जागतिक महिला दिन माहिती मराठी मध्ये-Jagtik Mahila Din

नमस्ते मित्रानो आज जागतिक महिला दिन 8 मार्चच का?, महिलादिन साजर करण्याची पद्धत, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन थीम ,उद्देश, इतिहास,क्लारा झेटकिन कोण 

जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो  जागतिक महिला दिन ८ मार्चला १९७५ पासून दरवर्षी साजरा केला जातो प्रथमच साजरा केला अमेरिकेच्या समाजवादी पक्षाच्या म्हणण्यावरून २८ फेब्रूवारी १९०९ साजरा केला यानंतर १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडला आंतरराष्ट्रीय महिला दिन १९११ पहिल्यांदा देशात साजरा केला तो ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये या देशात पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

२०२३ ची थीम, “डिजिटॉल: लैंगिक समानतेसाठी नाविन्य आणि तंत्रज्ञान,” [लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि महिला आणि मुलींच्या आरोग्य आणि विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित करते.]
This year’s theme, “DigitALL: Innovation and technology for gender equality,”

आंतरराष्ट्रीय महिला वर्ष प्रथम साजरा केला २८ फेब्रूवारी १९०९ अमेरिकाच्या न्ययार्क शहरात या मागचे  उद्देश राजकीय ,सामाजिक,आर्थिक आणि सास्कृतिक विकासात महिलांचा सहभाग वाढवा मुख्य उद्देश समाजात महिलांचा आदर आणि त्यांचे हक्क वाढवणे हा आहे .

भारतात मुंबई येथे १९४३  पहिला 8 मार्च दिवस साजरा केला  आणि १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढला होतो  त्यानंतर स्रीयांचे समस्या लोकांपुढे येत गेल्या आणि त्या मध्ये बदल घडू लागले  

आंतरराष्ट्रीय महिला वर्षची थीम २०२२ gender equality today for a sustainable tomorrow(शाश्वत उद्यासाठी लैंगिक समानता’ पहिली थीम काय होती ‘सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर हि फिल थीम होती 

८ मार्चच निवडण्या मागचे कारण ?

आंतरराष्ट्रीय महिला दिन फक्त ८ मार्चलाच का साजरा केला जातो? वास्तविक, क्लारा झेटकिनने महिला दिन साजरा करण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही.१९१७ च्या युद्धादरम्यान रशियाच्या महिलांनी ‘ब्रेड अँड पीस’ (म्हणजे अन्न आणि शांतता) मागणी केली होती. महिलांच्या संपामुळे सम्राट निकोलस यांना माघारी घ्यावी लागले आणि शेवटी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला.त्यावेळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरले जात होते. महिलांनी हा संप सुरू केला ती तारीख 23 फेब्रुवारी होती. हा दिवस ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये 8 मार्च होता आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जाऊ लागला.

पहिली जागतिक महिला परिषद कुठे झाली

पहिली जागतिक महिला परिषद १९०७  स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे. अशी घोषणा केली.

८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा`जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत ठराव क्लाराने मांडला आणि तो पास झाला.

क्लारा झेटकिन कोण ?

क्लारा झेटकिन यांनी १९१० मध्ये कोपनहेगन येथे कार्यरत महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सुचवले. त्यावेळी १७ देशांतील १०० महिला या परिषदेत उपस्थित होत्या. या सूचनेला सर्वांनी पाठिंबा दिला

जगभरात महिलादिन साजर करण्याची पद्धत

  • अनेक देशांमध्ये या दिवशी राष्ट्रीय सुट्टी घोषित केली जाते.
  • रशिया आणि इतर अनेक देशांमध्ये या दिवशी फुलांच्या किमतीत लक्षणीय वाढ होते.या दरम्यान स्त्री-पुरुष एकमेकांना फुले देतात.
  • चीनमध्ये बहुतांश कार्यालयांमध्ये महिलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली जाते.
  • अमेरिकेत मार्च महिना ‘स्त्रियांचा इतिहास महिना’ म्हणून साजरा केला जातो.

Womens Day Quotes in Marathi

पुरुष दिन कधी साजरा केला जातो

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 19 नोव्हेंबर असतो१९९० पासून हा दिवस साजरा केला जात आहे पण अजूनही त्याला संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेली नाही. पुरुष दिन 60 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो.
कोणत्या उद्देशसाजरा करत असतात =पुरुषांचे आरोग्य, लैंगिक संबंध वाढवणे, लैंगिक समानता वाढवणे आणि त्यांच्यात सकारात्मकता वाढवणे हे उद्देश असतात

प्रेरणादायी कोट्स

आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त जगभरातल्या विविध देशांमधील कर्तृत्ववानमहिलांचे काही प्रेरणादायी वक्तव्यं गुगलने डूडलच्या माध्यमातून दिली आहेत.

या महिलांनी स्थापत्यशास्त्र, क्रीडा, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांमध्येफक्त पुरुषांशी बरोबरीच केली आहे काही ठिकाणी त्यांच्याही पुढे गेले आहे

महिला आहात म्हणून स्वतःला कमकुवत समजू नका – भारतीय बॉक्सर मेरी

कोम मेरी कोम यांनी भारतासाठी अनेक जागतिक स्पर्धांमध्ये मेडल कमावले आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. कुटुंब आणि स्पर्धा यांच्यात संतुलन त्यांनी कसं राखलं हे दाखवणारा, तसंच त्यांच्या कर्तृत्वाची गाथा सांगणारा एक चित्रपटही बनला आहे

आपण खूप अनमोल आहोत, इतके की कुठल्याही नैराश्याने कधीच मनात घर करता कामा नये – NL बेनो झफीन

बेनो झफिन या भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी आहेत. भारतीय परराष्ट्र सेवेत 100 टक्के अंधत्व असलेल्या त्या पहिल्याच अधिकारी आहेत.

ज्या व्यक्तीने कमीत कमी एक स्वप्न पाहिलंय, त्याला जीवनात खंबीर राहण्याचं कारण आहे – सानमाओ

सानमाओ या तैवानी लेखिका होत्या. युरोपातील अनेक पुस्तकं त्यांनी अनुवादित केली तसेच त्यांच्या साहित्याचा अभ्यासही युरोपात केला जातो.

FAQ

महिला दिन का साजरा करायचा?

उत्तर =८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ

आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा करतात

उत्तर = ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करतात

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch