तुटीच्या संकल्पना-भारतामध्ये तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय

नमस्ते  भारतामध्ये तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय तसेच विविध तुटीच्या संकल्पना  यांचा सविस्तर माहिती दिली आहे त्यांच्या सुत्रनुसार आणि त्यांच्या संबंधी माहिती दिली आहे

तुटीचा अर्थभरणा म्हणजे  सरकारने आपल्या अर्थसंकल्पात एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च जास्त दाखवून मुद्दाम निर्माण केलेती तूट ज्या मार्गांनी भरून काढली जाते त्याला तुटीचा अर्थभरणा असे म्हणतात. राजकोषीय तूट भरून काढण्याचे स्त्रोत दोन प्रकारे १) बाजार कर्जे २) तुटीचा अर्थभरणा

बाजार कर्जे

बाजार कर्जे यामध्ये सरकारने घेतलेल्या अंतर्गत आणि बाह्य कर्जाचा समावेश होतो. अंतर्गत कर्जे समावेश  जनता, व्यापारी बँका इत्यादींकडून घेतली जातात बाह्य कर्जेत समावेश  परकीय सरकारे, आंतरराष्ट्रीय संस्था इत्यादींकडून घेतली जातात.

तुटीचा अर्थभरणा

यात सरकार ट्रेझरी बिले किंवा बाँड्सचा वापर करून रिझर्व्ह बँकेकडून कर्जे घेते. व्याख्या रिझर्व्ह बँक ट्रेझरी बिले किंवा बाँड्सचा नवीन चलन छापून सरकारला देते. या प्रक्रियेला ‘तुटीचा अर्थभरणा’ असे म्हणतात. इतर माहिती बाजार कर्जे हा अधिक चांगला स्त्रोत आहे (कारण त्यामुळे चलन पुरवठ्यात भर पडत नाही.)

तुटीच्या अर्थभरण्यामुळे परिणाम अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठा वाढून चलनवाढीचा दबाव निर्माण होतो. सध्या मात्र राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात नाही. हि पद्धत वापर करतात राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी बाजार कर्जे ,इतर देणी यांचा वापर केला जातो.

तूटीच्या अर्थभरण्याचे दुष्परिणाम

१) सरकारी खर्चात प्रचंड वाढ
२) चलनवाढ किवा भाववाद निर्माण होते
३) सक्तीची बचत
४) खाजगी गुंतवणुकीच्या संरचनेत बदल
५) बँकांची पतनिर्मिती वाढते

तुटीच्या संकल्पना

अर्थसंकल्पातील तुटी संकल्पना एकूण उत्पन्न म्हणजे मसुली जमा आणि भांडवली जमा होय . एकूण खर्च म्हणजे मसुली खर्च आणि भांडवली खर्च होय

महसुली तूट म्हणजे काय

महसुल तूटकशी काढतात महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च या दोघ्यातील फरक होय. १९७० च्या दशकाच्या मध्यापर्यंत महसुली खात्यावर शेष होता.पण त्यानंतर तूट आढळून आली.

अर्थसंकल्पीय तूट

अर्थसंकल्पीय तूट अशी काढतात  एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च यांच्यातील फरक होय.

अर्थसंकल्पीय तूट भारतीय चलने व्यवस्था विषयक समिती १९९७-९८ याचे अध्यक्ष सुखमॉय चक्रवर्ती .शिफारस वित्तमंत्रालयाने तुटीच्या अर्थभरण्यासाठी या तुटीचा वापर करणे सोडून दिले आहे. तेव्हापासून ही तूट शुन्य दाखवली जाते.(म्हणजेच एकूण जमा व एकूण खर्च सारखेच दाखविले जातात.)  १९५०-५१ पासूनच भारतात अर्थसंकल्पीय तूट आढळून येते.

राजकोषीय तूट म्हणजे काय

राजकोषीय तूट म्हणजे सरकार आपल्या एकूण उत्पन्नापेक्षा किती जास्त खर्च करीत आहे .सरकारवर कर्जे निर्माण करणारी जमा असे म्हणतात.(कारण सरकारच्या एकूण जमेपैकी अशी रक्कम जी भविष्यात सरकारने परत करावयाची असते)

राजकोषीय यास वित्तीय तूट दिखील म्हणतात अर्थसंकल्प तुट संकल्पना गेली आणि राजकोषीय तुट जन्म झाला कसे दाखवतात राजकोषीय तुट रकमेमध्ये त्याचबरोबर जी.डी.पी.च्या टक्केवारीमध्ये दर्शवली जाते

राजकोषीय तुट कशी काढतात
१) (एकूण खर्च) वजा (मसूली जमा + कर्ज पुनप्राप्ती +इतर भांडवली उत्पन्न ) किवा
२) (एकूण खर्च) वजा (मसूली जमा +कर्जेतर भांडवली जमा) किवा
३) सरकारची निव्वळ कर्ज उभारणी आणि सरकारची इतर देणी

प्राथमिक तूट म्हणजे काय

प्राथमिक तूट कशी काढतात  राजकोषिय तूट आणि घेतलेल्या कर्जावरील व्याजखर्च यांच्यातील फरक होय. १९९२-९३ पासून वापरन्यास सुरु

प्रभावी महसुली तूट

प्रभावी महसुली तूट कशी काढतात =महसुली तुटीतून आणि भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठीची वापरलेले अनुदाने येनच्यातील फरक होय.इतर माहिती सुरु २०११-१२ पासुन यास  वैधानिक दर्जा वार्षिक वित्तीय विधेयकात आणि FRBM कायद्यात केलेल्या सुधारणेद्वारे या तुटीच्या संकल्पनेला वैधानिक दर्जा देण्यात आला.

निष्कर्ष

चांगला कसा भारतासारख्या विकसनशील देशांसाठी तुटीच्या अर्थभरण्याचा मर्यादित वापर अर्थव्यवस्थेस चालना देणारा ठरू शकतो. रोजगार निर्मितीस, संसाधनांचा वापर होण्यास आणि मागास भागात विकास प्रक्रिया चालू करण्यास होऊ शकतो.

नुकसानकारक कासा तुटीचा अर्थभरणा मूलभूतरित्या भाववाढ घडवून आणणारा असतो. यावर योग्य नियंत्रण आवश्यक असते.
बी. आर. शेणॉय म्हणतात  तुटीच्या अर्थभरण्यास ‘अग्रीप्रमाणे उत्तम नोकर मात्र दृष्ट मालक’ अशी उपमा दिली

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch