पंचायती राज MCQ-73 वी 74 वी घटनादुरुस्ती विश्लेषण

पंचायती राज MCQ 73 वी 74 वी घटनादुरुस्ती विश्लेषण यावर आयोगाने विचारलेले आहे प्रश्न combine पूर्व  आणि मुख्य या परीक्षेत विचारलेले प्रश्न  आहे

मित्रानो विश्लेषण केल्यावर समजले कि combine ला तर PSI,ASO आणि  STI य परीक्षेत पूर आणि मुख्य परीक्षेत विचारलेले आहे जास्त भर aso दिसून आले आहे जास्तीजास्त प्रश्न aso पूर्व आणि मुख्य परीक्षेत विचारलेले आहे . चाल तर आयोग कसे प्रश्न विचारलेले आहे ते बघूया 

PSI

१) नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी ……..घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले (PSI पूर्व २०११)

१) ७३ व्या
२) ७४ व्या
३) ८६ व्या
४) ४२ व्या

२ ) भारताच्या संविधानाची ८३वी घटना दुरुस्ती काय सुचविते ? (PSI मुख्य २०१३)

१) अरुणाचल प्रदेशात पंचायतीत अनुसुचित जमातींकरिता आरक्षण नाही.
२) अरुणाचल प्रदेशात पंचायतीत अनुसुचित जातींना आरक्षण नाही.
३) अरुणाचल प्रदेशात पंचायतीत इतर मागास वर्गियांना आरक्षण नाही.
४) अरुणाचल प्रदेशात पंचायतीत हिंदूकरिता आरक्षण नाही.

३) भारतीय राज्यघटनेचे कलम ४० हे कशाशी संबंधित आहे ? (PSI पूर्व २०१६)

१) समान नागरी कायदा
२) पंचायत राज
३) समान कामासाठी समान वेतन
४) महिला सबलीकरण

STI 

१) भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तीमुळे झाले आहे ? (STI पूर्व २०११)

१) ७३,७४वी घटना दुरुस्ती
२) ४२,४३वी घटना दुरुस्ती
३) ४५,४६वी घटना दुरुस्ती
४) ७५,७६वीं घटना दुरुस्ती

२ ) महाराष्ट्रात ‘पंचायत राज’ या मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात ? (STI पूर्व २०१२ )

१) २७%
२) ३०%
३) ३३%
४) ५०%

३) 74 वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे. (STI मुख्य 2013)

अ) जिल्हा नियोजन समिती स्थापना करणे.

ब) ग्राम पंचायती स्थापन करणे.

क) राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे.

वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहे/ आहेत?

1) फक्त अ                   2) फक्त अ आणि ब

3) फक्त अ आणि क       4) अ, ब आणि क

 

३ )’खालील विधाने विचारात घ्या. (STI पूर्व २०१६)

अ) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल १९९४ मध्ये करण्यात आली.
ब) राज्य विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेणे हे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आहे. कार्य
वरीलपैकी कोणते/ ती विधाने / ने बरोबर आहे / त?

१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि ब
४) वरीलपैकी नाही

४ ) ७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ? (STI पूर्व २०१६)

१) २५ वर्षे
२) १८ वर्षे
३) २१ वर्षे
४) ३० वर्षे

५) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाविषयीची कोणती विधाने राज्य आहेत ? (STI मुख्य २०१८)

अ) आयोगाची स्थापना १९९५ मध्ये झाली.
ब) आयोगास संवैधानिक आधार आहे.
(क) आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतो.
ड) आयोगाच्या आयुक्ताची नेमणूक राज्यपाल करतात..
पर्यायी उत्तरे
१) फक्त ब, क आणि ड
२) फक्त अ, ब आणि क
३) फक्त अ, ब आणि ड
४) फक्त अं, क आणि ड

6) 74 व्या घटनादुरुस्ती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. (STI मुख्य 2018)

अ) ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे संक्रमित होणाऱ्या क्षेत्रासाठी नगर पंचायतीची स्थापना करता येते.

ब) नगरपालिकेचा कालावधी पाच वर्षे आहे आणि कार्यकाल पुर्तीनंतर एक वर्षाच्या आत पुन्हा निवडणुका घ्यावी लागते.

वरीलपैकी कोणते विधान/ ने चुकीचा/ चे आहे/ आहेत?

1) अ आणि ब              2) फक्त अ

3) फक्त ब                4) कोणतेही नाही

 

7) 73 व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/ विधाने अयोग्य आहे/ आहेत? (STI मुख्य 2018)

अ) भारत सरकारने 1993 मध्ये ग्रामीण विकासाकरिता 73 व्या घटना दुरुस्तीचा निर्णय घेतला.

ब) 73 व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायती राज संस्था च्या कार्यासंर्भात 19 विषय/ घटकांचा समावेश करण्यात आला.

पर्यायी उत्तरे :

1) फक्त अ        2) अ आणि ब दोन्ही 

3) फक्त ब        4) वरीलपैकी एकही नाही

 

8) भारतामध्ये राज्य घटनेच्या कोणत्या दुरुस्तीनुसार विकेंद्रित नियोजनाला सुरुवात होऊन विकास योजना तयार करण्याची जबाबदारी आणि अधिकार पंचायतींना देण्यात आले? (STI मुख्य 2014)

1) चौसष्टावी               2) त्र्याहत्तरावी

3) चौऱ्याह्त्तरावी         4) त्र्याहत्तरावी व चौऱ्याह्त्तरावी

 

9) 73 आणि 74 वी घटनादुरुस्तीचा———-कलमाशी जवळचा संबंध आहे. (STI मुख्य 2019)

1) कलम 243                     2) कलम 239

3) कलम 143                        4) कलम 249

 

10)  73 व्या घटना दुरुस्तीस———-रोजी मंजूरी देण्यात आली? (STI मुख्य 2022)

1) 24 एप्रिल 1994                2) 24 एप्रिल 1995

3) 24 एप्रिल 1993          4) 1 एप्रिल 1992

 

11)  74 व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारांना कोणती बाब आवश्यक करण्यात आली? (STI मुख्य 2022)

अ) तालुका समितीची स्थापना

ब) शिक्षणाचा हक्क

क) जिल्हा विकास समितीची स्थापना

ड) जिल्हा नियोजन समितीची स्थापना

पर्यायी उत्तरे :

1) अ फक्त                  2) ब आणि क

3) ड फक्त              4) यापैकी सर्व

 

12)  73 वी आणि 74 वी घटनादुरुस्ती संसदेत केव्हा पारित झाली? (STI मुख्य 2022)

1) जून 1991                        2) ऑगस्ट 1991

3) डिसेंबर 1992            4) एप्रिल 1993

ASO

१ ) भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायतराज संस्थांचे ‘स्वयंशासनाच्या संस्था’ असे वर्णन आहे? (Asst. पूर्व २०१२ )

  1. ७३वी घटनादुरुस्ती
  2. मूलभूत हक्क
  3. उद्देशपत्रिका
  4. राज्यनितीची मार्गदर्शक तत्त्वे

२ ) कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला ? (Asst. पूर्व२०१२)

  1. ७२वी
  2. ७३वी
  3. ७४वी
  4. ७५वी

३) भारतात महिलांसाठी………मध्ये जागा राखीव आहेत. (Asst. मुख्य २०१२)

  1. लोकसभा
  2. राज्य विधीमंडळे
  3. पंचायत राज संस्था
  4. यापैकी नाही

४ ) संविधानातील कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला? (Asst. पूर्व २०१३)

  1. ७१ – संविधान दुरुस्ती
  2. ७२ – संविधान दुरुस्ती
  3. ७३ संविधान दुरुस्ती
  4. ७४ संविधान दुरुस्ती

५ ) प्रत्येक पंचायत मुदतपूर्व विसर्जित न केली गेल्यास पाच वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते. (७३व्या घटनादुरुस्तीप्रमाणे) (Asst. मुख्य २०१३)

  1. तिच्या पहिल्या बैठकीच्या ठरविलेल्या तारखेपासून
  2. तिच्या निवडणुक निकालांच्या तारखेपासून
  3. निवडणुकीनंतरच्या तिच्या ग्रामसभेच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून
  4. तिच्या सरपंचांच्या निवडणुकीच्या तारखेपासून

६ ) खालील जोड्या जुळवा (Asst. मुख्य २०१३)

सूची अ- घटनादुरुस्ती सूची ब-तपशील
अ)६९ वी घटनादुरुस्ती i)राज्यस्तरीय भाडे न्यायासन स्थापना
ब)७५ वी घटनादुरुस्ती ii)अरुणाचल प्रदेशातील पंचायतीमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाची गरज नाही
क)८० वी घटनादुरुस्ती iii)दहाव्या वित्त आयोगाची शिफारशी स्वीकृत
ड)८३ वी घटनादुरुस्ती iv)दिल्लीला राष्ट्र्राजधानी भूप्रदेशाचा दर्जा

पर्याय उत्तरे

अ ब क ड

iv iii ii i

iv i iii ii

iii iv i ii

ii i iii iv

७ ) पंचायत राज्याच्या क्षेत्रात ७३व्या घटनादुरुस्तीदवा खालीलपैकी कोणती तरतूद सुचविलेली नाही ?(Asst. पूर्व २०१०५)

  1. महिला उमेदवारांना सर्व स्तरावर एक-तृतीयांश आर
  2. राज्याने वित्त आयोगाची स्थापना करावी.
  3. निर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर दोनपेक्षा जास्त अपत्य असतील, तर ते आपल्या पदावर राहण्यास अपात्र ठरतील
  4. पंचायत राज संस्था जर विसर्जित झाल्या तर सहा महिन्यांच्या कालावधित निवडणूका झाल्या पाहिजेत.

८ ) ७३ च्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे ? (Asst. मुख्य २०१७)

  1. १८ वर्ष
  2. २५ वर्ष
  3. २१ वर्ष
  4. ३० वर्ष

९ ) भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या किती कार्याची/ जबाबदाऱ्यांची यादी देण्यात आली आहे?(Asst. मुख्य २०१७)

  1. २९
  2. १८
  3. २५
  4. २२

१० ) ७३ व्या घटना दुरुस्ती बाबत अयोग्य कथने ओळखा (Asst. मुख्य २०१७)

अ) या दुरुस्तीद्वारे पंचायत राज ला संवैधानिक दर्जा देण्यात आला.
ब) या दुरुस्तीद्वारे पंचायत राज साठी राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली.
क) या घटना दुरुस्तीने काही राज्यांना किंवा विशिष्ट प्रदेशांना सुट दिली आहे.
ड) या दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य हे राजस्थान ठरले.

  1. अ, ब
  2. ब, क
  3. क, ड
  4. अ, क

११ ) नगरपालिकांनी काळजी घेतली पाहिजे अशा समाजातील……… .प्रकारच्या दुर्बल घटकांचा विशेष उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे. (Asst. मुख्य २०१७)

  1. दोन
  2. तीन
  3. सहा
  4. सात

१२ ) नगरपालिकेशी संबंधित तरतूदींचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यात करण्यात आली आहे ? (Asst. मुख्य २०१७)

  1. ७२ वी
  2. ७३ वी
  3. ७४ वी
  4. ७६ वी

१३) ७४ च्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला? (Asst. मुख्य २०१७)

  1. ९ वी
  2. १० वी
  3. ११ वी
  4. १२ वी

१४ ) योग्य कथन/कथने ओळखा. (Asst. मुख्य २०१७)

अ) मिझोराम, मेघालय व नागालँड या राज्यांना ७३ वी घटना दुरुस्ती लागू होत नाही.
ब) ७३ वी घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य मध्य प्रदेश आहे.

  1. फक्त अ
  2. फक्त ब
  3. अ आणि ब दोन्हीही
  4. अ आणि ब दोन्हीही नाही

१५) भारतीय राज्यघटनेच्या कलम क्र. २४३ पी प्रमाणे महानगर क्षेत्र (मेट्रोपॉलिटन एरिया) म्हणजे………किंवा त्याहून अधिक लोकसंख्या आणि किमान लाख ……….नगरपालिका किंवा पंचायती किंवा इतर संलग्न भाग असलेले क्षेत्र.(ASO मुख्य २०१८)

१) १६, १
२) १०, २
३) १२, ३
४) ९,२

१६ ) भारतामध्ये ७४ व्या घटना दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी केव्हा झाली ? (ASO मुख्य २०१८)

  1. २० एप्रिल १९९३
  2. १ जून १९९३
  3. २४ एप्रिल १९९३
  4. वरीलपैकी नाही

१७) योग्य कथन / कथने ओळखा. (ASO मुख्य २०१८)

अ) ७३ व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील प्रथम राज्य ठरले.
ब) ७३ व्या घटना दुरुस्तीमधून मिझोराम, मेघालय आणि नागालँडला सूट देण्यात आली.
पर्यायी उत्तरे

  1. फक्त अ
  2. फक्त ब
  3. अ आणि ब दोन्ही
  4. अ किंवा ब दोन्ही नाही

१८ ) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था (पंचायती) खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आर्थिक विकासाच्या आणि सामाजिक न्यायाच्या योजना राबवू शकत नाहीत ? (ASO मुख्य २०१८)

अ) मत्स्यव्यवसाय
ब) जळण आणि चारा
क) पिण्याचे पाणी
ड) खादी
पर्यायी उत्तरे

  1. फक्त अ आणि ब
  2. वरीलपैकी कोणी नाही
  3. फक्त क
  4. फक्त ड

१९ ) योग्य कथन / कथने ओळखा : (ASO मुख्य २०१८)

राज्य विधिमंडळ फायदा करून खालील व्यक्तींना शहरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये प्रतिनिधीत्व देऊ शकते.
अ) नगर प्रशासनातील तज्ञ व्यक्ती.
ब) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील लोकमारा सदस्य राज्यसभा
क) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सदस्य
ड) आंग्ल भारतीय समूहातील व्यक्ती
पर्यायी उत्तरे

  1. फक्त अ, ब, ड
  2. फक्त अ, क, ड
  3. फक्त ब, क, ड
  4. फक्त अ, ब, क

२० )खालील विधाने विचारात घ्या : (Asst मुख्य २०१९)

अ) ७३ व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र है भारतातील प्रथम राज्य ठरले.
ब) ७३ व्या घटनादुरुस्ती मधूल मिझोरम, मेघालय आणि नागालॅण्डला सूट देण्यता आली.
वरीलपैकी कोणते/ ती विधाने बरोबर आहे / त ?
पर्यायी उत्तरे

  1. फक्त अ
  2. फक्त ब
  3. अ आणि ब
  4. अ आणि ब दोन्हीही नाही

२१ )खालील विधाने विचारात घ्या : (Asst मुख्य २०१९)

अ) पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे यांचे सदस्य थेट निवडून आलेले असतात.
ब) पंचायत पातळीवरील निवडणूक लढण्यासाठी कमीत कमी वय १८ वर्षे पूर्ण असले पाहिजे
क) पंचायत राज्य संस्थांच्या निवडणूका राज्य आयोगाच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या जातात.
ड) पंचायतींचा वित्तीय आढावा घेण्यासाठी राज्य शासन वित्त आयोगाची स्थापना करते.
वरीलपैकी कोणते/ ती विधाने बरोबर आहे/ त?
पर्यायी उत्तरे

  1. अ आणि ब
  2. अ, क आणि ड
  3. अ आणि ड

२२) भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये कोणत्या विषयाचा समावेश होतो ?(Asst.मुख्य २०१९ )
अ)रस्ते आणि पूल
ब)अग्निशेमन सेवा
क)झोपडपट्टी पुनर्विकास
ड)टपाल सेवा
पर्याय उत्तर

  1. फक्त अ,ब आणि ड
  2. फक्त ब,क आणि ड
  3. फक्त अ,क आणि ड
  4. फक्त अ,ब आणि क

२३) 73 आणि 74 व्या घटना दुरुस्ती कायद्याची कलम 243 Dचे ठळक वैशिष्ट्य———– आहे? (ASO मुख्य 2022)

1)एकूण जागांच्या एक तृतीआंश जागा महिलांसाठी राखीव असतील.

2) एकूण जागांच्या एक व्दितीआंश जागा महिलांसाठी राखीव असतील.

3) एकूण जागांच्या एक चतुर्थांश जागा महिलांसाठी राखीव असतील.

4) एकूण जागांच्या दोन तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील.

 

२४) 74 व्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या बाबी आवश्यक हित्या? (ASO मुख्य 2022)

अ) जिल्हा नियोजन समितीची स्थापना

ब) तालुका समितीची स्थापना

क) शिक्षणाचा हक्क

ड) महानगर समितीची स्थापना

पर्यायी उत्तरे:

1) (अ) आणि (ड)         2) फक्त (अ)

3) (अ) आणि (ब)           4) यापैकी सर्व

उत्तर

१)४ २)२ ३)३ ४)३ ५)१ ६)२ ७)३ ८)३ ९)२ १०)#
११)१ १२)३ १३)३ १४)३ १५)२ १६)२ १७)२ १८)२ १९)४ २०)२
२१ )२ २२)४                
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch