भारतीय व्यापारी बँकेचे कार्य कोणते-बँकेचे प्राथमिक कार्य कोणते

बँकेचे कार्य कोणते प्राथमिक कार्य ठेवी स्वीकारणे ,कर्ज देणे ,पत निर्मिती करणे ,दुय्यम कार्य ,सामजिक कार्य ,इत्यादी महत्वाच स्पष्टीकरण

बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते. व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देणे हे कार्य असतात भाग तीन  पडतात प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि  सामजिक कार्य

बँकेचे प्राथमिक कार्य कोणते

बँकेचे प्राथमिक कार्य  १) ठेवी स्विकारणे २) कर्ज देणे ३) पत निर्मिती करणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.

ठेवी स्विकारणे

)बचत ठेवी
मागील देय व मुदत ठेवींच्या अटींचे एकत्रीकरण यात केव्हाही व कितीही पैसे ठेवता येतात पण पैसे काढण्यावर बंधन असतात(अत्व्द्यातून दोन वेळेस ).बचत बँका अल्पावधीसाठी गुंतऊ शकतात, म्हणून बँका त्यावर अल्पदराने व्याज ठेवतात(३ ते ५%)
उपयोग =अल्प व मध्यम उत्पन गटातील लोकांना जास्त उपयोगी असते

२ )चालू ठेवी
ज्या ठेवीचे पैसे मागणी करताच परत द्यावे लागतात त्यांना मागणीदेय ठेवी म्हणतात. या खात्यातून केव्हाही व कितीही रक्कम काढता व ठेवता येते.खात्यावर धांनादेशाची सोय असल्यास त्यादवारे व्यवहार केला जाऊ शकतो
उपयोग =सर्वात जास्त उद्योग ,व्यापर करणार्याला व्यक्तींना सर्वात जास्त फायदा होतो

३ )मुदत ठेवी
या ठेवीत एक विशिष्ट मुदतीसाठी पैसे ठेवले जातात(३ महिने,५ वर्ष किवा १० वर्ष ) यावर व्याज जास्त मिळतो ७ ते १० % पण मुदत संपल्याशिवाय पैसे देण्याचे बंधन बँकेवर नसते आणि जर मुदतपूर्व पैसे हवे असल्यास त्यांना दंडात्मक व्याजदर आकारून ते पैसे दिले जातात.

४ )आवर्ती ठेवी
दरमहा ठराविक रक्कम विशिष्ट मुदतीपर्यंत (१,३,५,७,१० वर्ष )भरल्यास मुदतीअखेर व्याजासह ठेवी परत मिळते.यात ठेवी-रक्कम दर महिन्याला वाढत जाते, ठेवीवर बचत खात्यांपेक्षा जास्त पण मुदत ठेवीपेक्षा कमी दराने व्याज मिळते.
उपयोग =पगारदार ,किरकोळ व्यापारी,रोजंदारी वाले यांना उपयोगी पडतात

कर्ज देणे

बँका जमा केलेल्या ठेवींमधून निरनिराळ्या पद्धतीने कर्ज व अग्रिमे देतात व स्वतःसाठी नफा कमवितात.ठराविक मुदतीसाठी कर्ज दिले तर त्याला कर्ज व अग्रिमे म्हणतात.

  1. रोख पत रोख कर्ज
  2. अधिकर्ष सवलत
  3. हुंड्याची वटवणी
  4. तारणमूल्याधारित कर्ज

१) रोख कर्ज

कोनला गरज = शेतकरी सभासद, व्यापारी उद्योजक ,व्यावसायिक इत्यादींना खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी तारण मालावर तारुण्याच्या ५० ते ७५ % रोख रक्कम कर्ज म्हणून दिलं जातं या कर्जाचा विनियोग गरजेनुसार करता येतो फक्त वापरलेल्या कर्जावर ती व्याज द्यावे लागते.

२) अधिकर्ष सवलत (Overdraft Facility)
व्यापारी बँकांकडे चालू खाते असलेल्या व्यक्तींनाच Overdraft Facility सवलत घेता येतो ही अल्प मुदत काळासाठी ही कर्ज दिलीजाते त्याच्यावर व्याज घेतला जातो

३)हुंडी स्वीकारणे व वटविणे
व्यापारी बँका आपल्या सभासदांना हुंडी स्वीकारून अल्प मुदतीसाठी ९० दिवस पैशांची गरज भागविण्यासाठी या प्रकारचे कर्ज देतात यास हुंडी स्विकारण म्हणतात ( उद्योग व्यापार असे बरेच व्यवहार उधारीवर व विश्वासावर चालत असतात )

४)तारणमूल्याधारित कर्ज
व्यापारी बँक आपल्या खातेदारांना घरबांधणी ,वाहन खरेदी, शैक्षणिक, पर्यटनासाठी, प्लॉट खरेदी इत्यादी साठी कर्ज दिले जात आणि त्याबद्द्लेत पगार , घर ,जमीन , शेअर्स ,बचतीची ठेवी इत्यादी तारण म्हणून घेतले जाते यास तारणमूल्याधारित कर्ज म्हणतात यावर कर्जावर व्याजदर आकारला जातो

महारष्ट्र अभयारण्य जाणून घ्या विभानुसार माहिती

दुय्यम कार्य

याचे वर्गीकरण दोन प्रकारे केले जाते १) प्रतिनिधी कार्य २) सर्वसाधारण सेवा

प्रतिनिधी कार्य (Agency Sarvices)

आपल्या ग्राहकाची प्रतिनिधी म्हणून त्याच्या आदेशानुसार केले जाणाऱ्या कार्यास प्रतिनिधी कार्य म्हणतात

  • चेक ड्रॉप्स, हुंडी, वचनचिठ्ठी इत्यादीने पैसे वसूल करणे
  • ग्राहकांच्या वतीने रक्कम जमा करणे
  • शेअर्स कर्जरोख्यांची खरेदी विक्री करणे
  • रक्कम हस्तांतरण करणे
  • ग्राहकांचे विश्वस्त म्हणून कार्य करणे
  • ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून विविध कर भरणे
  • ग्राहकांना गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करणे
  • ग्राहकांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ची खरेदी करून देणे
  • प्राप्तिकर विवरणपत्र भरणे
  • रेल्वे विमान ,पंचतारांकित हॉटेल्स ,पर्यटन केंद्रे इत्यादी आरक्षण करणे.

सेवा कार्य

ग्राहकेतर व्यक्तीसाठी केलेल्या कार्यांना सेवा कार्य म्हणतात

  • मूल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे
  • प्रवासी चेक सुविधा उपलब्ध करून देणे
  • हमी पत्र देणे
  • भाग विमेकरीचे कार्य करणे
  • विदेशी व्यापारात मदत करणे
  • सांख्यिकी आकडेवारी गोळा करणे
  • विदेशी विनिमयाचे व्यवहार करणे
  • गुंतवणुकीबाबत ग्राहकांना तज्ञ सेवा पुरविणे
  • ग्राहक जागृती अभियान घडवून आणणे
  • ग्राहकांना भांडवल बाजार पारस्परिक निधी बचत माहिती देणे

सामाजिक कार्य

व्यापारी बँक आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी वृद्धीचा अभिकर्ता यांना त्यांना आपलं काम पूर्ण करतं

  • आर्थिक वाढीचा एजंट म्हणून कार्य करणे
  • भांडवल निर्मितीचा वेग वाढविणे
  • आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे
  • समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना सहाय्य करणे.
  • स्वयंरोजगार वृद्धीस चालना देणे.
  • सामाजिक व शैक्षणिक संस्थांना मदत करणे.

भारतीय चलन नोटा,नाणी

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch