प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विश्वकर्मा योजनाची घोषणा केली. १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा योजना सुरू होणार आहे.

विश्वकर्मा योजना ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी कुशल कामगार, महिला बचत गट आणि शहरी गरीबांसाठी अनेक नवीन योजना जाहीर केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विश्वकर्मा योजनेची घोषणा केली.१७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा योजना सुरू होणार आहे.

विश्वकर्मा योजना काय आहे

ही योजना ओबीसी समाजातील पारंपारिक कामगार आणि कारागीर यांच्या रोजीरोटीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सुरुवातीला १३००० कोटी ते १५०००  कोटी रुपयांचे वाटप केले जाईल.

या अंतर्गत शासनाच्या हया योजनेचा लाभ मुख्यत्वे लोहार, कुंभार,चांभार,धोबी,गवंडी,माळी,मिस्त्री,विणकर,मुर्तीकार, शिल्पकार इत्यादी कौशल्य आधारित काम करत असलेल्या कारागिरांना होईल.

योजनेचे पुर्ण नाव प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना असे आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे उद्दिष्ट

कारागीर आणि कारागीर यांच्या उत्पादनांची आणि सेवांची गुणवत्ता, प्रमाण आणि पोहोच सुधारण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे अशा कामगारांचे आर्थिक सक्षमीकरण होईल, विशेषत: एससी, एसटी, ओबीसी, महिला, ट्रान्सजेंडर आणि समाजातील इतर दुर्बल घटकांचे.

विश्वकर्मा योजनेचे फायदे

या योजनेचा थेट फायदा कारागिराशी निगडित लोकांना होणार आहे, तसेच मजूर आणि समाजातील दुर्बल घटकही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. २०२३ च्या अर्थसंकल्पात विश्वकर्मा योजना जाहीर करण्यात आली होती.

विश्वकर्मा योजनेत एक लाख रुपयांपर्यंत स्वस्त व्याजदराने कर्जच मिळेलच. पण या कारागीरांना प्रशिक्षण आणि इतर अनेक सोयी-सुविधा मिळतील. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२३ मधील अर्थसंकल्पात केली होती.

किती मिळेल फायदा

या योजनेत देशातील कारगारींना १ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. या कर्जावर 5% व्याजदर द्यावे लागेल. पहिल्या टप्प्यात या योजनेत कारागीरांना एक लाखांचे कर्ज उपलब्ध होईल. तर दुसऱ्या टप्प्यात १ लाखांचे अतिरिक्त कर्ज मिळू शकते. पण एकावेळी केवळ एक लाख रुपयांचे कर्ज मिळेल. या सर्वांच्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ देण्याचा हा प्रयत्न आहे.

प्रशिक्षण

या योजनेत केंद्र सरकार कारागीरांना त्यांच्या व्यवसायात आणखी निपुण करण्यासाठी तसेच जागतिक कसोट्यांवर उतरण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे. यामध्ये तात्पुरते आणि विशेष प्रशिक्षणाचा समावेश आहे. त्यांना 500 रुपयांचा प्रशिक्षण भत्ता पण देण्यात येईल.

कोणती लागतील कागदपत्रे

या योजनेतंर्गत केंद्र सरकार कारागीर आणि शिल्पकारांसाठी PM विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि आयडी कार्ड देईल. या कारागीरांना एक वेगळी ओळख देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रमाणपत्राआधारे कारगारींना आणि शिल्पकारांना त्यांची खास ओळख तयार करता येईल. कारागीरांना इन्सेटिव्ह आणि मार्केटिंगचा पाठिंबा देण्यात येईल.

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch