फौजदारी प्रक्रिया संहिता MCQ-Code Criminal Procedure MCQ

फौजदारी प्रक्रिया संहिता MCQ विश्लेषण या घटकवर आयोगाने विचारलेले प्रश्न समाविष्ट केले आहे कमी वेळेत जास्त आणि अचूक अभ्यास होण्यास मदत होईल

मित्रानो फौजदारी प्रक्रिया संहिता या घटक वर आयोगाने ३५ पेक्षा अधिक प्रश्न विचारलेले आहे. जाणून घेऊया कसे प्रश्न असतात 

शेवटी : उत्तर दिले आहे. 

प्र. १) फौजदारी प्रक्रिया संहितेबाबत कोणते विधान चुकीचे आहे ? ( PSI मुख्य २०१३ )

A) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ची आहे.

B) ती जम्मू-काश्मीर राज्यास लागू नाही.

C) त्यातील काही तरतुदी नागलँड राज्यास लागू नाहीत.

D) संहितेच्या सर्व तरतुदी जनजाती क्षेत्रांना लागू आहेत.


प्र. २) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ अन्वये निर्वाह भत्त्याची सोय (उपाययोजना) ही कुणाकरिता उपलब्ध करून दिली आहे. ( PSI मुख्य २०१३ )

A) हिंदूकरिता

B) मुस्लिमाकरिता

C) ख्रिश्चनांकरिता

D) सर्व धर्माच्या सर्व लोकांकरिता


प्र. ३) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ अन्वये खालीलपैकी कोणत्या तरतुदी खऱ्या आहेत ? ( PSI मुख्य २०१३ )

अ) पोलीस ठाणे प्रमुख त्याचे पोलीस ठाणे क्षेत्रात जे अधिकार वापरू शकतो तेच अधिकार अशा ठाणे प्रमुखाच्या क्षेत्राचा वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा वापरू शकतो.

ब) एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने कि ज्याला एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचे अधिकार आहेत त्याने कोणत्याही नागरिकाची मदत मागितल्यास त्याला मदत करणे अशा व्यक्तीचे कायदेशीर कर्तव्य आहे.

क) एखादी खाजगी व्यक्ती सुद्धा दुसऱ्या अशा व्यक्तीला, की जी त्याच्या डोळ्यादेखत अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हा करीत आहे, त्याला अटक करून पोलीस ठाण्यात नेऊ शकते.

ड) असा पोलीस अधिकारी ज्याला कोणत्याही व्यक्तीला विनावारंट अटक करण्याचे प्राधिकार आहे तो एखाद्या व्यक्तीला अटक करण्याकरिता त्याच्या मूळ कार्यक्षेत्राबाहेरही भारतात कुठेही पाठलाग करू शकतो.

A) अ फक्त

B) ब आणि क

C) अ, ब आणिक

D) अ, ब, क आणि ड


प्र. ४) फौजदारी प्रक्रिया संहिता मधील कलम १२५ अंतर्गत पोटगीसाठी कोण दावा करू शकत नाही ? ( PSI मुख्य २०१४ )

A) वयात आलेली लग्न झालेली मुलगी
B) लहान अनौरस मूळ
C) आई किंवा वडील
D) वरीलपैकी कोणीही नाही


प्र. ५) जामीन योग्य अपराधामध्ये, हक्क म्हणून जामीन कोणाद्वारे दिली जाते ? ( PSI मुख्य २०१४ )

A) पोलीस अधिकारी
B) न्यायालय
C) पोलीस अधिकारी आणि न्यायालय दोन्ही
D) यापैकी कोणतेही नाही

प्र. ६) कारागृहाच्या परिभाषांमध्ये खालीलपैकी कोणते विधान / विधाने समाविष्ट आहेत ? ( PSI मुख्य २०१४ )

अ) राज्य शासनाने सामान्य किंवा विशेष हुकुमाद्वारे घोषित केलेली, कोणत्याही जागेस दुय्यम कारागृह म्हणून मान्यता दिलेली जागा.

ब) केंद्र शासनाने घोषित केलेली अशा प्रकारची कोणतेही जागा

क) कोणतेही सुधारालय, किशोर सुधारालय किंवा अन्य कोणतीही अशा स्वरूपाची संस्था

पर्यायी उत्तरे

A) अ फक्त

B) अ आणि क फक्त

C) अ आणि ब फक्त

D) वरीलपैकी सर्व


प्र. ७) फौजदारी प्रक्रिया संहिता मधील कलम ९५ मध्ये जप्तीची घोषणा रद्द करण्याचे आदेश खालीलपैकी कोण देऊ शकतो ?( PSI मुख्य २०१४ )

A) झडती अधिपत्राचे आदेश देणारे दंडाधिकारी
B) मुख्य न्यायिक दंडाधिकारी/मुख्य महानगर दंडाधिकारी
C) सत्र न्यायालय
D) उच्च न्यायालय

प्र. ८) फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तरतुदींनुसार जेव्हा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार असतात तेव्हा त्या अपराधाला काय म्हणतात ? ( PSI मुख्य २०१६ )

A) जमीनयोग्य अपराध (गुन्हा)
B) बिनजमिनी (अजामिन पात्र) अपराध
C) दखलपात्र-अपराध
D) अदखलपात्र अपराध

प्र. ९) फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १०८ प्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी एखाद्या व्यक्तीकडून चांगल्या वागणुकीसाठी किती कालावधी करिता बंधपत्र घेऊ शकते ? ( PSI मुख्य २०१६ )

A) जास्तीत जास्त करिता बंधपत्र घेऊ शकते.
B) जास्तीत जास्त एक महिना
C) जास्तीत जास्त एक वर्ष
D) वरीलपैकी काहीही नाही

प्र. १०) फौजदारी प्रक्रिया संहितेतील ———-अन्वये अटक आरोपींची वैद्यकीय तपासणी पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीने करणेची तरतूद आहे. ( PSI मुख्य २०१६ )

A) कलम ५३

B) कलम ४१

C) कलम ४७

D) कलम ५२

प्र. ११) फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ———- ने प्रथम अमाहिती अहवाल लिहून घेण्याची पद्धत दिलेली आहे.( PSI मुख्य २०१६ )

A) १९९

B) १०९

C) ११०

D) १५४


प्र. १२) फौजदारी प्रक्रिया संहिता नुसार पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला ठाण्याच्या हद्दीच्या आत असलेल्या कोणत्याही स्थळी असलेली कोणतीही वजने, मापे किंवा करण्याची साधने तपासणी करण्यासाठी किंवा त्यांचे झडती घेण्यासाठी वॉरंटशिवाय तेथे प्रवेश करता येईल. ( PSI मुख्य २०१६ )

A) कलम १५३(१)

B) कलम १५१

C) कलम १०९

D) कलम १७३(२)


प्र. १३) खालीलपैकी कोणत्या न्यायालयास मृत्यूची किंवा आजीव कारावासाची किंवा सात वर्षाहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेखेरीज, कायद्याद्वारे प्राधिकृत केलेली कोणतीही शिक्षा देण्याचा अधिकार आहे ? ( PSI मुख्य२०१६ )

A) मुख्य न्यायदंडाधिकारी
B) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी
C) द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी
D) मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी

प्र. १४) फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २(द) नुसार “पोलीस अहवाल” म्हणजे पोलीस अधिकाऱ्याने उप-कलम (२) प्रमाणे न्यायधीशाकडे पाठविलेला अहवाल होय. ( PSI मुख्य २०१७ )

A) कलम १७१

B) कलम १७३

C) कलम १७२

D) कलम १७४


प्र. १५) फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १६६ अ आणि १६६ व हे दुरुस्ती कायदा, १९९० (१९९० चा १) प्रमाणे समाविष्ट केले हे दिनांक पासून अंमलात आलेले आहे. ( PSI मुख्य २०१७ )

A) २५-३-१९९०

B) ९-२-११९०

C) २१-६-१९९०

D) २४-८-१९९०


प्र. १६) फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २(पं) नुसार ‘सरकारी अभियोक्ता’ म्हणजे कलम प्रमाणे नेमणूक केलेली कोणतीही व्यक्ती होय आणि त्यात सरकारी अभियोक्ताचे मार्गदर्शनाप्रमाणे कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश आहे. ( PSI मुख्य )

A) कलम २०

B) कलम २२

C) कलम २६

D) कलम २४


प्र. १७) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम २ नुसार जोड्या लावा. : ( PSI मुख्य २०१७ )

कलम तरतूद
अ) २ (ख्) १) अधिसूचनेची व्याख्या
ब) २ (ग्) २ ) दोषारोपाची व्याख्या
क) २ (छ) ३) दखलपात्र अपराधाची व्याख्या
ड) २ (ड) ४) चौकशीची व्याख्या

पर्यायी उत्तरे
अ ब क ड
A) २ ३ ४ १
B) २ ४ ३ १
C) ४ २ १ ३
D) १ २ ३ ४


प्र. १८) फौजदारी प्रक्रियया संहिता १९७३ मधील दंडाधिकाऱ्याकडे फिर्यादी संदर्भात जोड्या लावा. : ( PSI मुख्य २०१७ )

कलम तरतूद

अ) २०० १)आदेशिका काढण्याचे लांबणीवर टाकणे.
ब) २०१ २)फिर्याद फेटाळणे
क) २०२ ३)फिर्यादीची साक्ष तपासणी
ड) २०३ ४)प्रकरणांची दाखल घेण्यास सक्षम नसलेल्या दंडाधिकाऱ्याने अनुसरायची प्रक्रिया

पर्यायी उत्तरे
अ ब क ड
A) ३ ४ १ २
B) ३ २ ४ १
C) ४ ३ २ १
D) ४ ३ १ २


प्र. १९) फौजदारी प्रक्रियया संहिता १९७३ मधील दंडाधिकाऱ्याकडे फिर्यादी संदर्भात जोड्या लावा. : ( PSI मुख्य २०१७ )

कलम तरतूद

अ) ३४२ १) अवमानाच्या विवक्षित प्रकरणातील प्रक्रिया
ब) ३४४ २) वादखर्चाचा आदेश देण्याचा अधिकार
क) ३४५ ३) खोटा साक्षीपुरावा देण्याच्या अपराधाबद्दलच्या संपरीक्षेसाठी संक्षिप्त प्रक्रिया
ड) ३४८ ४) माफिपात्र सदर केल्यावर अपराध्याची विनादोषारोप सुटका

पर्याय उत्तरे
अ ब क ड
A) ४ ३ १ २
B) २ ४ ३ १
C) २ ३ १ ४
D) १ २ ४ ३


प्र. २०) फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ४३८(२) मध्ये दिलेल्या अटी उच्च नायालय किंवा सत्र न्यायालय कलम ४३८ च्या पोटकलम (१) खाली निर्देश देताना समाविष्ट करू शकेल. ( PSI मुख्य २०१८ ) A) तीन

B) पाच

C) चार

D) सहा

प्र. २१) “फौजदारी प्रक्रिया संहितेच्या” आधारे योग्य विधान निवडा. ( PSI मुख्य २०१८ )

अ) सहाय्यक सत्र न्यायाधीश, मृत्युदंड किंवा जन्मठेप या खरेदी कायद्याने ठरवून दिलेली कोणतीही शिक्षा देऊ शकतात.

ब) सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची परवानगी लागते.

पर्यायी उत्तरे :

A) विधान अ चूक असून ब बरोबर आहे.

B) विधान अ बरोबर असून ब चूक आहे.

C) अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत.

D) अ आणि ब दोन्ही विधाने चूक आहेत.

प्र. २२) फौजदारी दंड संहिता १९७३ कलम १४४ अंतर्गत काढलेला आदेश जास्तीत जास्त _ महिन्यांपर्यंत अंमलात रहातो आणि जरुरी असल्यास राज्य सरकार जास्तीत जास्त महिन्यांपर्यंत मुदत वाढवू शकते. ( PSI मुख्य २०१८ )

A) १२, २४

B) २, ६

C) १, ३

D) ३, ६


प्र. २३) फौजदारी प्रक्रिया संहितेतील कोणत्या कलमान्वये असे स्पष्ट केले आहे की एखाद्या व्यक्तीला एखादा अपराध केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली असेल आणि अशा अपराधाच्या अन्वेषणाच्या प्रयोजनासाठी इतर कोणत्याही व्यक्तीने किंवा व्यक्तींनी त्यांची ओळख पटविणे आवश्यक असेल तेव्हा, त्या अधिकारिता असणाऱ्या न्यायालयाला, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या विनंतीवरून अशा प्रकारे आटत करण्यात आलेल्या व्यक्तीला, तिने न्यायालयाला योग्य वाटेल अशा रितीने कोणत्याही व्यक्तीकडून किंवा व्यक्तींकडून ओळख पटविण्यासाठी स्वत:ला अधीन करण्याबाबत निर्देश देता येतील. ( PSI मुख्य २०१८ )

A) कलम ५४

B) कलम ५४ A

C) कलम ५५ A

D) कलम ५५

प्र. २४) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ७० च्या अंतर्गत काढलेले अटक वॉरंट किती काळापर्यंत अंमलात रहाते ?( PSI मुख्य २०१८ )

A) १ वर्ष
B) ६ महिने
C) ५ वर्ष
D) ज्यांनी काढले त्या कोर्टाकडून रद्द होईपर्यंत किंवा त्याची अंमलबजावणी होईपर्यंत.


प्र. २५) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या तरतुदींनुसार दखलपात्र अपराध म्हणजे ( PSI मुख्य २०१८ )

A) पोलीस अधिकारी वॉरंट शिवाय अटक करू शकतात.
B) पोलीस अधिकारी असेल तरच अटक करू शकतात.
C) अजामिनपात्र अपराध
D) वरीलपैकी नाही

प्र. २६) फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम २(आर) नुसार ‘पोलीस अहवाल’ म्हणजे पोलीस अधिकाऱ्याने च्या पोटकलम (२) प्रमाणे न्यायाधीशांकडे पाठविलेला अहवाल होय. ( PSI मुख्य २०१८ )

A) कलम १७६

B) कलम १७३

C) कलम १७४

D) कलम १७५


प्र. २७) फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ९४(२) च्या अंतर्गत “आक्षेपार्ह वस्तू” कोणत्या होतात ? ( PSI मुख्य २०१८ )

अ) नकली नाणे

ब) बनावट दस्तऐवज

क) खोटे शिक्के

ड) बनावट नोटा

पर्यायी उत्तरे :
A) अ आणि ड

B) ब आणि क

C) ब फक्त

D) अ, ब, क आणि ड


प्र. २८) फौजदारी प्रक्रिया संहिता ११(२) खाली जी न्याय दंडाधिकाऱ्यांची न्यायालये स्थापन केली जातात अशा न्यायालयांचे पीठासन अधिकारी कडून नियुक्त केले जातात. ( PSI मुख्य २०१८ )

A) जिल्हा न्यायालय

B) राज्य सरकार

C) उच्च न्यायालय

D) सर्वोच्च न्यायालय


प्र. २९) फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ९६ अन्वये ज्याच्या बाबतीत कलम ९५ खाली समपहरणाची घोषणा करण्यात आली असेल अशा कोणत्याही वर्तमानपत्रात, पुस्तकात अगर इतर दस्तऐवजात हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, शासकीय राजपत्रात अशी घोषणा प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून आत उच्च न्यायालयाकडे अशी घोषणा रद्द करावी यासाठी अर्ज करता येईल. ( PSI मुख्य २०१८ )

A) दोन महिन्यांच्या

B) एक वर्षाच्या

C) सहा महिन्यांच्या

D) तीन महिन्यांच्या


प्र. ३०) पुढील विधानांचा फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या संदर्भात विचार करा. ( PSI मुख्य २०१९ )

अ) वॉरंट जामिन देता येतो.
ब) पकड वॉरंटाची अंमलबजावणी भारतात किंवा भारताबाहेर कोठेही करता येतो.
पर्यायी उत्तरे :
A) अ विधान बरोबर असून ब चूक आहे.
B) ब विधान बरोबर असून अ चूक आहे.
C) अ आणि ब दोन्ही चूक आहेत.
D) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.


प्र. ३१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम ४१ अन्वये पोलिसांना वॉरंटशिवाय गुन्हेगारास केव्हा अटक करता येते?( PSI मुख्य २०१९ )

A) पोलीस आयुक्तांना आदेश असेल तर
B) पालिका आयुक्तांच्या आदेशावरून
C) दखलपात्र गुन्हा असेल तर
D) वर्तमानपत्रातील प्रसिद्ध झालेल्या लेखावरून


प्र. ३२) जोड्या जुळवा :

अ) अटकपूर्व जामीन १) पहिली अनुसूची
ब) समरी खटला २) वॉरंट शिवाय अटक
क) दखलपात्र गुन्हा ३) अटकेची शक्यता
ड) जामीनपात्र किंवा अजामीनपात्र गुन्हा ४) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
A) १ ३ ४ २
B) २ १ ३ ४
C) ३ ४ २ १
D) ३ २ ४ १


प्र. ३३) ———–यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसींवरून २०१३ मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेत सुधारणा करण्यात आली ? ( PSI मुख्य २०१९ )

A) न्यायमूर्ती पी.बी. सावंत

B) न्यायमूर्ती जे.एस. वर्मा

C) न्यायमूर्ती श्रीकृष्ण

D) न्यायमूर्ती रंजना देसाई


प्र. ३४) योग्य उत्तर निवडा. ( PSI मुख्य २०१९ )

फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार एकदा काढलेले वॉरंट किती कालावधीसाठी अंमलात असते ?

अ) एक वर्ष
ब) पाच वर्ष
क) ज्या कोर्टाने काढले असेल त्या कोर्टाकडून रद्द होईपर्यंत
ड) त्याची अंमलबजावणी होईपर्यंत
पर्यायी उत्तरे :
A) फक्त अ

B) फक्त ब

C) फक्त ड

D) क आणि ड


प्र. ३५) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १२५ कोणाला निर्वाह भत्ता मिळू शकतो. ( PSI मुख्य २०१९ )

A) व्यक्तीची, स्वत:च्या निर्वाह करण्यास असमर्थ असलेली पत्नी
B) व्यक्तीचे, स्वत:चा निर्वाह करण्यास असमर्थ औरस व अनौरस अज्ञान बालक
C) व्यक्तीचे स्वत:चा निर्वाह करण्यास असमर्थ असलेले वडील किंवा आई
D) वरील सर्व


प्र. ३६) योग्य उत्तर निवडा. ( PSI मुख्य २०१९ )

ज्या गुन्ह्याला फाशीनी अथवा जन्मठेपेची शिक्षा आहे. असा अपराध केला असला तरी फौजदारी प्रक्रिया संहितेमधील तरतुदीनुसार पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरोपींना जामिनावर सोडता येते ?

अ) १६ वर्षापेक्षा कमी वयाचा आरोपी
ब) कोणत्याही वयाची स्त्री
क) कोणताही आजारी अथवा दुर्बळ व्यक्ती

पर्यायी उत्तरे :
A) फक्त अ

B) फक्त अ आणि क

C) ब आणि क

D) वरीलपैकी सर्व


प्र. ३७) फौजदारी प्रक्रिया संहितेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या व योग्य उत्तर निवडा. ( PSI मुख्य २०१९ )

अ) विशेष न्याय दंडाधिकारी आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी या समानअर्थी संज्ञा आहेत.
ब) समन्स केस म्हणजे ज्या मध्ये गुन्ह्याकरिता फाशीची किंवा जन्मठेपेची किंवा २ वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते.
योग्य उत्तर निवडा.
A) विधान अ बरोबर असून ब चूक आहे.
B) विधान अ चूक असून ब बरोबर आहे.
C) अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत.
D) अ आणि ब दोन्ही विधाने चूक आहेत.

प्र. ३८) फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कोणत्या कलमासाठी जिल्हा दंडाधिकारी त्याच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक सीमांच्या आत कोणत्याही मिरवणूकीत शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध करू शकतो. ( PSI मुख्य २०१९ )

A) कलम १४९

B) कलम १४४ अ

C) कलम १४४ (१)

D) कलम १५२ अ

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ उत्तरे
१)D २)D ३)D ४)A ५)C ६)B ७)D ८)C ९)C १०)A
११)D १२)A १३)# १४)B १५)B 16)D १७)A १८)A १९)C 20)C
21)A २२)B २३)B २४)D २५)A २६)B २७)D २८)C २९)A 30)A
३१)C ३२)C ३३)B 34)D ३५)D ३६)D ३७)D ३८)B    
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch