घटनात्मक आयोग MCQ विश्लेषण आयोगाने विचारलेले प्रश्न

नमस्ते  घटनात्मक आयोग MCQ  previous Question 2011 पासून चे ते अतापर्यंत

मित्रानो विश्लेषण केल्यावर समजले कि  या घटक वर आयोचा भर combine (psi ,sti ,aso )  या तीन हिसाठी महत्वाचा आहे. पूर्व आणि मुख्य या परीक्षेत विचारलेले आहे . त्यामुळे अभ्यास चांगलाच पाहिज्रे चाल तर आयोग कसे विचारतात यावर प्रश्न बघूया

 STI

प्र.1. संविधानामध्ये———–स्थापन करण्याची तरतूद आहे. ज्यामार्फत जिल्ह्यातील पंचायत आणि नगरपालिकांनी तयार केलेल्या योजना एकत्रीत करणे आणि नंतर संपूर्ण जिल्ह्यासाठी एक प्रारूप आराखडा तयार करणे अपेक्षित आहे.                 (STI मुख्य. 2022)

1) जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन

2) जिल्हा नियोजन समित्या

3) जिल्हा सांख्यिकी समित्या

4) जिल्हा संसाधन समित्या

 

प्र.2. ‘राज्य लोकसेवा आयोगाच्या’ स्वातंत्र्याची खात्री देणाऱ्या तरतुदींबाबत कोणते विधान बरोबर नाही. (STI पूर्व. 2016)

1) अध्यक्ष आणि सभासदांची नियुक्ती राज्यपाल करतात.

2) त्यांच्या सेवाकाळात नुकसानकारक होईल अशाप्रकारे सेवा अटीत बदल करात येत नाही.

3)’उच्च न्यायालयाच्या’ न्यायाधीशाकडून ‘गैरवरर्तना’ ची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही.

4) राज्यपाल दोषी असणाऱ्याची सेवा तात्पुती स्थगित करू शकतात. परंतु बडतर्फीचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.

 

प्र.3. खालील विधाने विचारात घ्या. (STI पूर्व 2016)

अ) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994 मध्ये करण्यात आली.

ब) राज्य विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेणे हे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधाने/ ने बरोबर आनाही हे/ त?

1) फक्त अ            2) फक्त ब

3) अ आणि ब         4) वरीलपैकी

 

प्र.4. खालीलपैकी कोणास घटनात्मक दर्जाप्राप्त आहे? (STI मुख्य 2016)

अ) निवडणूक आयोग

ब) जिल्हा नियोजन समिती

क) विद्यापीठ अनुदान आयोग

ड) राष्ट्रीय अनुसूचित जातीआयोग

य) केंद्रीय दक्षता आयोग

पर्यायी उत्तरे :

1) फक्त अ, ब, ड आणि य           2) फक्त अ, ड आणि य

3) फक्त अ आणि ड                  4) फक्त अ ब आणि ड 

 

प्र.5. राज्यसेवेतील अधिकाऱ्यांची भरती करण्याकरिता महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा कोण आयोजित करते? (STI पूर्व 2011)

1) नियोजन मंडळ                2) महाराष्ट्र लोकसेवा आयोग 

3) संघ लोकसेवा आयोग      4) यापैकी कोणीही नाही

 

प्र.6. भारतीय निवडणूक आयोगाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. (PSI मुख्य 2022)

अ) अनुच्छेद-324 मध्ये निवडणूक आयुक्तांसाठी असलेले पात्रतेचे निकष सांगितलेले आहेत.

ब) अनुच्छेद – 324 मध्ये निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य दोन निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनलेला असेल असे नमूद केले आहे.

क) मुख्य निवडणूक आयुक्त हे अन्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयाची पायमल्ली करू शकत नाहीत.

वरीलपैकी कोणती विधान / ने बरोबर आहे / त?

1) अ आणि ब              2) फक्त क 

3) ब आणि क              4) अ, ब आणि क

 

प्र.7. खालीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/ त? (PSI मुख्य 2016)

अ) भारताच्या संविधानाच्या कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे.

ब) आंतर-राज्य परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.

क) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेस राज्यसुचीतील विषयावर कायदा करता येतो.

ड) अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारवर नियंत्रण ठेवते.

पर्यायी उत्तरे :

1) फक्त अ                   2) अ आणि क

3) वरील सर्व             4) ब आणि ड

 

प्र.8. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदाचा कार्यकाल समाप्तीनंतर खलीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? (PSI पूर्व 2014)

1) तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो.

2) तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य म्हणून नियुक्तीला पात्र असतो.

3) तो त्याच राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो.

4) तो अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र नसतो. 

 

प्र.9. राज्य लोकसेवा आयोग प्राय: कोणती भूमिका बजावतो? (PSI पूर्व, 2013)

1)अभिनीर्णयी   2) समुपदेशक      3) नियामक      4) शैक्षणिक

 

प्र.10. भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? (ASO मुख्य 2018)

1) राज्यघटनेने निवडणूक आयोगाच्या सदस्यांचा पात्रतेचे निकष सांगितलेले आहेत.

2) राज्यघटनेने निवृत्त निवडणूक आयुक्तांची शासनाकडून अन्य पदावर नेमणूक करण्यात बंदी घातलेली आहे.

3) मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्त यांना समान अधिकार आहेत. 

4) सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या पद्धतीने व कारणासाठी पदच्युत केले जाते त्याच पद्धतीने व त्याच कारणासाठी निवडणूक आयुक्तांना पदच्युत करता येते.

 

प्र.11. खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही? (ASO पूर्व 2013)

1) वित्त आयोग

2) केंद्रीय लोकसेवा आयोग

3) मागास वर्गीय जमातीचे व मागास वर्गीय जमातीचे राष्ट्रीय आयोग

4) योजना आयोग 

 

प्र.12. खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही? (ASO मुख्य 2012)

1) मतदार यादी तयार करणे      2) उमेदवारांचे नामांकन करणे 

3) मतदान केंद्रांची स्थापना        4) आचार संहिता लागू करणे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch