जिवाणू मुळे होणारे रोग जाणून घ्या माहिती

नमस्ते मित्रानो आज जिवाणू मुळे होणारे रोग या लेख मध्ये  क्षयरोग,कृष्टरोग,Typhoid ,प्लेग ,घटसर्प ,धनुर्वात ,पटकी ,डांग्या खोकला ,न्युमोनिया यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया 

रोग अनेक प्रकारचे रोग आहे त्यामध्ये जीवानुपासून होणाऱ्या रोगाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपणास सविस्तर हा लेख वाचावेलागेल यामध्ये जीवनुपासुंचे होणाऱ्या रोगाचे माहिती (लक्षणे औषधे,विशेष काय ,लस,शोध कोणी लावली आणि इतरही माहिती )दिली आहे तर चला 

जीवाणूजन्य रोगबद्दल जीवाणूचा शोध लिव्हेन हॉक लावला १६७५ मध्ये लावला जीवाणूचा आकार १ ते ४ micron असते जीवाणू म्हणजे सूक्ष्मजीव होय  ,साधारणत एकपेशी असतात.ते काय करतात प्राण्यामध्ये रोग निर्माण करतात माती, आम्ले, उष्ण पाण्याचे झरे, बर्फ, किरणोत्सारी अपशिष्टे, पाणी व खोलवर जमीन आढळतात

जीवाणूजन्य आकर गोलाकार (Cocci ) ,दंडगोललाकर (Bacillus ),स्वल्पविरामकृती (Comma shape ),सर्पिल (Spiral)

विशेष काही जीवाणू परजीवी तर काही परपोशी असतात ,विषाणूपेक्षा आकाराने मोठे असता ,काही फायदेशीर आणि काही घातक जीवाणू असतात.

फायदेशीर कसे

  1. रायझोबियम बद्दल शिवाधारी वनस्पतीच्या मूळात असणारे जीवाणू याचा वापर जैविक खतमध्ये केला जातो हे हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. वनस्पती उपयोगासाठी होतो 
  2. मातीतील अॅझेटोबॅक्टर = हवेतील नायट्रोजनचे स्वतंत्रपणे स्थिरीकरण.
  3.  लॅक्टॉबेसिलस = दह्यात असतात.

घातक कसे

  1. स्टॅफिलोकोक्स जीवाणू = खाद्यपदार्थावर वाढताना एन्टोरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करते. याचा परिणाम त्यामुळे उलट्या व जुलाब होतात
  2. क्लोस्ट्रीडीयम = हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थाची वापराची मूदत संपली की त्यात वाढतात

क्षयरोग लक्षणे

क्षयरोग प्रमुख लक्षणे ,खोकला आणि थुंकीतून रक्त येणे ,संध्याकाळी ताप ,वजन कमी होणे इत्यादी  क्षयरोग याला वेगवेगळे नाव आहे क्षयरोग ,TB (tuberculosis )किवा कॉकचा ( रॉबर्ट कॉकणे शोध लावला म्हणून कॉकचा नावाने परिचित) TB चा शोध रॉबर्ट कॉक १८८२ लावला Bacteria= Microbacterium Tuberculosis 

  • विशेष = सर्वाधिक संसर्गजन्य रोग आहे.
  • प्रसार = हवेतून थुंकी द्वारे द्रव बिंदु
  • प्रादुर्भाव =फुप्फुसला (विशेष =नखे व केस सोडून सर्व अवयवाना होऊ शकतो.)
  • लस = BCG (Bacillus Calmette Guerine)
  • उपचार केंद्रे =DOTS ( Direct Observation Treatment Short term ) WHO तर्फे
  • औषधे = स्ट्रेप्टोमायसिन
  • नविन औषद = विलिसिन
  • जीवाणू किती दिवस जिवंत असतो तर आठवडे ,महिने ,वर्षभर जिवंत राहतात

जागतिक क्षयरोग दिन

जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च आहे  हाच दिवस का? कारण काय याच दिवशी रॉबर्ट कॉक यांनी TB चा शोध लावला २४ मार्च १८८२ तसेच १९९७ पासून भारतामध्ये RNTSP= Revised National TB Control Programme
क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो

कृष्टरोग

कुष्ठरोग परिचित नावे कुष्ठरोग ,Leprosy किवा Hanson’s Disease ,Bacteria  Micobaeterium Leprosy जीवाणूचा शोध डॉ. जेरार्ड हेनिक आर्मर हॅन्सन’ यांनी लावला म्हणून या रोगास Hanson’s Diseas असेही म्हणतात.हा नॉर्वे देशाचा आहे उपचार पद्धतीMDT (Multi Drug Therapy) यात DDS आणि इतर रसायने एकत्रित असतात.

कुष्ठरोग विशेष हा रोग संसर्गजन्य रोगापैकी सर्वात कमी संसर्गजन्य आहे.(भारतात सर्वाधिक कुष्ठरोगी आहेत.) भारतात 1983 पासून या रोगाच्या निर्मूलनासाठी कार्यक्रम सुरु आहे.

  • कुष्ठरोग लक्षणे त्वचेवर पट्टे ,गाठी येतात ,शेवटी हातापायांची बोटे झडतात.
  • प्रादुर्भाव = ‘PNS’ (परिघीय चेतासंस्थेवर)
  • औषध =डॅप्सोन
  • आकार =दंडाकृती
  • लस = BCG

Typhoid 

अंगज्वर किवा विषमज्वर ह्या हि नावाने परिचित याचा शोध  इबर्त शास्त्रज्ञ लावला जीवाणू सालमोनिया टायफि (Solmonella Typhi) प्रसार रुग्णांच्या उलटी व मलाद्वारे (पाण्यामार्फत , दूषित अन्नामार्फत ,घरमासी )

लक्षणे भूक मंदावणे ,डोकेदुखी ,अगदुखी ,मळमळ ,अतिसार ,१०४०F पर्यंत ताप चढतो ,दुपारी ताप जास्त असतो.

  • लस =TAB (Typhoid Type A and B) ,टायफिन
  • औषध = क्लोरोमायसेटीन
  • प्रादुर्भाव = आतडे व प्लीहा.

प्लेग रोग 

प्लेगचा जीवाणू Yersinia Pestis/ Bacillus Pestis उंदरावर वाढणाऱ्या पिसवांच्या शरीरात प्लेगचा जीवाणू राहतो. यासाठी औषद सल्फाड्रग्स(शोध गेरहार्ड डोमक )/strepsomaysinहा रोग झाल्यावर परिणाम फुप्फुस ,काखा ,जाघा या ठिकाणी होतो 

प्लेग तीन प्रकार

  1. ल्युबनिक प्लेग = लामिका ग्रंथीचा दाह
  2. न्युमोनिक प्लेग = फुफ्फुसाचा दाह
  3. सेप्टीसेमीक प्लेग = रक्तात प्रवेश.

पटकीरोग -Cholera

पटकी रोग BacteriaVibrio Cholera (विब्रीओकॉलरी) आकार आकार स्वल्पविरामकृती लक्षणे  तीर्व स्वरूपाच्या उलट्या आणि जुलाब प्रसार पाण्यामार्फत आणि अन्न प्रादुर्भाव अन्ननलिकेच्या पचनपत्यास मोठी आतडे लस हाफकिनची (हि लसचा शोध लुई पश्वर्चारने लावला )

इतर पटकी रोग बद्दल

  1. पाण्यातील जीवाणूचा नाश करण्यासाठी पोटॅशिअम परमॅनेटचा उपयोग करतात
  2. शिगेल्ला बॅसीलस हा जीवाणू हागवणीस कारणीभूत असतो.उपचार= ORS (Oral Rehydration Solution) ORS मध्ये कोणते घटक = सोडीयम क्लोराइड, ग्लुकोज, पोटॅशिअम क्लोराइड, ट्रायसोडीअम सायट्रेट
  3. या रोगाची लस घेतल्याशिवाय आंतर्ष्ट्रीय प्रवासाचा परवाना मिळत नाही

धनुर्वात -Tetanus

या रोगामुळे शरीर धनुशासारखे होहून अवयाची हालचाल थांबते यालाच lock jaw असेही मनतात (कारण सर्वप्रथम जबड्याची हालचाल बंड होते)

  • जीवाणू =Clostridum Tetani (क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनी)
  • प्रसार =फक्त शरीरावरील ओल्या जखमेतूनच प्रवेश करतो.
  • लस =DPT (Diphtheria. Pertusis and Tetanus )
  • प्रादुर्भाव= मध्यवर्ती मज्जासंस्थेवर होतो.
  • लक्षण = दातखिळी बसणे, ताप, तीव्र वेदना.

घटसर्प -Diphtheria

जीवाणू Cornebacterium Diphtheriae किवा क्लेब्ल लोफलर प्रादुर्भाव श्वासनलिकेत प्रादुर्भाव ( श्वास कोंडून मृत्यू ताप येवून श्वाशोश्वास अधथला निर्माण होतो ) लस DPT (त्रिगूणीलस) ह्या लशीचा शोध बेहरींग शास्रीय लावला प्रसार = हवेमार्फत (द्रवबिंदूच्या रूपाने) विशेष  ५ वर्षाखालील मुलांना हा रोग होतो.

डांग्या खोकला -Pertusis 

लहान मुलांना धोकादायक नसलेला रोग.(मुख्य लहानमुलांमध्ये आढळतो )

  • जीवाणू =Haemophilus Pertusis.
  • प्रादुर्भाव = श्वसननलिका
  • लस= DPT (त्रिगूणीलस)
  • लक्षणे = खोकला आणि रात्री वाढते प्रमाण

न्युमोनिया-Pneumonia

डबल न्युमोनिया म्हणजे दोन्ही फुफ्फुसांना दाह होय.

  • जीवाणू =Diplococcus Pneumoniac उदा. SARS हा न्यूमोनिया=विषाणुमुळे ही होतो.
  • औषध =पेनिसिलीन
  • प्रादुर्भाव = फुफ्फुसांना
  • लस = उपलब्ध नाही.

FAQ

  1. काय?जिवाणू मुळे होणारे रोग कोणते ?

    उत्तर =TB ,कृष्टरोग ,निमोनिया ,डांग्या खोकला ,प्लेग ,पटकी ,घटसर्प ,धनुर्वात

  2. मायक्रोबायोलॉजी (Microbiology) म्हणजे काय?

    उत्तर =सूक्ष्मजीवशास्त्र

  3. दही मध्ये कोणते सूक्ष्मजीव आढळतात

    उत्तर = लॅक्टोबॅसिलाय जीवाणू

  4. क्षयरोगचा शोध कोणी लावला ?

    उत्तर=रॉबर्ट कॉकने लावला

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch