कौटुंबिक हिंसाचार MCQ-Domestic Violence Act

PSI main या परीक्षेत आयोगाचे जालेले पेपरचे प्रश्न कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ प्रश्न या topik वर आलेले प्रश्न एकत्र दिलेले आहे कौटुंबिक हिंसाचार MCQ यावरचे प्रश्नाचे विश्लेषण केले आहे अभ्यास करण्यास योग्य दिशा मिळावा अचूक अभ्यास होईल .

मित्रानो या घटक वर आयोगाने २५ पेक्षा अधिक प्रश्न विचारलेले आहे. चाल तर जाणून घेऊया कसे प्रश्न आहे. 

शेवटी : प्रश्नचे उत्तर दिले आहे.

प्र. १) कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम २००५ प्रमाणे न्यायालयाकडून पिडीत व्यक्तीला कोणते आदेश मिळविता येतील ? ( PSI मुख्य २०१२ )

A) निवासी आदेश

B) आर्थिक सहाय्य

C) ताबा देण्यासंबंधीचे आदेश

D) वरील सर्व

प्र. २) भारतीय राज्यघटनेने महिलांना बहाल केलेल्या अधिकारांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे-करिता व कुटुंबातील हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी संसदेने कोणता कायदा पारित केला ? ( PSI मुख्य २०१२ )

A) हिंदू विवाह अधिनियम १९५५

B) विशिष्ट विवाह अधिनियम १९५४

C) कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५

D) हुंडाबंदी अधिनियम १९६१

प्र. ३) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याखाली दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अंतिम निर्णयावर —— कडे दाद मागता येते. ( PSI मुख्य २०१२ )

A) दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर

B) विशेष न्यायालय

C) सत्र न्यायालय

D) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर

प्र. ४) संरक्षण अधिकारी (प्रोटेक्शन ओफिसर ) ही संज्ञा कोणत्या कायद्यात उल्लेखित आहे ? ( PSI मुख्य २०१२ )

A) मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३

B) कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५

C) नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५

D) यापैकी कोणत्याच नाही

प्र. ५) कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत नियम कोणी तयार केलेत ? ( PSI मुख्य २००१२ )

A) राज्य सरकार

B) केंद्र सरकार

C) उच्च न्यायालय

D) वरीलपैकी कुणीही नाही

प्र. ६) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामधील फॉर्म नंबर ५ ————– करिता वापरतात. ( PSI मुख्य २०१२ )

A) ओफिडेव्हिट / लेखी जबानी

B) सुरक्षा योजना

C) सेवा पुरविणाऱ्या संस्थांची नोंदणी

D) हजर राहणेस सूचना

प्र. ७) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम १३ खाली दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची नोटीस विरुद्ध पक्षावर दिवसात बदलावी लागेल. ( PSI मुख्य २०१२ )

A) २

B) ४

C) ३

D) ५

प्र. ८) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ च्या कलम १२ नुसार मध्ये दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येते. ( PSI मुख्य २०१२ )

A) फॉर्म ३

B) फॉर्म १

C) फॉर्म २

D) फॉर्म ४


प्र. ९) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? ( PSI मुख्य २०१२ )

अ) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा फौजदारी दिलासा देणाऱ्या दाव्यांशी संबंधित आहे.
ब) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा दिवाणी देणाऱ्या दाव्यांशी संबंधित आहे.

A) फक्त अ

B) फक्त ब

C) दोन्ही ही अ व ब

D) वरीलपैकी कोणतेही नाही

 

प्र. १०) कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ मध्ये कोणत्या कलमात “कौटुंबिक हिंसाचाराची” व्याख्या दिली आहे. ( PSI मुख्य २०१२ )

A) कलम एक

B) कलम दोन

C) कलम तीन

D) कलम चार


प्र. ११) श्रीमती ‘अ ब क’ चांगुलपणाने घरगुती जुलुमाचे कार्य घडल्याची माहिती देते. चौकशीअंती घरगुती जुलूम झाला नसल्याचे स्पष्ट होते. घरगुती जुलुमांनुसार रक्षण करण्याच्या कायद्याच्या तरतुदीनुसार : ( PSI मुख्य २०१४ )

A) श्रीमती ‘अ ब क’ वर कोणतीही दिवाणी अथवा फौजदारी कारवाई करता येईल.

B) श्रीमती ‘अ ब क’ वर फौजदारी नाही पण कारवाई करता येईल.

C) श्रीमती ‘अ ब क’ वर फौजदारी व दिवाणी दोन्ही कारवाया करता येईल.

D) श्रीमती ‘अ ब क’ वर केवळ फौजदारी कारवाई करता येईल.


प्र. १२) कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत इन कॅमेऱ्यात सुनावणी केव्हा घेतली जाते ? ( PSI मुख्य २०१४ )

A) परिस्थिती बघता न्यायदंडाधिकाऱ्याला वाटेल तेव्हा

B) जर दोन्ही पक्षांपैकी एकाने अशी मागणी केली तेव्हा

C) A आणि B दोन्ही

D) इन-कॅमेरा सुनावणीची अधिनियमामध्ये तरतूद नाही.


प्र. १३) भारतीय संविधानाच्या कोण-कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेल्या अधिकाराअंतर्गत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ ची अधिनियमिती करण्यात आली ? ( PSI मुख्य २०१४ )

A) १२, १५, १७

B) १४, १५, २१

C) १४, १९, २५

D) २५, २८, २९


प्र. १४) प्रतिपक्षाने संरक्षण आदेशाचा भंग केल्यास महिलांचा घरगुती जुलूमापासून रक्षण करण्यासंबंधीच्या कायद्यानुसार होणारी शिक्षा : ( PSI मुख्य २०१४ )

A) कैद कमीतकमी २ वर्ष

B) कैद १ वर्षापर्यंत

C) १ वर्षापर्यंत कैद किंवा रुपये २५,००० पर्यंत दंड

D) १ वर्षापर्यंत कैद किंवा रुपये २५,००० पर्यंत दंड किंवा दोन्ही

प्र.१५) ‘आर्थिक लाभ’ म्हणजे : ( PSI मुख्य २०१४ )

अ) नुकसान भरपाई

ब) दैनंदिन खर्चाच्या पूर्ततेसाठी तसेच पिडीत महिलेला झालेल्या नुकसान भरपाई पोटी देण्यात येते ती आर्थिक नुकसान भरपाई

क) कौटुंबिक हिंसाचार दूर करण्यासाठी दिलेली नुकसान भरपाई

ड) दावा निकालात काढताना दिलेली अंतिम नुकसान भरपाई

A) अ, ब

B) ब

C) ड

D) क


प्र. १६) कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अनुसार राज्य सरकारकडे नोंदणी केल्यानंतर खालीलपैकी कोण ‘सेवा देणारा’ म्हणून कार्य करू शकतो ? ( PSI मुख्य २०१४ )

A) सोसायटी नोंदणी अधिनियम १८६० अन्वये नोंद झालेली ऐच्छिक संस्था

B) कंपनी अधिनियम १९५६ अन्वये नोंद झालेली कंपनी

C) A आणि B दोन्ही

D) वरीलपैकी कोणतेही नाही

प्र. १७) कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केले आहे ?
( PSI मुख्य २०१४ )

A) व्हिएन्ना अकॉर्ड १९९४

B) रियो डिक्लेरेशन

C) रामसेर कनव्हेंशन

D) वरीलपैकी काहीच नाही

प्र. १८) कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५ अंतर्गत खालीलपैकी कोणता हुकूम फौजदारी न्यायाधीश देऊ शकत नाही ? ( PSI मुख्य २०१५ )

अ) संरक्षण हुकूम

ब) परिविक्षा हुकूम

क) पैशाविषयी मदत हुकूम

ड) ताबा हुकूम

इ) निवास हुकूम

फ) नुकसान भरपाई हुकूम

पर्यायी उत्तरे :

A) अ व ड

B) इ व फ

C) ब

D) क व फ


प्र. १९) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम कलम २ (एच्) नुसार ‘हुंडा’ म्हणजे ‘हुंडा’ प्रतिबंधक कायदा’ कलम २ मध्ये सांगितला आहे तो. ( PSI मुख्य २०१६ )

A) १९६२

B) १९६१

C)१९६३

D) १९६०


प्र. २०) कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये निर्विवादपणे मान्य केले आहे. ( PSI मुख्य २०१६ )

A) व्हिएन्ना अकॉर्ड १९९४

B) द बेजिंग डिक्लेरशन

C) द प्लॅटफॉर्म फॉर अॅक्शन

D) वरील सर्व


प्र. २१) पुढीलपैकी योग्य विधान निवडा ( PSI मुख्य २०१६ )

अ) कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्याअंतर्गत “कौटुंबिक नातेसंबंध” च्या अर्थामध्ये दत्तक मुलाचा समावेश नाही.

ब) वरील कायद्याप्रमाणे “कौटुंबिक हिंसाचार” या संज्ञेच्या व्याख्येमध्ये “भावनिक आणि आर्थिक” अत्याचाराचा समावेश होतो.


पर्यायी उत्तरे :

A) विधान अ चुकीचे असून ब बोरोबर आहे
B) विधान अ बरोबर असून ब चुकीचे आहे
C) दोन्ही विधाने बरोबर आहेत
D) दोन्ही विधाने चूक आहेत

प्र. २२) कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाचा खालील कलमात वैद्यकीय सुविधा मागता येतात ( PSI मुख्य २०१७ )

A) ६

B) ७

C) ८

D) ९


प्र. २३) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियमानुसार दोन्ही पक्षांचे ऐकून, कौटुंबिक हिंसा झाली असल्याचे न्यायाधीशांना समाधान झाल्यास ते पिडित व्यक्तीच्या साठी व जाब देणाऱ्या कोणतीही कौटुंबिक हिंसा करण्याचे प्रतिबंधाचे आदेश देऊ शकतात. ( PSI मुख्य २०१७ )

A) संरक्षण

B) प्रतिबंध

C) सहाय्य

D) सूट

प्र. २४) स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचारापासून कायदा, २००५ मधील कलम अन्वये मॅजिस्ट्रेटच्या स्वेच्छेने किंवा संबंधित पक्षकाराने तशी मागणी केल्यास सुनावणी कॅमेऱ्यात करणे बाबत तरतूद आहे. ( PSI मुख्य २०१७ )

A) १७

B) १६

C) १४

D) १५


प्र. २५) कौतुबिक हिंसाचारा पासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५ खाली “कौटुंबिक हिंसेच्या” व्याख्येत खालीलपैकी कशाचा समावेश होतो ? ( PSI मुख्य २०१७ )

अ) शारीरिक छळ ब) लैंगिक छळ

क) शाब्दिक व भावनिक छळ

ड) आर्थिक छळ

पर्यायी उत्तरे :

A) वरीलपैकी कोणतेही नाही

B) वरीलपैकी सर्व

C) फक्त अ व क

D) फक्त ब व क


प्र. २६) कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५ नुसार जर संरक्षण अधिकारी आपले कर्तव्य पार पाडू शकले नाही. तर त्यास तुरुंगवासाची एक वर्षाची शिक्षा व रु. ——— असे दंड होईल. ( PSI मुख्य २०१७ )

A) १०,०००

B) २०,०००

C) ३०,०००

D) ४०,०००


प्र. २७) स्त्रियांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा २००५ मधील _ अन्वये संरक्षण अधिकाऱ्याने विविध कर्तव्ये पार पडली पाहिजे. ( PSI मुख्य २०१८ )

A) कलम ८

B) कलम ९(१)

C) कलम १०(१)

D) कलम १०( २)


प्र. २८) कौटुंबिक हिंसाचारापासून महिलेचे संरक्षण, नियम -८ नुसार संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे की 🙁 PSI मुख्य २०१८ )

अ) पीडितेस तक्रार करण्यास सहाय्य करणे
ब) तिला पीडित व्यक्तीच्या अधिकारांची माहिती देणे
क) ‘सुरक्षा नियोजन’ तयार करणे व पुढील काळात कौटुंबिक हिंसा प्रतिबंधास उपाययोजन करणे.

वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?

A) फक्त अ बरोबर आहे

B) फक्त अ व क बरोबर आहे

C) फक्त ब व क बरोबर आहे

D) सर्व बरोबर आहे

 उत्तरे

१)D २)C ३)C ४)B ५)B ६)B ७)A ८)C ९)B १०)C
११)A १२)C १३)B १४)# १५)B 16)C १७)A १८)C १९)B 20)D
21)A २२)B २३)A २४)B २५)B २६)B २७)B २८)D    

भारतीय दंड सहिता १८६० या घटक वर प्रश्न  Read More…

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch