लोकसंख्या व समाज MCQ विश्लेषण आयोगाने विचारलेले प्रश्न

नमस्ते  लोकसंख्या व समाज MCQ आयोगाने विचारलेले प्रश्न २०११ पासून ते आतापर्यंत लोकसंख्या या घटक वर विचारलेले प्रश्न

मित्रानो विश्लेषण केल्यावर समजले कि हे या घटकवर आयोगाने नेहमी प्रश्न विचारलेले आहे पूर्व आणि मुख्य या परीक्षेत या वर प्रश्न विचारलेले आहे . या घटक चा अभ्यास कसा करायला पाहिजे त्या अगोदर आयोग यावर प्रश्न कसे विचारलेले आहे ते बघन महत्वाचे आहे चाल तर जाणून घेऊया

Asst

प्र.1. नागरी नोंदणी प्रणाली (सिव्हील रजिस्ट्रेशन सिस्टीम), 2015 च्या अहवालाप्रमाणे, जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक म्हणून दादर-नगर हवेली (1001), त्या खालोखाल त्रिपुरा (1000), मेघालय (975) आणि ———–(973) येथे नोंदविले गेले आहे. (Asst मुख्य 2017)

1) महाराष्ट्र व केरळ                        2) गोवा व छत्तीसगड

3) सिक्कीम व मिझोराम             4) पुद्दुचेरी व आंध्र प्रदेश

 

प्र.2. 2012 च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांवरील देश क्रमाने कोटे? (ASO पूर्व 2016)

1) इन्डोनेशिया आणि ब्राझील

2) इन्डोनेशिया आणि पाकिस्तान

3) यु.एस.ए. आणि ब्राझील

4) यु.एस.ए. आणि इन्डोनेशिया 

 

प्र.3. कोणत्या राज्यांचा गटामध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झाली? (ASO पूर्व, 2016)

1) केरळ, गोवा, हरियाणा              2) नागालँड, केरळ, मिझोराम

3) नागालँड, केरळ, गोवा         4) केरळ, गोवा, मेघालय

 

प्र.4.खालीलपैकी कोणते घटक वय रचनेवर परिणाम करतात?(ASO पूर्व 2014)

अ) जन्मदर                                      ब) मृत्यूदर

क) लोकसंख्येचे आकारमान           ड) स्थलांतर

पर्यायी उत्तरे :

1) ब, क आणि ड               2) फक्त क

3) फक्त ड                          4) वरीलपैकी कोणतेही नाही 

 

प्र.5. सोबतच्या चित्रातील व्यक्ती कोणत्या आदिवासी समाजाच्या आहेत ते ओळखा : (ASO पूर्व, 2014)

1) भिल्ल           2) गोंड                3) नागा               4) वारली

 

प्र.6. 2011 च्या जणगणेनच्या आधारे कोणते राज्य भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे? (ASO पूर्व, 2012)

1) गोवा              2) मिझोराम                     3) तामिळनाडू                  4) केरळ

 

प्र.7. 2011 च्या जणगणनेनुसार भारतातील खालील राज्यांच्या कमी ते उच्च लोकसंख्येच्या घनतेनुसार योग्य क्रम लावा. (PSI पूर्व, 2016)

अ) जम्मू आणि काश्मीर         ब) नागालँड

क) सिक्कीम                        ड) मिझोराम

पर्यायी उत्तरे :

1) ड, ब, अ, क                   2) ब, क, अ, ड

3) अ, ड, ब, क                   4) ड, अ, क, ब

उत्तर (#) हा प्रश्न आयोगाने रद्द केले आहे 

 

प्र.8. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? (PSI पूर्व, 2013)

1) भारतात साक्षरतेचे प्रमाण पुरुषांपेक्षा रित्रायांत जास्त आहे.

2) अंदमान-निकोबार येथे साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे.

3) भारतात साक्षरता कमी होत आहे.

4) वरील एकही नाही.

 

प्र.9. 2011 च्या जणगणनेनुसार भारतातील अशिक्षितांचे प्रमाण किती? (PSI मुख्य 2012)

1) 74%                2) 18%                3) 26%              4) 21%

 

प्र.10. खालील चित्र पहा आणि कोणत्या आदिवासी जमात आहे ते सांगा. (STI पूर्व, 2013)

1) संताळ            2) गोंड                3) तोडा                 4) नागा

 

प्र.11.भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे ? (STI पूर्व, 2011)

1) गुजरात           2) तामीळनाडू    3) मिझोराम         4) ओरिसा

 

प्र.12.खालील विधानांचा विचार करा : (STI पूर्व, 2015)

अ) भारतामध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्कवारी 2001 मध्ये 15.9% पासून 2011 मध्ये 12.1% एवढी घटली.

ब) 2011 च्या जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मीर राज्य सोडून भारतातील इतर सर्व राज्यांत 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी घटली आहे.

वरीलपैकी कोणते/ ती विधान/ने बरोबर आहे/ आहेत?

1) फक्त अ                         2) फक्त ब 

3) अ आणि ब दोन्हीही       4) अ किंवा ब दोन्हीही नाही

 

प्र.13. 2011 च्या जनगणनेनुसार खालील विधाने पहा : (STI पूर्व, 2015)

अ) बिहार,पश्चिम बंगाल व केरळ ह्या राज्यांनी प्रति चौ.कि.मी. माणसांच्या घनतेचा 1000 हा आकडा ओलांडला आहे.

ब) अरुणाचल प्रदेश, मिझोराम व सिक्किम ह्या राज्यांची प्रति चौ. कि.मी. माणसांची घनता 100 पेक्षा कमी आहे.

पर्यायी उत्तरे :

1) अ आणि ब बरोबर                     2) अ बरोबर, ब चूक

3) अ चूक, ब बरोबर                 4) अ आणि ब चूक

 

प्र.14. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतातील शहरी वसाहतींना लागू पडत नाही? (STI पूर्व, 2012)

1) पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या

2) लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त

3) दहा चौरस किलोमीटर पेक्षा जास्त प्रदेश 

4) 75% पेक्षा जास्त कर्ती लोकसंख्या बिगर-प्राथमिक व्यवसायांशी संबंधित

 

टीप : मित्रानो नकीच एकदा झालेले पेपर बघितले पाहिजे त्यामुळे तुमचा अभ्यास मजबूत होईल .

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch