नरसिंहन समिती,अग्रणी बँक योजना

नरसिंहन समिती I,II (स्थापना,अध्यक्ष,सदस्य,अहवाल,शिफारशी, इतर महत्वपूर्ण माहिती )अग्रणी बँक योजना(स्थापना ,उद्देश ,कार्य ,अग्रणी बँकेत सुधारणा )

बँकींग क्षेत्र सुधारणा समिती

बँक क्षेत्रातील सुधारणासाठी समिती ,अग्रणी योजना
बँकींग क्षेत्र सुधारणा समिती

M.नरसिंहन समिती I

समितीचे नाव =वित्तीय क्षेत्र सुधारणाविषयक समिती
स्थापना =१४ ऑगस्ट १९९९
अध्यक्ष =M.नरसिंहन(RBI १३ वे गव्हर्नर)
सदस्य संख्या=९
अहवाल सादर=16 नोव्हेंबर १९९१

शिफारसी

  • CRR (रोख राखीव प्रमाण) चे प्रमाण तत्कालिन १५ % वरून ३ ते ५ % कमी कराने
  • SLR (वैधानिक रोखता प्रमाण) चे प्रमाण तत्कालिन ३८.५ % वरून २५ % पर्यंत कमी कराने
  • अग्रक्रम क्षेत्र कर्जपुरवठ्याचे लक्ष्य ४० %वरून १०% पर्यंत कमी कराने (पण सरकारने ही शिफारस स्विकारलेली नाही.)
  • बँकांना स्वतःचे व्याजदर ठरविण्याची अधिकारदेणे .
  • देशात चतुस्तरीय बँकिंग संरचना निर्माण करावी (म्हणजे ८ ते १० राष्ट्रीय स्तरावरील बँका असाव्या, तिसऱ्या स्तर फक्त स्थानिक बँका आणि चौथ्या स्तर फक्त ग्रामीण बँका असाव्या. )
  • बँकांच्या राष्ट्रीयाकरणाची प्रक्रिया थांबविण्यात यावी.
  • शाखा परवाना पद्धती बंद करणे.
  • भांडवल बाजाराचे उदारीकरण घडवून आणावे .
  • खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन करण्याची संमती द्यावी. आणि परकीय बँकांना भारतात येण्यासाठी उदार धोरण राबवावे.
  • ‘मालमत्ता पुनर्रचना निधी’ ची स्थापना करण्यात यावी. हा निधी बँकांची थकित व बुडित कर्जे विकत घेऊन त्यांची पुनर्रचना करेल.
  • कर्ज वसुलीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी विशेष ‘कर्ज वसुली न्यायाधीकरणे’ स्थापन करणे.
  • SLR ला बॅंकिंगक्षेत्रावरील कर असे म्हणतात

M .नरसिंहन समिती II

नाव= बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती
स्थापना =१९९७ मध्ये भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने
अध्यक्ष =M. नरसिंहन
अहवाल सादर =एप्रिल १९९८

उद्देश
आतापर्यंत झालेल्या बँकिंग क्षेत्र सुधारणांचे परीक्षण करून भारताच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी व आंतरराष्ट्रीयदृष्ट्या स्पर्धात्मक बनविण्यासाठी वित्तीय क्षेत्र सुधारणेचा एक निश्चित कार्यक्रम तयार करण्यासाठी

शिफारसी

  • आजारी बँकांना अर्थ सक्षम बनवणे शक्य ण झाल्यास त्यांना सक्षम बँकेत विलीन करणाऱ्याएवजी बाद करावे
  • अधिक मजबूत बँक व्यवस्था निर्माण करणे.
  • नॅरो बँकिंग चा प्रयोग करावा
  • बँकांना अधिक बळकटी देण्यासाठी त्यांच्यावरील भांडवल पर्याप्त निकष वाढवावे
  • लघू उद्योगांच्या गरजांसाठी अनेक लहान किवा स्थानिक बँकांच्या स्थापनेवर भर द्यावा.

अग्रणी बँक योजना

स्थापना =१९६९ ला (RBI १९६९ ला हि योजना स्वीकारली ३३८ जिल्ह्यात सुरु केले )
शिफारश =F.K.F नरीमन यांच्या बँक व्यावसायिकांची समितीच्या शिफारशीवरून

योजना
या योजनेत एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला आहे आणि त्या बँकेला त्या जिल्हेची अग्रणी बँक म्हणून दर्जा दिला आहे

कार्य

  • जिल्हाचे सर्वेक्षण करून जिल्हाचे पतगरज ठरवणे
  • बँक शाखा सुरु करण्यासाठी शोध घेणे
  • जिल्हा सलामत समित्या स्थापन करणे
  • भारत सरकारच्या पुनर्रचनेअतर्गत १९८९ ला अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोन लागू करण्यात आला

महाराष्ट्र
महाराष्ट्रात अग्रणी बँकाची नियत्रक म्हणून SBI कार्य करेल

अग्रणी बँकेत सुधारणेसाठी बद्दल

  • उषा थोरात समिती २००९ ला कशासाठी =परीक्षणासाठी
  • RBI ने २०१३ पासून अग्रणी बँक योजना शहरी भागासाठी लागू केले
  • RBI ने २०१८ पासून अग्रणी बँकची पुनर्चनासाठी एक कार्यकारी संचालकाची समिती सथापन केली
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch