मृदा व जलसिंचन MCQ विश्लेषण आयोगाने विचारलेले

नमस्ते  मृदा व जलसिंचन MCQ या घटकवर आयोगाने २०११ पासून ते आतापर्यंत विचारलेले प्रश्नाचे विश्लेषण केले आहे .

मित्रानो विश्लेषण केल्यावर समजले कि आयोगाने यावर combine या परीक्षेत पूर्व आणि मुख्य परीक्षेत ३० पेक्षा अधिक प्रश्न विचारलेले आहे. यावरून अंदाज लावू शकता कि हा घटक कि महत्वपूर्ण आहे. चाल तर या घटत वर आयोग कसे प्रश्न विचारले जाणून घेऊया .

PSI

प्र.1. योग्य जोडया लावा. (PSI मुख्य 2019)

मृदा                               PH मूल्य

अ) कृती शून्य              1) 4.5 ते 5.5

ब) अल्कधर्मी               2) 5.5 ते 6.5

क) साधारण अम्ल        3) 7.5 ते 6.5

ड) मध्य अम्ल              4) 6.5 ते 7.5

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 1 2 3 4

2) 2 3 4 1

3) 3 4 2 1

4) 4 3 2 1

उत्तर (#) हा प्रश्न आयोगाने रद्द केले आहे.

 

प्र.2. खालीलपैकी कोणते मृदा लोहाचे ऑक्साई व अल्युमिनियम समृध्द असते? (PSI मुख्य 2018)

1) काळी मृदा              2) लॅटराईट मृदा 

3) दलदलीची मृदा        4) वाळवंटी मृदा

 

प्र.3. खालील विधाने पहा. (PSI मुख्य 2017)

अ) कण्हेर जलसिंचन योजना सातारा जिल्ह्यामध्ये आहे.

ब) कोल्हापूर जिल्ह्यात 80% जलसिंचन हे उपसा प्रकारचे आहे.

क) गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर जिल्ह्यात 80% जलसिंचन तलावातून होते.

पर्यायी उत्तरे :

1) फक्त विधान अ बरोबर आहे.

2) फक्त विधान क बरोबर आहे.

3) विधान अ आणि ब बरोबर आहे.

4) विधान अ, ब आणि क बरोबर आहे. (उत्तर)

 

प्र.4. 2001 मधे महाराष्ट्रातील कोणता विभाग विहीर सिंचनामध्ये अग्रेसर होता? (PSI मुख्य 2013)

1) नागपूर        2) नांदेड          3) कोल्हापूर     4) पुणे 

 

प्र.5. खालील पैकी कोणत्या धरणांचा समावेश कुकडी जल सिंचन प्रकल्पा आंतर्गत होतो? (PSI मुख्य 2013)

1) भाटघर, भंडारदरा, पिंपळगावजोगे, वडज, डिंभे

2) पिंपळगावजोगे, माणिकडोह, वडज, भंडारदरा, डिंभे

3) येडगाव, माणिकडोह, पिंपळगावजोगे, वडज, डिंभे 

4) येडगाव, येलदरी, हतनूर, वडज, डिंभे

 

प्र.6. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन-चतुर्थांश भागात ————- मृदा आढळते. (PSI पूर्व 2012)

1) गालाची मृदा                2) रेगुर मृदा   

3) वन मृदा                     4) जांभी मृदा

 

प्र.7. रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? (PSI पूर्व, 2012)

1) दख्खनचा पठारी प्रदेश

2) कोकणातील डोंगराळ प्रदेश

3) कोकण किनार पट्टीची चिंचोळी मैदाने

4) भामरागडचा डोंगरी प्रदेश

 

प्र.8. महाराष्ट्रातील लागवडीखालील जमिनीच्या किती टक्के क्षेत्र ठिबक सिंचना खाली आहे? (PSI पूर्व, 2012)

1) 35%            2) 80%

3) 40%            4) 60%

 (उत्तर) (#) हा प्रश्न आयोगाने रद्द केले आहे.

 

प्र.9. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहीरी आहेत? (PSI मुख्य 2012)

1) अहमदनगर      2) पुणे

3) सातारा        4) नागपूर

 

प्र.10. महाराष्ट्रातील मृदा-संपत्ती बाबत पुढील विधाने पहा. (PSI मुख्य 2012)

अ) जांभा मृदा मोठया प्रमाणात पूर्व कोकणात आढळते.

ब) गाळाची मृदा मोठया प्रमाणात अकोला आणि अमरावती येथे आढळते.

क)जांभा मृदा मोठया प्रमाणात पूर्व गडचिरोलीत आढळते.

ड) काळी मृदा मोठया प्रमाणात गोंदिया आणि भंडारा येथे आढळते.

कोणती विधाने बरोबर आहेत?

1) अ आणि ब              2) ब आणि ड

3) अ आणि क         4) ड आणि अ

 

प्र.11. योग्य जोडया लावा. (PSI मुख्य 2012)

यादी I (तळी)    यादी II (जिल्हे)

अ) आंध्र लेक     1) अहमदनगर

ब) भंडारदरा    2) बुलढाणा

क) तानसा        3) पुणे

ड) नळगंगा       4) ठाणे

पर्यायी उत्तर :

अ ब क ड

1) 1 2 3 4

2) 3 1 2 4

3) 1 3 2 4

4) 3 1 4 2 (उत्तर)

 

प्र.12. लोह व अॅल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? (PSI पूर्व 2011)

1) किळी मृदा              2) गाळाची मृदा

3) जांभी मृदा (उत्तर)     4) पिवळसर मृदा

 

प्र.13. खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे? (PSI मुख्य 2011)

1) हिराकूड       2) जायकवाडी 

3) कोयना         4) भाक्रा-नांगल

STI

प्र.14. महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजनेच्या जिल्ह्याप्रमाणे योग्य जोडया लावा. (STI पूर्व 2016)

अ) देवघर        1) नाशिक

ब) पुणेगाव       2) बुलढाणा

क) मांजरा        3) पुणे

ड) नळगंगा       4) उस्मानाबाद

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 2 4 3 1

2) 4 3 1 2

3) 3 1 4 2 

4) 1 4 2 3

 

प्र.15. महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्त्रोत उतरत्या क्रमाने लावा. (STI पूर्व 2014)

अ) सरकारी कालवे       ब) खाजगी कालवे

क) विहीर                     ड) तलाव

पर्यायी उत्तरे :

1) अ, ब, क, ड    2) क, अ, ड, ब 

3) क, अ, ब, ड    4) क, ब, अ, ड

 

प्र.16. खालीलपैकी कोणता जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा भाग समजला जातो? (STI मुख्य 2012)

1) नागपूर        2) धुळे

3) गोंदिया         4) बीड

 

प्र.17.महाराष्ट्रात ठिंबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे? (STI पूर्व 2012)

1) ऊस             2) कापूस

3) फलोत्पादन     4) तेलबिया

 

प्र.18. खालीलपैकी कोणता जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? (STI मुख्य 2011)

1) सिंधुदुर्ग        2) भंडारा   

3) सातारा        4) सोलापूर

 

प्र.19.महाराष्ट्राच्या पठारांवर———-मृदा आढळते? (STI मुख्य 2011)

1) क्षारयुक्त       2) वाळूकामय

3) काळी         4) जांभी

ASO

प्र.20. योग्य जोडया लावा. (ASO मुख्य, 2018)

जिल्हा                   सरोवर

अ) बुलढाणा     1) रामसागर

ब) नागपूर        2) घोडझरी

क) भंडारा        3) लोणार

ड) चंद्रपुर        4) बांदलकसा

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 3 1 2 4

2) 3 1 4 2 

3) 4 2 3 1

4) 1 3 4 2

 

प्र.21. कोकण प्रदेशामध्ये जास्त पर्जन्य आणि जास्त तापमान असल्यामुळे : (ASO पूर्व, 2016)

अ) तेथे जांभी मृदा आढळते

ब) तेथील मातीचा पी. एच. 7.5 असतो.

क) तेथे रासायनिक विदारण मोठया प्रमाणावर होते.

पर्यायी उत्तरे :

1) फक्त विधान अ बरोबर आहे.

2) विधान अ आणि ब बरोबर आहेत.

3) विधान ब आणि क बरोबर आहेत.

4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर (#) हा प्रश्न आयोगाने रद्द केले आहे.

 

प्र.22. खालील तलाव व जिल्ह्यांच्या योग्य जोडया लावा. (Asst, 2016)

अ)आंदरा         1) परभणी

ब) आळंद         2) वाशिम

क) वारूळ        3) पुणे

ड) पांगरी        4) नांदेड

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 1 2 3 4

2) 2 3 1 4

3) 3 1 4 2 

4) 4 2 1 3

 

प्र.23. योग्य जोडया लावा. (ASO पूर्व, 2015)

जलसिंचन कालवा                   निर्मिती वर्ष

अ) कृष्णा कालवा                    1) 1875

ब) खडकवासला कालवा          2) 1870

क) निरा डावा बँक कालवा        3) 1885

ड) गिरणा कालवा                   4) 1910

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 2 4 1 3

2) 4 1 3 2

3) 3 2 4 1

4) 2 1 3 4 

 

प्र.24. खालील विधाने पहा : (ASO पूर्व, 2015)

अ) कोंकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभा खडकाची पठारे आहेत.

ब) जांभा दगड हा बेसॉल्टच्या कायिक विदारणामुळे तयार होतो.

क) महाराष्ट्राच्या 80% भूप्रदेशावर क्रिटॅशियस कालखंडातील लाव्हाचे थर आहेत.

पर्यायी उत्तरे :

1) फक्त विधान अ बरोबर आहे

2) फक्त विधान ब बरोबर नाही 

3) विधान अ आणि ब बरोबर आहेत

4) विधान अ आणि क बरोबर नाहीत

 

प्र.25. सर्वसाधारणपणे मृदेत———% पाणी, ———% हवा, ———-% खनिज द्रव्ये आणि ———% सेद्रिय द्रव्ये असतात.(Asst. मुख्य 2014)

1) 05, 25, 25 आणि 45

2) 25, 25, 30 आणि 20

3) 20, 30, 45 आणि 05

4) 25, 25, 45 आणि 05 

 

प्र.26. कोणता जिल्हा एकेकाळी ‘सारसनगरी’ म्हणून ओळखला जात होता? (ASO मुख्य, 2014)

1) अकोला        2) अमरावती

3) औरंगाबाद    4) गोंदिया 

 

प्र.27. विधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा : (ASO मुख्य, 2014)

विधान अ : रेगुर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खोऱ्यात, पठारी प्रदेशात सापडते.

विधान ब : जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करड्या रंगाची मृदा आढळते.

पर्यायी उत्तरे :

1) विधान अ बरोबर                   2) विधान ब बरोबर

3) दोन्ही विधाने बरोबर         4) दोन्ही विधाने चूक

 

प्र.28. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तलावातून जलसिंचन केले जाते? (ASO मुख्य, 2012)

1) चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया

2) चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

3) चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा

4) चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा

 

प्र.29. योग्य जोडया लावा. (ASO मुख्य, 2012)

यादी I                       यादी II

(जलसिंचन योजना)      (जिल्हा)

अ) धोम                     1) औरंगाबाद

ब) दुधगंगा                  2) सातारा

क) अरुणावती             3) कोल्हापूर

ड) जायकवाडी             4) यवतमाळ

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

1) 3 2 1 4

2) 2 3 4 1 

3) 1 4 3 2

4) 4 1 3 2

 

प्र.30. खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे? (ASO मुख्य, 2012)

1) कोयना         2) भातसा

3) उजनी          4) जायकवाडी 

 

प्र.31. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 80 टक्केपेक्षा जास्त जलसिंचन उपसा (lift irrigation) प्रकारचे आहे? (ASO मुख्य, 2012)

1) सोलापूर       2) कोल्हापूर 

3) सातारा 4) सांगली

 

प्र.32. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तळी आहेत? (ASO मुख्य, 2012)

1) भंडारा        2) नागपूर

3)चंद्रपूर         4) कोल्हापूर

 

प्र.33. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? (ASO मुख्य, 2012)

1) जांभी           2) रेगुर

3) गाळाची       4) वरीलपैकी कोणतीही नाही

 

प्र.34. महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये ———–मृदा मोठया प्रमाणात विखुरलेली आढळते. (ASO पूर्व, 2011)

1) काळी           2) तांबडी

3) गाळाची       4) जांभी

 

प्र.35. ———–या सरोवराची निर्मिती उलकापातापासून झालेली आहे? (ASO पूर्व, 2011)

1) चिकला        2) लोणार     

3) सांभार           4) पुलीकेत

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch