि ह्स्तांतरण करा या बाबतीत अयशस्वी ठरला? (STI पूर्व,2012)

1) उजनी प्रकल्प                 2) दाभोळ प्रकल्प 

3) सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प  4) सिंगुर प्रकल्प

              ASO

प्र.7. राज्यात ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी कोणती योजना आली व ती कधी सुरु झाली? (ASO मुख्य 2022)

1) डॉ. मुखर्जी निवास योजना – 2014

2) इंदिरा आवास योजना – 1989 

3) जवाहर आवास योजना – 1995

4) रोजगार हमी योजना – 2011

प्र.8. सन 2014 पर्यंत महाराष्ट्रात कोणत्या विभागात एक ही विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) कार्यान्वित झालेले नाही? (Asst मुख्य 2015)

1) कोंकण     2) औरंगाबाद      3) नाशिक      4) नागपूर

प्र.9 राष्ट्रीय सभा/ काँग्रेस पक्षाने 1938 मध्ये खालीलपैकी कोणती समिती स्थापना केली? (ASO मुख्य 2014)

1) राष्ट्रीय नियोजन समिती       2) अस्पृश्य उद्धार समिती

3) वृत्तपत्र स्वातंत्र्य समिती             4) राष्ट्रीय महिला समिती

प्र.10. मानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात————–पेक्षा जास्त आहे? (ASO पूर्व, 2014)

1) 0.3       2) 0.5      3) 0.9     4) 0.8 

प्र.11. ‘यशवंत पंचायत राज अभियान’ पुरस्कारांर्गत, तृतीय क्रमांकाचे रु 10 लाखाचे पारितोषिक पटकवणारा पूर्व महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? (ASO पूर्व, 2012)

1) अमरावती   2) गडचिरोली    3) चंद्रपूर      4) गोंदिया

प्र.12. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरु झाली? (ASO पूर्व 2012)

1) नाशिक     2) पुणे      3) सातारा      4) औरंगाबाद

प्र. 13. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची साधनसामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळविणे भाग पडले? (ASO पूर्व, 2012)

1) पहिली पंचवार्षिक योजना           2) दुसरा पंचवार्षिक योजना

3) तिसरी पंचवार्षिक योजना      4) पाचवी पंचवार्षिक योजना

प्र.14. नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टात अग्रक्रम देण्यात आला होता? (ASO पूर्व, 2012)

1) समाजवादी समाजरचना                  2) आत्मनिर्भरता

3) समताधिष्ठित न्यायासह विकास   4)प्रादेशिक समतोल

PSI

प्र.15. भारताच्या ग्रामीण आर्थिक विकासात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे? (PSI पूर्व, 2012)

1) भांडवल कमतरता     2) नियोजनाचा अभाव

3) भ्रष्टाचार                  4) शिक्षणाचा अभाव

उत्तर (#) आयोगाने हा प्रश्न रद्द केला आहे. 

प्र.16. खालीलपैकी कोणते शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? (PSI मुख्य, 2012)

1) औरंगाबाद     2) अहमदनगर    3) नागपूर     4) मुंबई

प्र.17. मुंबई शहराची वाढी प्रगती पाहून———–चे संपादक रॉबर्ट नाईट ह्यांने आपल्या वर्तमान पत्राने नाव बदलून ‘टाईम्स ऑफ इंडिया ठेवले’.(PSI मुख्य, 2012)

1) बॉम्बे गॅझेत       2) बॉम्बे कुरीयर

3) बॉम्बे टाईम्स   4) बॉम्बे स्टँडर्ड

प्र.18. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे? (PSI मुख्य, 2012)

1) अहमदनगर     2) अमरावती    3) अकोला       4) बुलढाणा

प्र.19. महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? (PSI मुख्य 2012)

1) 3      2) 5      3) 7       4) 9

प्र.20. सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शहर निवासी शाळांमुळे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते?

1) पाटण     2) वाई     3) पाचगणी (उत्तर)     4) महाबळेश्वर

प्र.21.खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिकानाही? (PSI पूर्व 2011)

1) नागपूर    2) भिवंडी     3) पुणे      4) बुलढाणा

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch