कटक मंडळे MCQ विश्लेषण योगाने विचारलेले प्रश्न

कटक मंडळे MCQ Combine साठी यावर आयोगाने विचारलेले प्रश्न 2011 पासून ते आतापर्यंत विश्लेषण केले आहे .

मित्रानो विश्लेषण केल्यावर समजले कि अतापर्यंत ASO पर्व आणि  मुख्य या परीक्षेत विचारले चाल तर बघूया

ASO

प्र.1.छावणी क्षेत्रपालिकेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? (ASO मुख्य 2022)

1) छावणी क्षेत्रपालिका अधिनियम 2006 अन्वये 1924 चा छावणी अधिनियम रद्द करण्यात आला.

2) छावणी क्षेत्रपालिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड निर्वाचित सदस्य आपल्यामधून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी करतात.

3) छावणी क्षेत्रपालिकांचे वर्गीकरण नागरी लोकसंख्येच्या आधारे दोन प्रकारात केले जाते.

4) महाराष्ट्रात सहा छावणी क्षेत्रपालिका आहेत.

 

प्र.2. भारतात कॅन्टोन्मेंट अॅक्ट कधी पास झाला?  (ASO मुख्य 2022)

1) 1953           2)1924       3) 1923         4) 1920

 

प्र.3. खालीलपैकी कोणते विधाने हे कटक मंडळाच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात बरोबर आहेत?  (ASO मुख्य 2022)

अ) कटक मंडळे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली काम करतात.

ब) छावणी प्रमुख लष्करी अधिकारी हा कटक मंडळाचा पदसिध्द अध्यक्ष असतो.

क) कटक मंडळात लोकप्रतिनिधीपेक्षा नियुक्त आणि पद्सिद्ध सदस्यांची संख्या अधिक असते.

ड) कटक मंडळाचे त्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरी लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरण केले जाते.

योग्य पर्यायी निवडा :

1) फक्त अ, ब आणि क    2) फक्त ब, क आणि ड

3) फक्त अ, क आणि ड    4) वरील सर्व

(उत्तर) (#) हा प्रश्न आयोगणे  रद्द केला आहे .

 

प्र.4. कटक मंडळविषयक चुकीचे/चुकीची विधान/ विधाने निवडा. (ASO मुख्य 2019)

अ) ‘कटक क्षेत्रांचे स्थानिक स्वशासन’ भारतीय संविधानाच्या समवर्ती सूची मध्ये समाविष्ट आहे.

ब) कटक मंडळे ही लोकशाही स्वरूपाची यंत्रणा असून ती निर्देशीत क्षेत्राच्या नागरी प्रशासनाशी संबंधित आहे.

क) लोकसंख्येनुसार कटक मंडळाने तीन प्रकार आहेत.

पर्यायी उतरे :

1) अ, ब आणि क           2) फक्त अ आणि क

3) फक्त ब आणि क        4) फक्त अ

 

प्र.5. महाराष्ट्रामध्ये छावणी मंडळे (कटक मंडळे) आहेत. (ASO मुख्य 2017)

अ) कामठी       ब) बडनेरा

क) देवळाली     ड) खडकी

पर्यायी उत्तरे :

1) फक्त अ, ब, क           2) फक्त ब, क, ड

3) फक्त अ, क, ड        4) फक्त अ, ब, ड

 

प्र.6. महाराष्ट्रामध्ये ठिकाणी कटक (छावणी) मंडळे अस्तित्वात आहे? (ASO मुख्य 2016)

अ) औरंगाबाद               ब) नागपूर (कामठी)

क) अहमदनगर            ड) अमरावती (चांदूर रेल्वे)

पर्यायी उत्तरे :

1) फक्त अ, ब, क         2) फक्त अ, ब, ड

3) फक्त अ, क, ड           4) फक्त ब, क, ड

 

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch